Thursday, 17 September 2015

अष्टविनायक - ओझरचा विघ्नेश्वर

ॐ गं गणपतये नमः  ll

ओझरगावी श्री.विघ्नेश्वर
विघ्ने हरतो जो परमेश्वर   ll  धृ ll

इंद्राच्या भरल्या दरबारी
नारदमुनीची येऊन स्वारी
सांगु लागले वार्ता भूवरी
अभिनंदन हा यज्ञ करीतसे हिमालयावर ll 1 ll

तुझ्या नावाचा यज्ञामधला
वाटा नाही देऊ केला
अपमान तुझा इंद्रा झाला
काय म्हणुनी सहन करावे तु जगदिश्वरा ll 2 ll

इंद्राने मग मनी संतापुनि
विघ्नासूर हे नाव देऊनि
कृर असुर मोठा पाठवूनि
विघ्ने आणली त्या असुराने यज्ञस्थळावर ll3ll

यज्ञ राहिला अर्ध्यावरती
सर्व देव ही चिंतित होती
गजाननाचा धावा करिती
पार्श्व ऋषींचा पुत्र होऊनी ये लम्बोदर ll 4 ll

युध्द करुनी त्या असुराशी
पराभूत ही केले त्यासी
विघ्नेश्वर हे म्हणती त्यासी
तिथे बांधिले मंदिर सुंदर  ll 5 ll

No comments:

Post a Comment