श्री स्वामी समर्थ
|| सुख स्वामींकडे मागावे ||
सुख स्वामींकडे मागावे
दुःख स्वामींना सांगावे
स्वामी मागे, स्वामी पुढे
स्वामी आहेत चोहीकडे
डोळे मिटूनी बघावे
सुख स्वामींकडे मागावे
दुःख स्वामींना सांगावे
धाव घ्यावी स्वामींपाशी
जशी माउलीच्या कुशी
तान्हियाने प्रेम प्यावे
सुख स्वामींकडे मागावे
दुःख स्वामींना सांगावे
स्वामी प्रेमळ प्रेमळ
स्वामी आरसा निर्मळ
बिंब तयात पहावे
सुख स्वामींकडे मागावे
दुःख स्वामींना सांगावे
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
No comments:
Post a Comment