🚩🔔मंदिर मनातले🔔🚩
🌹☆ॐ☆ॐ☆ॐ☆ॐ☆🌹
🚩असे असावे मनातील मंदिर !
जेथे होईल मनच स्थीर !!
🚩अस असावा मंदिराचा खांब !
म्हणेल जो विकारांना थाब !!
🚩असी असावी मंदिराची भिंत !
मिटेल जेथे जातीभेदाची खंत !!
🚩असी असावी मंदिराची पायरी !
मिळेल जेथे सदगुणांना उभारी !!
🚩असा असावा मंदिरात दिवा !
देईल जो ज्ञानाचा प्रकाश नवा !!
🚩असाअसावा अगरबत्तीचा सुगंध !
असेल त्यात भक्तीभावाचा गंध !!
🚩असी असावी मंदिरात घंटा !
वाजताच जी मीटेल मनातील तंटा !!
🚩असा असावा मंदिरात पुजारी !
सदभानेचा जप जो नित्य करी !!
🚩असीच असावी मंदिरातील मुर्ती !
मीळेल जेणे सतकार्याची स्फुर्ती !!
🚩अशीच करावी मंदिरात आरती !
फुलवील जी चित्ताची धरती !!
🚩असाच मिळावा तेथे प्रसाद !
त्यात हवा प्रसन्नतेचा स्वाद !!
🚩असे असावे मंदिराचे गाव !
तेथे हवा सर्वांचा पुज्य भाव !!
🚩अशांचा हवा नित्य सहवास !
जे कधी न करीती दुस्वास !!
🚩असा असावा मंदिराचा कळस !
पाहताच व्हावा दुर आळस !!
🚩कधी न करावे मंदिराचे घर !
नित्य वाटावे घरच मंदिर !!
🚩नित्य सोहळा पुजा विधीचा !
संकल्प करु "व्यसन मुक्तीचा" !!
🚩दास जपे नित्य चित्तात माळ !
सुखी व्हावे सारे वृद्ध आबाळ !!
Sunday, 18 December 2016
मंदिर मनातले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment