🙏🙏🕉🔔🕉🙏🙏
*॥जय श्रीराम ॥*
*।। संकटनिरसनं भीमरूपी मारुतिस्तोत्रं।।*
*भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |*
*वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||*
*महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |*
*सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||*
*दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |*
*पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||*
*लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |*
*पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||*
*ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें |*
*काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||*
*ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती |*
*नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||*
*पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं |*
*सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||*
*ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |*
*चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||*
*कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |*
*मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||*
*आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |*
*मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||*
*अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |*
*तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||*
*ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |*
*तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||*
*आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |* *वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||*
*धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |*
*पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||*
*भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं |*
*नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||*
*हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |*
*दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||*
*रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |*
*रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||*
*॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥*
*ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ*
🕉🕉🔔🙏🔔🕉🕉
No comments:
Post a Comment