🍵 *आयुर्वेदाकडुन आरोग्याकडे*🍵
👉🏻 *किडनी स्टोन (मुतखडा)*
प्रिय मित्रानो
Kideny स्टोन (मुतखडा)
माझा २०१६ मधील अनुभव सांगत आहे.
२२ एप्रिल २०१६ ला मी माझ्या वडिलांना बीड वरून कॅथेटर लावून आणून सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन कॉर्नर ला ऍडमिट केले नंतर सर्व तपासण्या केल्यानंतर कळले कि दोन खडे आहेत एक १८ MMआणि दुसरा १० MM
• मग बीपी , साखर सर्व नॉर्मल लेवल ला आणुन ३ दिवसानंतर १८MM मुतखडा लेझर ऑपरेशन ने फोडला परंतु लगेचच दुसरे ऑपरेशन होऊ शकत नाही म्हणून डॉक्टरांनी परत ३ महिण्यानंतर येण्यासाठी सांगितले.मला असाच एका भल्या माणसाने खालील उपाय सांगितलं आणि तो माझ्या वडलांनी तंतोतंत पाळला आणि मग त्याना दुसऱ्या ऑपरेशनची गरजच पडली नाही.
आता ते एकदम ठीक आहेत .
👉🏻टीप- हा सरळ साधा उपाय सुरु करण्याच्या आधी एकदा सोनोग्राफी करून खडा (किडनी स्टोन) किती मोठा आहे ते खात्री करून घ्या.
👉🏻 *उपाय*
• १ किलो हुलगे घ्या.
(बाजारात कोठेही मिळतात ७० ते ९० रुपये किलो )
त्याचे समान ९ भाग करा, आणि पहिला भाग शुक्रवारी रात्री दीड ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला ( किंवा एक मोठा ग्लास)
• आणि सकाळी अनवश्यापोटी (दात घासल्यानंतर ) ते पाणी प्या,
असे पुढील ८ दिवस पूर्ण करा आणि पुढील ३ दिवसानंतर परत सोनोग्राफी करा आणि फरक बघा.
👉🏻• टीप-
(भिजलेले हुलगे फेकू नका त्याची मस्त कांदा, शेंगदाणे आणि तिखट टाकून ऊसळ करा. किंवा भाजी पण होते मटकी सारखी.
ते एक चांगले कडधान्य आहे.आजोबा किंवा आजीला विचारा ते सांगतील.)
माझ्या वडिलांचा १०mm चा किडनी स्टोन १०MM वरुन ३.५ MM झाला होता.
त्यानी परत १० दिवसानंतर पुढील ९ दिवस हा उपाय केला आणी सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर पण अवाक झाले.
काही विचारायचे असेल तर मला कॉल करू शकता माझा नंबर -
👉🏻 *श्री .प्रमोद जाधव *-९८९०९६५००७*
*(जर तूमचा कॉल उचलला नाही तर थोड्या वेळाने परत कॉल करेन फक्त मला तसा मेसेज पाठवा.(सॉफ्टवेअर मध्ये काम करत असल्यामुळे कधी कधी मीटिंग मध्ये असतो.)*
No comments:
Post a Comment