Saturday, 31 December 2016
तेरे नाम का सुमिरण करके मेरे मन मे
साई तेरी याद महासुखदाई
राम जी के नाम ने तेरे पत्थर भी तारे
प्रभू हम पे कृपा करना
ले ले तेरा नाम हरी जीवन बीता जाये
जिसके सिरपर हाथ हो तेरा वो कैसे दुःख पाये
जय भोला भंडारी
गोविंद के गुण गा ले रे
तुने मुझे बुलाया शेरावालीये
#जयकारा_शेरावालिका_बोल_साँचे_दरबार_की_जय
साँची ज्योता वाली माता...
तेरी जय जयकार |
तुने मुझे बुलाया शेरावालिये..
मैं आया मैं आया शेरावालिये |
ज्योंता वालिये.. पहाडा़ वालिये, मेहरा वालिये ||
सारा जग है इक बंजारा..
सब की मंजिल तेरा द्वारा |
ऊंँचे परबत लम्बा रास्ता..
पर मैं रह ना पाया..शेरा वालिये ||
सूने मन में जल गयी बाती...
तेरे पथ में मिल गए साथी |
मुंह खोलूं क्या तुझे से मांगू ..
बिन मांगे सब पाया.. शेरा वालिये ||
कौन है राजा..कौन भिखारी..
एक बराबर तेरे सारे पूजारी |
तुने सब को दर्शन देके..
अपने गले लगाया.. शेरा वालिये ||
Friday, 30 December 2016
वाट चाललो गीरनारीची
#श्री_गिरनार_यात्रा
वाट चाललो गिरनारीची, दशसहस्त्र त्या पथवाटेची
पदी पदी आठव त्या दत्ताची, दत्तगुरुंची दत्तगुरुंची
जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी ॥
प्रथम ओलांडली मी तीन शिखरे, काम क्रोध लोभ ही खरे, दिसू लागली मग गुरुचरणे
लगबग लगबग वरती गेलो, पवित्र मंगल चरणांवरी त्या, मस्तक ठेवुनी, धन्य मी झालो, धन्य मी झालो ॥
भानावरती मग मी येता, समजुनी चुकलो मी हा पुरता, केवळ दत्तकृपेने मी हो, शिखर ते चढलो, शिखर ते चढलो ॥
त्या शिखरी हो प्रचंड वारा, त्या शिखरी हो प्रचंड वारा, गुरुकृपेचा तो हा सारा, त्या वार्याने मी पण माझे, कधी उडविले मज नच कळले
वाटे माझे तप अजि फळले, वाटे माझे तप अजि फळले
दत्ताच्या ह्या दरबारी अजि, कधी पोहोचले, ते नच कळले
दत्ताच्या ह्या दरबारी अजि, मी रुजु झाले, रुजु मी झाले!
******
धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ, धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ ॥
निराकार तू सर्वदेशी परी रूप सगुण मज दावा
सुहास्य सुंदर रुप मनोहर नयनांसी मम दावा ॥
भावभक्तिच्या उत्तुंग शिखरी निवास तुझा मज ठावा
झुरता निशिदिनी तुजसाठी या जीवा कधी न विसावा ॥
दर्शनासी आळविता अश्रूंचा पाट किती मी वहावा
कृपाळू दिनवत्सल नाम तव कृपेची प्रचित मजसी दावा ॥
त्रिशूल डमरू घेवुनि हाती, चालता, पायी वाजती खडावा
कामधेनू अन् श्वान संगे तू डुल्लतसे आत्मभावा॥
कामक्रोध षडरिपूंचा जाळीतसे मज वणवा
कृपाळू तव द्वारी आलो ऐकुनि तव कृपेचा गवगवा ॥
भक्ती ज्ञान वैराग्याच्या अर्पी मज तव विभवा
वैराग्याच्या अखंड धुनीत भस्मीभूत करी गा देहभावा ॥
आर्तस्वरे आळविता तुजसी अश्रूंसी कधिचि ना तो विसावा
साधनेच्या दुर्गम पथवाटे पदीपदी आठव तुझाचि व्हावा ॥
कृपा कृपा तव कृपाचि केवळ, त्याविना उध्दार ना तो जीवा
कृपांकित तव अगणित भक्तांचा वाटतसे मज हेवा ॥
सर्वसाक्षी तू अंतरीच्या मम जाणी तळमळी अन् भावा
शरणागत मी तुज सर्वथा स्वीकारी नमस्कार मनोभावा ॥
गिरिराज गिरनार पर्वती, गुरुराजाच्या भेटीसाठी, आशा बहु या जीवा
स्मर्तुगामी श्री दत्तप्रभु हो प्रगट तुम्ही हो व्हा व्हा ॥
श्री दत्तगुरु तू गुरु गुरुंचा गुरुराज मार्ग मज दाखवा
नित आनंदी त्या ब्रह्मानंदी तुम्हासंगे डोलवा ॥
भाव मनींचा मम अति शुद्ध जाणुनिया प्रभु धावा
पावा पावा दयाळू प्रभु तू प्रार्थनेसी या पावा ॥
कृष्णदास हा अति तळमळुनि करितसे तव धावा
जाणुनि ऐकुनि तळमळ दासाची या त्वरित प्रभु या धावा ॥
******
गिरनार..!!
दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार, असे मानले जाते. दहा हजार पायऱ्या चढून तिथे जाणं हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. भौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये ‘जुनागढ’ या शहरापासून गिरनार तळ पाच किमी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच १६ गावांपर्यंत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी- जगताने संपन्न, विविध औषधी-वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगीसिद्ध-महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेकजण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.
गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भवनाथ महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू-संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा-साधू स्नानाला उतरतात. अशी एक आख्यायिका आहे की त्या साधूमध्ये असा एक lसाधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजनी आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत.
त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचालित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्रीशेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.
आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरू-शिष्य (नाथ परंपरा) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे ‘प्रसाद’ घेतला जाईल याकडे स्वत: श्रीशेरनाथ बापूंचा कटाक्ष असतो. लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि. मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्रीकाश्मिरी बापूंचा आश्रम आहे. श्रीकाश्मिरी बापूंचे वय अंदाजे दीडशे वर्षेच्या आसपास आहे, अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे. याही आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादाचे भोजन घ्यावे लागते. अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे.
गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त-भक्ताची इच्छा असतेच. सुमारे दहा हजार पायऱ्यांवर हे स्थान आहे. वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिक दृष्टय़ा चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाले आहेत. डोलीवाले एका व्यक्तीसाठी दहा हजार रुपये आकारतात. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर सुमारे २०० पायऱ्यांवर डावीकडे एक भैरवाची मूर्ती आढळून येते.
पूर्वी एक सिद्ध
श्रीलक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात सर्व साधू-संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता. दोन हजार पायऱ्यांवर ‘वेलनाथ बाबा समाधी’ असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिद्ध स्थान आहे, असे सांगतात. वाटेत आजूबाजूला चहा-कॉफी- सरबत मिळण्याची दुकाने आहेत. दोन हजार २५० पायऱ्यांवर श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे.
आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर ‘माली परब’ घाट येतो. तेथे एक रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले lp26कुंड आहे. दोन हजार ६०० पायऱ्यांच्या आसपास राणकदेवी मातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांपाशी प्रसूती बाई (देवी)चे स्थान आहे. संतान प्राप्त झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, कालिमाता, वरुडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागा आहे. थोडा काळ येथे विश्रांती घेऊन यात्रेकरू पुढे मार्गस्थ होतात. सुमारे चार हजार पायऱ्यांवर जैन-मंदिर येते. मुख्य मंदिर ‘नेमिनाथाचे’ आहे. अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ हे २२ वे जैन तीथर्ंकर होय. या मंदिरातून थोडय़ा पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीथर्ंकर श्रीआदिनाथांची भव्य अणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन-दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुर-कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर ‘गौमुखी गंगा’ नावाचे स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. आणि डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. (काही ग्रामस्थ, भाविक, साधू-बैरागी या मार्गाने येतात अथवा जातात. या मार्गावर कुठल्याही प्रकारची दुकाने अथवा मदतीसाठी माणसे-डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.) गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायऱ्यांवर ‘अंबाजी टुंक’ येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळीपौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान, बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायऱ्या चढल्यावर ‘श्री गुरू गोरक्षनाथ टुंक’’ हे स्थान येते.
गिरनार पर्वतवरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र
सपाटीपासून तीन हजार ६६६ फुटांवर हे स्थान येते. नवनाथ संप्रदायातील श्रीगोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे, अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरू गोरक्षनाथांची धुनी आहे. असे म्हणतात की याच स्थानावर गुरू गोरक्षनाथांनी चौऱ्यांशी सिद्धांना उपदेश केला. बाजूलाच एक पाप-पुण्याची खिडकी (बारी) आहे, म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या महंत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील ‘सेवा’ या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्चर्या करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. गोरखटुंकनंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो.
कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायऱ्या उतरायला लागतात. वाटेत श्रीगिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्रीगिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठय़ा कमानी दिसतात. एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायऱ्या चढल्यावर ‘दत्त टुंक’ आहे. चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी-वारा-पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. दहा बाय बारा चौ. फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे.
ती घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात, असा समज आहे. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते तसेच आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुद्धा या शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षांपासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळेत ही धुनी प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. महंत अमृतगिरी बापू म्हणून एक सिद्ध होऊन गेले. त्यांनी या स्थानावर राहून भरपूर तप केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने येथे सकाळी आठ ते रात्री आठ अव्याहत अन्नछत्र चालू असते. इतक्या दुर्गम स्थानी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदान सेवा वृत्तीने देणाऱ्या कमंडलू स्थानाचा उपक्रम हा कौतुकास पात्र आहेच, पण अचंबित करणारा आहे. कमंडलू स्थानाची अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्तटुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले.
एक भाग एकीकडे व दुसरा दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी- (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान.
कमंडलू स्थानापासून पुढे पायवाटेने गेल्यास अतिशय दुर्गम, निर्जन ठिकाणे आहेत. त्यामध्ये महाकाली खप्पर, अनुसूया टेकडी, पांडवगुंफा, कपिलधारा, अघोरी गुंफा या स्थानांचा प्रामुख्याने समावेश होतो. कृपया एकटय़ा-दुकटय़ाने या स्थानी जाण्याचा कुणी अट्टहास करू नये व गेल्यास कुणी स्थानिक माहीतगार व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हितकारक आहे.
परत येताना आहे त्या मार्गावरून येणे उत्तम, पण गौमुखी गंगा मंदिरापासून जी मागे उल्लेख केलेली वाट आहे त्या वाटेवरून आल्यास शेषावन मार्गे भवनाथ मंदिरापाशी (गिरनार तलेठी) पोहचता येते. वाटेमध्ये आनंद गुंफा, महाकाली गुंफा, सेवादास आश्रम-सीतावन-शेषावन-भरतवन- जांबुवंत गुंफा अशी अनेक स्थाने बघत बघत भवनाथ मंदिरापाशी पोहचता येथे. या मार्गावर यात्रेकरूंसाठी कुठलीही सोय नाही. तसेच अंदाजे एक हजार पायऱ्या अधिक आहेत. अशा या स्थानावर जाऊन येणे, तेथील वातावरण अनुभवणे व्हावे.
आयुष्यात किमान एकदातरी ही गिरनार यात्रा प्रत्येक दत्तभक्तांच्या नशिबी यावी .
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजा
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे तुम्ही ,स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही, दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला, सदगुरु स्वामी राया हो!!!
स्वामी समर्था तुम्हीच पाठी, निर्भय असा मी झालो हो
संकटात उभा पुढे मी, सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था, हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे , माफ करा स्वामी राया हो !!!
तेज डोळे बघती मजला ,रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर हात ठेवून ,जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या, सदगुरु स्वामी राया हो !!!
आज आलो दारी तुमचा, पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक तुमचा आई तुम्ही, रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
स्वामी सकाळ
Sunday, 25 December 2016
भगवान का स्मरण कैसे करे ?
*भगवान् को स्मरण कैसे करें?
*ऐसे करो, जैसे प्यास से व्याकुल मनुष्य जल
का स्मरण करता है |
* ऐसे करो, जैसे भूख से सताया हुआ मनुष्य
भोजन का स्मरण करता है |
*ऐसे करो, जैसे घर भूला हुआ मनुष्य घर का स्मरण
करता है |
* ऐसे करो, जैसे थका हुआ मनुष्य
विश्रामका स्मरण करता है |
* ऐसे करो, जैसे भय से कातर मनुष्य शरण देने
वाले का स्मरण करता है |
* ऐसे करो, जैसे डूबता हुआ मनुष्य जीवन
रक्षा का स्मरण करता है |
* ऐसे करो, जैसे दम घुटने पर मनुष्य वायु
का स्मरण करता है |
* ऐसे करो, जैसे परीक्षार्थी परीक्षा के
विषय का स्मरण करता है |
🙏 *ॐ श्री परमात्मने नमः*🙏
Saturday, 24 December 2016
मल्हारी ध्यान
नमस्कार सुप्रभात जय मल्हार श्री गुरुदेव दत्त !
श्री मल्हारी ध्यान -
ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसा भूषितांकम l
श्वेताश्वम् खडःग हस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थे l
युक्तांघ्रि दैत्यमुन्ध्री डमरु विलसितं नैशचूर्णाभिरामम l
नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगण परिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् ll
श्री मार्तण्ड भैरव ध्यान -
ध्यायेन्मार्तण्डरूपं अचल-चल-विभू कोटि सूर्य प्रकाश
आनंदं विश्व वंदं सकल जनकरनं कर्मधर्मादि नाथं
अश्वं बोधावरूढं परमविमलं श्री कोटि कंदर्प दर्पम्
श्रीमन्मल्लारि राजं विजय जयकरं म्हाळसाकांत सिद्धन
श्रीम्हाळसा स्तोत्र -
मैलारपत्नी मालाची महामाया च मालती
माया लाक्ष्मीर्महालक्ष्मीर्मायावत्यभिमानिनी
मैलार योगिनी चैव भैरवी चम्बिका तथा
द्वदशैतानि नामानि रहस्यानि तवाम्बिके
मल्लारिं जगदानाथं त्रिपूरारिं जगत्गुरूम्
मणिघ्नं म्हालसाकांतं वंदेहं कुलदैवतम्
आदिरुद्र महादेव मल्लारिं परमेश्वरम्
विश्वरुप विरुपाक्षं वन्देहं भक्तवत्सलम्
प्रियाणानंद गंगा महालसाभ्यां सहिताय
श्री मार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लरये नमः |
स्कंदनाभि समुद्रभूते | श्रीमैरालप्रियकरि |
गौरीप्रिय ताडिदगौरी | लक्ष्मी सुते नमस्तुते |
ॐ अश्वरुधाय विद्महे | म्हालासाकांताय धीमही |
तन्नो मल्हारी प्रचोदयात ||
ॐ शिवशक्ति विद्महे | मार्तण्डभैरवाय धीमही |
तन्नो मल्हारी प्रचोदयात ||
|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
श्री गुरू स्तोत्रं
श्री गुरु स्तोत्रम्
|| श्री महादेव्युवाच ||
गुरुर्मन्त्रस्य देवस्य धर्मस्य तस्य एव वा |
विशेषस्तु महादेव ! तद् वदस्व दयानिधे ||
श्री महादेवी (पार्वती) ने कहा : हे दयानिधि शंभु ! गुरुमंत्र के देवता अर्थात् श्री गुरुदेव एवं उनका आचारादि धर्म क्या है - इस बारे में वर्णन करें |
|| श्री महादेव उवाच ||
जीवात्मनं परमात्मनं दानं ध्यानं योगो ज्ञानम् |
उत्कल काशीगंगामरणं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||१||
श्री महादेव बोले : जीवात्मा-परमात्मा का ज्ञान, दान, ध्यान, योग पुरी, काशी या गंगा तट पर मृत्यु - इन सबमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||१||
प्राणं देहं गेहं राज्यं स्वर्गं भोगं योगं मुक्तिम् |
भार्यामिष्टं पुत्रं मित्रं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||२||
प्राण, शरीर, गृह, राज्य, स्वर्ग, भोग, योग, मुक्ति, पत्नी, इष्ट, पुत्र, मित्र - इन सबमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||२||
वानप्रस्थं यतिविधधर्मं पारमहंस्यं भिक्षुकचरितम् |
साधोः सेवां बहुसुखभुक्तिं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||३||
वानप्रस्थ धर्म, यति विषयक धर्म, परमहंस के धर्म, भिक्षुक अर्थात् याचक के धर्म - इन सबमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||३||
विष्णो भक्तिं पूजनरक्तिं वैष्णवसेवां मातरि भक्तिम् |
विष्णोरिव पितृसेवनयोगं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||४||
भगवान विष्णु की भक्ति, उनके पूजन में अनुरक्ति, विष्णु भक्तों की सेवा, माता की भक्ति, श्रीविष्णु ही पिता रूप में हैं, इस प्रकार की पिता सेवा - इन सबमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||४||
प्रत्याहारं चेन्द्रिययजनं प्राणायां न्यासविधानम् |
इष्टे पूजा जप तपभक्तिर्न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||५||
प्रत्याहार और इन्द्रियों का दमन, प्राणायाम, न्यास-विन्यास का विधान, इष्टदेव की पूजा, मंत्र जप, तपस्या व भक्ति - इन सबमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||५||
काली दुर्गा कमला भुवना त्रिपुरा भीमा बगला पूर्णा |
श्रीमातंगी धूमा तारा न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||६||
काली, दुर्गा, लक्ष्मी, भुवनेश्वरि, त्रिपुरासुन्दरी, भीमा, बगलामुखी (पूर्णा), मातंगी, धूमावती व तारा ये सभी मातृशक्तियाँ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||६||
मात्स्यं कौर्मं श्रीवाराहं नरहरिरूपं वामनचरितम् |
नरनारायण चरितं योगं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||७||
भगवान के मत्स्य, कूर्म, वाराह, नरसिंह, वामन, नर-नारायण आदि अवतार, उनकी लीलाएँ, चरित्र एवं तप आदि भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||७||
श्रीभृगुदेवं श्रीरघुनाथं श्रीयदुनाथं बौद्धं कल्क्यम् |
अवतारा दश वेदविधानं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||८||
भगवान के श्री भृगु, राम, कृष्ण, बुद्ध तथा कल्कि आदि वेदों में वर्णित दस अवतार श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||८||
गंगा काशी कान्ची द्वारा मायाऽयोध्याऽवन्ती मथुरा |
यमुना रेवा पुष्करतीर्थ न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||९||
गंगा, यमुना, रेवा आदि पवित्र नदियाँ, काशी, कांची, पुरी, हरिद्वार, द्वारिका, उज्जयिनी, मथुरा, अयोध्या आदि पवित्र पुरियाँ व पुष्करादि तीर्थ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||९||
गोकुलगमनं गोपुररमणं श्रीवृन्दावन-मधुपुर-रटनम्|
एतत् सर्वं सुन्दरि ! मातर्न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||१०||
हे सुन्दरी ! हे मातेश्वरी ! गोकुल यात्रा, गौशालाओं में भ्रमण एवं श्री वृन्दावन व मधुपुर आदि शुभ नामों का रटन - ये सब भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||१०||
तुलसीसेवा हरिहरभक्तिः गंगासागर-संगममुक्तिः |
किमपरमधिकं कृष्णेभक्तिर्न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||११||
तुलसी की सेवा, विष्णु व शिव की भक्ति, गंगा सागर के संगम पर देह त्याग और अधिक क्या कहूँ परात्पर भगवान श्री कृष्ण की भक्ति भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||११||
एतत् स्तोत्रम् पठति च नित्यं मोक्षज्ञानी सोऽपि च धन्यम् |
ब्रह्माण्डान्तर्यद्-यद् ध्येयं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ||१२||
इस स्तोत्र का जो नित्य पाठ करता है वह आत्मज्ञान एवं मोक्ष दोनों को पाकर धन्य हो जाता है | निश्चित ही समस्त ब्रह्माण्ड मे जिस-जिसका भी ध्यान किया जाता है, उनमें से कुछ भी श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है, श्री गुरुदेव से बढ़कर नहीं है ||१२||
|| वृहदविज्ञान परमेश्वरतंत्रे त्रिपुराशिवसंवादे श्रीगुरोःस्तोत्रम् ||
||यह गुरुस्तोत्र वृहद विज्ञान परमेश्वरतंत्र के अंतर्गत त्रिपुरा-शिव संवाद में आता है ||