Sunday, 15 January 2017

अष्टविनायका तुझा महिमा कसा

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌ बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌ लेण्यांद्रिं गिरिजात्मजं सुवरदंविघ्‍नेश्वरं ओझरम्‌ ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरीनंदना कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन काळजात सिंहासन मधोमधी गजानन दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा गणपती, पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं घेतला वसा गणपती, दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्‍यांनी विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी रमा बाईला अमर केलं वृंदावनी जो चिंता हरतो मनातली चिंतामणी भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा गणपती, तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं दैत्य मधु कैटभानं गांजलं हे नगर ईष्नुनारायण गाई गणपतीचा मंतर राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं लांबरुंद गाभार्‍याला पितळेचं मखर चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर मंडपात आरतीला खुशाल बसा गणपती, चौथा गणपती पायी रांजणगावचा देव महागणपती दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण किती गुणगान गावं किती करावी गणती पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा गणपती, पाचवा गणपती ओझरचा इघ्‍नेश्वर लांब रुंद होई मूर्ती जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर इघ्‍नहारी इघ्‍नहर्ता स्वयंभू जसा गणपती, सहावा गणपती लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव रमती इथे रंका संगती राव शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो लेण्याद्री गणानी पाठी आशीर्वाद केला हो पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा सातवा गणपती राया महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्‍न मंगलमूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा आठवा आठवा गणपती आठवा पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्‍नेश्वरा मोरया मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया Random song suggestion  या गडे हासू या मराठीवर प्रेम करता ? शेअर करा   अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ  Aathavanitli Gani is a completely non-commercial and no

No comments:

Post a Comment