*🍁|| श्री स्वामीसमर्थ मालामंत्र ||🍁*
दत्तमाला मंत्र पेक्षा वेगळा असा श्रीस्वामी समर्थ भक्तांसाठी देतो आहे. या मालामंत्रात बीजमंत्र असल्याने कानामात्रेतही फरक न करता, रोज सकाळी आंघोळीनंतर किंवा दिवसभरात केव्हाही शुचिर्भुतपणे, श्रध्देने ११ वेळा म्हणावा...मनाला एका अपुर्व अशा शांतीचा, स्वामींच्या संरक्षक कृपेचा अनुभव नक्कीच येईल....या मंत्रजपात नियमितता, श्रध्दा हवी. आणि स्वामींच्या अदुभुत लिलेवर प्रचंड विश्वासही हवा.....तुमच्या परिचयातील स्वामी भक्तांनाही हा मालामंत्र अवश्य द्यावा ही विनंती....घरातील लहानमोठ्या अडचणी, आजारपणे, त्रास, वास्तुदोष, बाधानिवारण, अनाकलनीय संकटे दुर होण्यासाठी कायम या मंत्रजपाचे अनुष्ठान ठेवावे.. सातत्याने जप करत रहावा....
॥ श्रीगणेशाय नम: ॥
जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे ।
कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥
ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामी समर्था ।
स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजनवंदिता ॥
चिदानंदात्मकात्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका ।
बालोन्मत्ता पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥
चित् चैतन्या चिरंतना | अवधूता निरंजना |
जगदाधारा सुदर्शना | सुखधामा सनातना ||
सकलकामप्रदायका | सकलदुरितदाहका |
सकल संचित कर्महरा | सकल संकष्ट विदारा ||
ॐ भवबंधमोचना | ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना |
ॐ स्वां स्वहितधर्मचालका | ॐ मीं नित्ययशदायका ||
ॐ सं संसारचक्र छेदका | ॐ मं महाज्ञानप्रदायका |
ओमर्थां महावैराग्य-साधका | ॐ नं नरजन्मसार्थका ||
ॐ मों महाभयनिवारका | ॐ भक्तजनहृदयनिवासा |
परकृत्या थोपव थोपव | परमंत्रा शांतव शांतव ||
परयंत्रा विखर विखर | ग्रहभूतादिपिशाच्च पीडा हर हर |
दारिद्र्यदु:खा घालव घालव | सुखशांती फुलव फुलव ||
आपदा विपदा मालव मालव | गृहदोष वास्तुदोष |
पितृदोष सर्पदोषादि | सकलदोषा विरव विरव ||
अहंकारा नासव नासव | मन चित्तबुद्धी स्थिरव स्थिरव |
नमोजी नमो देव महादेव | देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्रीगुरुदेव ||
नमो नमो नमो नमः ||
( सप्तशते सिद्धि:)
No comments:
Post a Comment