Thursday, 17 September 2015

अष्टविनायक - रांजणगावचा महागणपती

ॐ गं गणपतये नमः  ll

रांजणगावी महागणपती
भाव फुले त्या चरणावरती  ll धृ  ll

देव प्रसन्न होई
त्रिपुरासुर वर ही देई
असुर परंतु मातुन जाई
शिरजोरिची त्याची वृत्ती  ll 1 ll

सिंहासनिच्या त्या इंद्राला
दूर लोटुनि दिले बाजुला
कैलासावर शिव शम्भूला
सर्व देव ते चिंतित होती  ll 2ll

शभुसंगे सर्व देवता
गणेश चरणीं विनम्र होता
कृपा तयाची आणी लाभता
वध असुराचा भुमीवरती  ll 3 ll

त्रिपुरासुर हे महात्म्य सरले
मग आनंदी सर्व जाहले
मणिपुर नावे गांव वसविले
रांजनगावा म्हणून ख्याती  ll 4ll

No comments:

Post a Comment