Thursday, 21 March 2019

श्री दत्तात्रय स्तुति

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

*श्री दत्तात्रेय स्तुती* 🚩🚩🚩

*दत्तात्रेयं सनातनं ब्रह्म निरञ्जनम् |*
*आदिदेवं निराकारं व्यक्तं गुणविवर्जितम् || १ ||*

*चिन्मयं व्यापितं सर्वं चिदाकाशं दिगम्बरम् |*
*निर्विकल्पं निराभासं दृश्यदर्शनवर्जितम् || २ ||*

*अगोचरं निरालम्बं ब्रह्मचारी यतीश्वरः |*
*बर्गलोकनायकं स्म्पूर्णं परमात्मनरक्षकः || ३ ||*

*आशापाशविबन्धनमुक्तः शौचाशौचविवर्जितयुक्तः |*
*शून्यागारे समरसमज्ञः शुद्धविशुद्धं सततसमज्ञः || ४ ||*

*दत्तात्रेय नाथोत्तमं सुखदं परमानन्दसागरम् |*
*चित्कीर्तिभूषणं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु || ५ ||*

*हर्षवर्धनं वन्दे कौवल्यसुखदायकं |*
*सकलागमपूजितं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु || ६ ||*

*संसारतमनाशनं संकल्पदु:खदलनम् |*
*तापत्रयनिवारकं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु || ७ ||*

*संशयार्णवखण्डनं दोषत्रयविभेदिनम् |*
*ब्रह्मप्रकाशात्मानं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु || ८ ||*

*भार्गवप्रियकृत्तमं दूरत्वपरिनाशनम्|*
*जगदार्जवपालनं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु || ९ ||*

*नमस्ते कालाग्निशमनाय योगिजनवल्लभाय नमोऽस्तु ते |*
*नमस्ते अत्रिपुत्राय दत्तात्रेयाय नमोऽस्तु ते || १० ||*

*नमस्ते लीलाविश्वम्भराय अवधूताय नमोऽस्तु ते |*
*नमस्ते अनसूयानन्दनाय दिगम्बराय नमोऽस्तु ते || ११ ||*

*नमस्ते सत्वसाध्याय सत्वसाक्षिणे नमोऽस्तु ते |*
*नमस्ते गुह्यतमाय चिद् विलासाय नमोऽस्तु ते || १२ ||*

*नमस्ते क्षेत्राधाराय क्षेत्रशून्याय नमोऽस्तु ते |*
*नमस्ते रुपकारणाय गगनाकृतये नमोऽस्तु ते || १३ ||*

*श्री दत्तात्रेय पाहि मां प्रसीद दिगम्बर |*
*क्षमस्व अवधूत रक्ष रक्ष श्रीगुरो || १४ ||*

🙏🏻🌼🌼🚩🚩🌼🌼🙏🏻

Thursday, 14 March 2019

विचित्र वीर हनुमान माला मंत्र

श्रीविचित्र-वीर-हनुमन्-माला-मन्त्र :-

विनियोगः-
ॐ अस्य श्रीविचित्र-वीर-हनुमन्माला-मन्त्रस्य श्रीरामचन्द्रो भगवान् ऋषिः। अनुष्टुप छन्दः। श्रीविचित्र-वीर-हनुमान्-देवता। ममाभीष्ट-सिद्धयर्थे माला-मन्त्र-जपे विनियोगः।

ऋष्यादि-न्यासः-
श्रीरामचन्द्रो भगवान् ऋषये नमः शिरसि। अनुष्टुप छन्दसे नमः मुखे। श्रीविचित्र-वीर-हनुमान्-देवतायै नमः हृदि। ममाभीष्ट-सिद्धयर्थे माला-मन्त्र-जपे विनियोगाय नमः सर्वांगे।

षडङ्ग-न्यासः-
ॐ ह्रां अंगुष्ठाभ्यां नमः (हृदयाय नमः)। ॐ ह्रीं तर्जनीभ्यां नमः (शिरसे स्वाहा)। ॐ ह्रूं मध्यमाभ्यां नमः (शिखायै वषट्)। ॐ ह्रैं अनामिकाभ्यां नमः (कवचाय हुं)। ॐ ह्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः (नेत्र-त्रयाय वौषट्)। ॐ ह्रः करतल-करपृष्ठाभ्यां नमः (अस्त्राय फट्)।

ध्यानः-
वामे करे वैर-वहं वहन्तम्, शैलं परे श्रृखला-मालयाढ्यम्।
दधानमाध्मातमु्ग्र-वर्णम्, भजे ज्वलत्-कुण्डलमाञ्नेयम्।।

माला-मन्त्रः-
“ॐ नमो भगवते, विचित्र-वीर-हनुमते, प्रलय-कालानल-प्रभा-ज्वलत्-प्रताप-वज्र-देहाय, अञ्जनी-गर्भ-सम्भूताय, प्रकट-विक्रम-वीर-दैत्य-दानव-यक्ष-राक्षस-ग्रह-बन्धनाय, भूत-ग्रह, प्रेत-ग्रह, पिशाच-ग्रह, शाकिनी-ग्रह, डाकिनी-ग्रह ,काकिनी-ग्रह ,कामिनी-ग्रह ,ब्रह्म-ग्रह, ब्रह्मराक्षस-ग्रह, चोर-ग्रह बन्धनाय, एहि एहि, आगच्छागच्छ, आवेशयावेशय, मम हृदयं प्रवेशय प्रवेशय, स्फुट स्फुट, प्रस्फुट प्रस्फुट, सत्यं कथय कथय, व्याघ्र-मुखं बन्धय बन्धय, सर्प-मुखं बन्धय बन्धय, राज-मुखं बन्धय बन्धय, सभा-मुखं बन्धय बन्धय, शत्रु-मुखं बन्धय बन्धय, सर्व-मुखं बन्धय बन्धय, लंका-प्रासाद-भञ्जक। सर्व-जनं मे वशमानय, श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सर्वानाकर्षयाकर्षय, शत्रून् मर्दय मर्दय, मारय मारय, चूर्णय चूर्णय, खे खे श्रीरामचन्द्राज्ञया प्रज्ञया मम कार्य-सिद्धिं कुरु कुरु, मम शत्रून् भस्मी कुरु कुरु स्वाहा। ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः फट् श्रीविचित्र-वीर-हनुमते। मम सर्व-शत्रून् भस्मी-कुरु कुरु, हन हन, हुं फट् स्वाहा।।”


Monday, 4 March 2019

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
*त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!*

*By Dipali Nevarekar*

*शरीरावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी करा काही घरगुती उपाय !*

*त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज  (कंड) जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून  संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच  हे काही  नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.*

*1) खोबरेल तेल*
*कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून  रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.*

*2) पेट्रोलियम जेली*
*जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे ! पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.*

*3) लिंबू*
*व्हिटामिन सी'ने युक्त  लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेचा कंड कमी होण्यास  मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर  खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्‍यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.*

*4) बेकिंग सोडा*
*शरीराच्या लहानशा भागावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. 3 भाग सोड्यात 1 भाग पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व  खाज येणार्‍या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा  जखम असल्यास हा उपाय करू नये. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा ,कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा. किंवा अर्धा तास त्यात पडून रहा.*

*5) तुळस*
*तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत  करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा  पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा.*

*6) कोरफड*
*कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास व त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.*

*शरीराला कंड सुटत असल्यास खाजवून त्वचेची हानी करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करा. मात्र वेळीच आराम न मिळाल्यास त्यामागील नेमके कारण शोधा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.  काही वेळेस सिंथेटीक कपड्याची, काही अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यास खाज सुटू शकते. तसेच खाजवल्यानंतर त्वचेचा रंग बदलत असल्यास, झोपेत त्याचे प्रमाण वाढत राहिल्यास किंवा चट्टे निर्माण झाल्यास डॉक्टरांना नक्की दाखवा.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Monday, 18 February 2019

दिगंबरा दिगमबर श्रीपाद

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.....!
दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,

तुच माझा सवंगडी अन् तुच माझा सखा...
दत्तात्रेय  तुझ्याविना माझा नाही कोणी वारी,
तुच माझा पाठीराखा अन् तुच माझा कैवारी...

दत्तात्रेय तुझ्या चरणी झुकवितो माझे शिर,
तुच माझ्या जगण्याचे कारण अन् तुच धिर...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी मायबाप,
दत्तात्रेय माझी माय अन् दत्तात्रेय माझा बाप...

दत्तात्रेय तुझ्या दर्शनासाठी झुरले माझे प्राण,
देऊन दर्शन कर संतुष्ट माझे आतूर मनं...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,
तुच माझा सखा अन् तुच पाठीराखा...
दत्त तुच पाठीराखा...

Digambara Digambara Shripada Vallabha Digambara!

Digambara Digambara Narsinh Yativar Digambara!

Digambara Digambara Shri Gopal Guruvar Digambara!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा नरसिंह यतीवर दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा श्री गोपाल गुरुवर दिगंबरा!

शिवजयंती गीत

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
════════════════
*आपणास शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा...!*

_सूर्योदय झाला शिवनेरी वर_
_शिव सूर्याचा जन्म झाला_
_सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात_
_शिव वादळाचा जन्म झाला_
_पारतंत्र्याचा अस्त करण्या_
_शिव शक्तीचा जन्म झाला_
_धन्य झाली आई जिजाऊ_
_शिव पुत्र हा जन्मास आला_
_धन्य धन्य झाला महाराष्ट्र_
_शिव राज्याचा जन्म झाला_
_या मायभूमीचे रक्षण करण्या_
_शिवप्रभु जन्मास आला_
_जात पातीचे तोडन्या बंध_
_शिवरायांचा जन्म झाला_
_हिंदवी स्वराज्य घडविण्या_
*_शिव छत्रपतींचा जन्म झाला......_!!*

*शिवजयंतीच्या हार्दीक - हार्दीक शुभेच्छा .....!!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Wednesday, 13 February 2019

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,
स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही,
दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला,
सदगुरु स्वामी राया हो!!!
स्वामी समर्था तुम्हीच पाठी,
निर्भय असा मी झालो हो
संकटात उभा पुढे मी,
सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था,
हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे ,
माफ करा
स्वामी राया हो !!!
तेज डोळे बघती मजला ,
रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर  हात  ठेवून ,
जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,
स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या, 
सदगुरु स्वामी राया हो !!!
आज आलो दारी तुमचा,
पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया
आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक  तुमचा आई तुम्ही,
रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!

🌺!! श्री  स्वामी  समर्थ  !!🌺

Thursday, 7 February 2019

पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)


पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥


चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥