*श्री स्वामी समर्थ महाराजांनी सद्भक्तांना दिलेले 11 वचने.*
*अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ ।*
*गुरूदेव दत्त तो ही मीच ॥१॥*
*वटवृक्ष तळी नित्य माझा वास ।*
*ठेविता विश्वास मी भेटेन ॥२॥*
*तुमचे नी माझे जुने खूप नाते ।*
*म्हणूनिया येथें आला तुम्ही ॥३॥*
*ज्याचे मुखी मंत्र “श्री स्वामी समर्थ” ।*
*धरितो मी हात त्याचा नित्य ॥४॥*
*माझे हाती आहे ब्रम्हांडाची गोटी ।*
*सकल ही सृष्टी माझे रूप ॥५॥*
*कांही न मागता देतो सर्व कांही ।*
*श्रीमंती अशी ही माझी न्यारी ॥६॥*
*माझे नाम घेता दारीद्र सरते ।*
*दुःख ही पळते दाही दिशा ॥७॥*
*खोटे नाटे मज खपणार नाही ।*
*माझी दृष्टी पाही सर्व कांही ॥८॥*
*जरी तुम्ही दूर समुंदर पार ।*
*होईन मी घार रक्षिण्यास ॥९॥*
*भिऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी ।*
*माझी कृपादृष्टी तुम्हांवरी ॥१०॥*
*स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर ।*
*मग मी आतुर तेथें येण्या ॥११॥*
*॥ राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥*
*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.! "*
*हम गया नहीं, जिंदा है.!!*
*निश्चिन्त जा, मी आहे.!!!*
No comments:
Post a Comment