Wednesday, 18 October 2017

जनाबाईचे अभंग

*अभंग*

आनंदाची दिपवाळी । घरी बोलवा वनमाळी । घालीते मी रांगोळी । गोविंद गोविंद ॥धृ०॥

सुंदर माझ्या घरात । आत्मा हा नांदत । चंद्रसूर्य दारात । गोविंद गोविंद ॥१॥

दळण दळिले मंदिरी । विष्णू यावे लौकरी । चित्त माझे शुद्ध करी । गोविंद गोविंद  ॥२॥

रावणासी मारोनी । सीता आणिली घरी । बिभीषण राज्य करीत । गोविंद गोविंद ॥३॥

अंजनीच्या उदरी । मारूती ब्रह्मचारी । येशवदेच्या मांडीवरी । गोविंद गोविंद ॥४॥

वैकुंठीचा राणा । चन्द्रभागेवरी आला । पुंडलिकाचा भाव पाहुनी । उभा तो राहिला ॥५॥

पुंडलीक भक्त बळी । त्याने आणिला वणमाळी । विटेवरी दिसली । मूर्ती ती सावळी ॥६॥

सावळा तो वनमाळी । भक्तीसी भुलला । पुंडलिकाचा बाजार । दृष्टीने पाहिला ॥७॥

विठ्ठल माझा सखा । ओव्या मी गाईन । देऊळासी जाईन । हरिला पाहीन ॥८॥

विठ्ठल माझे गणगोत । आराध्य दैवत । विठ्ठलाच्या चरणी सखू । झाली मनोरथ ॥

                --संत सखूबाई  

दिपावलीच्या भक्तिमय शुभेच्छा  💐💐

No comments:

Post a Comment