Thursday, 17 September 2015

अष्टविनायक - सिद्धटेकचा सिध्दिविनायक

ॐ गं गणपतये नमः  ll

सिद्धटेकचा सिद्धीविनायक
चरणी त्याच्या विनम्र मस्तक ll धृ ll

नीद्राधीन ते विष्णु होते
कानामधुनी मधु कैटभ ते
जन्मा आले राक्षस मोठे
तांडव त्यांचे सुरू अचानक  ll १ll

इन्द्र चंद्र नी कुबेर मिळुनी
पळू लागले आसन सोडूनी
ब्रह्मदेवही बसले भिऊनी
विष्णु फुंकिती शंख अचानक ll2 ll

देव नि राक्षस रणांगणावर
सुरू जाहले युध्द भयंकर
सहस्त्र वर्षे चाले संगर
युध्द समाप्ती कुणा न ठाऊक  ll 3ll

कमलापती मग चिंतित झाले
शन्कराकडे अखेर गेले
वर्तमान ते त्यासी कथिलें
वदले शम्भु स्मरा विनायक ll4 ll

बसले विष्णु तप करण्याला
म्हणुनी विनायक प्रसन्न झाला
मग विष्णूंनी त्या भूमीवर
रचिलें मंदिर सिद्धीविनायक  ll 5ll

No comments:

Post a Comment