Monday, 30 October 2017

राम रक्षा आणि शिवस्तोत्र

सोमवार शिव स्त्रोत्र व् रामरक्षा
।।ॐ गणेशाय नमः।।
जयश्रीराम

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः ।
सीता शक्तिः । श्रीमद् हनुमान कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
॥ इति ध्यानम् ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतं अजं विभुम् ॥ ३॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५॥
जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखिलं वपुः ॥ ९॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १०॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥
जगजैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २०॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥ २२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः ॥ २३॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४॥
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः ॥ २५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २७॥
श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरम् ।
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तम् ।
श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥ ३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगम् ।
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यम् ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४॥
आपदां अपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५॥
भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥ ३६॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने।
रामरक्षास्त्रोत्र संपूर्णम्।।

श्री शिवपन्चाक्षरस्तोत्र

शिवाची स्तोत्रे
 

ॐ (जवळ जवळ प्रत्येक शुद्धमंत्राच्या सुरुवातीला लावला जातो) नमः शिवाय – ही पाच अक्षरे असलेला हा मंत्र नंदी ऋषींनी सिद्ध केला व महादेवास प्रार्थना केली की, त्याच्या कृपेचे वहन श्रद्धावानांपर्यंत नंदी ऋषींच्या माध्यमातून होऊ दे. आपण जे शिवाचे वाहन नंदी पाहतो ते नंदी ऋषी आहेत. महाशिवरात्रीचा मध्य घेवून आधीचा एक सप्ताह आणि नंतरचा सप्ताह मिळून नंदी पंधरवडा असतो, ज्या दिवसांमधे नंदी ऋषींनी ॐ नमः शिवाय हा मंत्र सिद्ध केला.

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्मान्गरागाय महेश्वराय |
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै 'न'काराय नमःशिवाय || १ ||

मन्दाकिनीसलिल्चन्दनचर्चिताय
नन्दीश्वरममथनाथमहेश्वराय |
मन्दारपुष्प्बहुपुष्पसुपूजिताय
तस्मै 'म'काराय नमःशिवाय || २ ||

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द
सूर्याय दक्षाद्वरनाशकाय |
श्रीनीलकण्ठाय वृषद्वजाय
तस्मै 'शि'काराय नमःशिवाय || ३ ||

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय |
चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय
तस्मै 'व'काराय नमःशिवाय || ४ ||

यक्षस्वरुपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय |
दिव्याय देवाय दिगम्बराय
तस्मै 'य'काराय नमःशिवाय || ५ ||

पन्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ |
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते || ६ ||

इति श्रीमच्छन्कराचार्यविरचितं शिवपन्चाक्षरस्तोत्रं सम्पुर्णम

द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।

उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।

सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।

हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।

सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥

एतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति।

कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः॥:

Sunday, 29 October 2017

भावांमधील नाते

भावांमधील नाते

आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.
         भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.

माणुसकी हा एकच धर्म,,,,,,,,, मेल्यावर खांदा देऊन काय उपयोग,,,,,,जिवंत असताना हात द्या एकमेकांना,,,,

कुणी लिहले माहित नाही पण मला आवडले म्हणून शेअर केले..

*लिहिणाऱ्याला नमस्कार*

Saturday, 28 October 2017

श्रीदत्त अथर्वशीर्ष

जय गुरुदेव -
||श्री दत्त अथर्वशीर्ष||
॥ हरिः ॐ ॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय
दिगंबरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥१॥
त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी
त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥२॥
त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः
विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः
त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥३॥
त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः
त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः
त्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः
ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥४॥
त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः
दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः
करुणाकरः भवभयहरः ॥५॥
त्वं भक्तकारणसंभूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः
त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी
श्रीमन्नृसिंहसरस्वती­ त्वं श्रीनृसिंहभानः
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः
त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती
त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥६॥
त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् ।
दीने आर्ते मयि दयां कुरु
तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।
हे भगवन्, वरददत्तात्रेय,
मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि ।
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥७॥
॥ ॐ दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

Friday, 27 October 2017

श्री दत्त नमस्काराष्टक

🌹 *श्री दत्त उपासना* 🌹

*श्री दत्त नमस्काराष्टक*

श्रीगणेशाय नमः ॥ अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रप्रारंभः ॥
सदा प्रार्थितों श्रीगूरूच्या पदांसी ॥ धरीतों शिरीं वंदितों आदरेंसीं ॥
धरूनी करीं तारिं या बाळकासी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥१॥
मतीहीन मी दीन आहें खरा हो ॥ परी दास तूझा करीं पाखरा हो ॥
जसें लेंकरूं पाळिते माय कूशीं ॥ नमस्कार० ॥२॥
लडीवाळ मी बाळ अज्ञान तुझा ॥ गुरुवांचुनीं पांग फेडील माझा ॥
तुझ्यावीण दूजा कुणी ना अम्हांसी ॥ नमस्कार० ॥३॥
पिता माय बंधू सखा तूंचि देवा ॥ मुलें मित्रही सोयरे व्यर्थ हेवा ॥
कळोनी असें भ्रांति होई अम्हासीं ॥ नमस्कार० ॥४॥
चरित्रें गुरूचीं करी नित्यपाठ ॥ जया भक्ति लागे पदीं एकनिष्ठ ॥
तयाचे कुळीं दीप सज्ञानराशी ॥ नमस्कार० ॥५॥
वसे उंबरासन्निधीं सर्व काळ ॥ जनीं काननीं घालवी नित्य काळ ॥
तया सद्गुरूचें नाम कल्याणराशी ॥ नमस्कार० ॥६॥
श्रमोनी गुरूपाशिं तो म्लेच्छ आला ॥ तया स्फोटरोगांतुनी मुक्त केला ॥
कृपेनें तसें स्वामि पाळीं आम्हांसी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥७॥
सती अनुसूया सूधी आदिमाता ॥ त्रयीमूर्ति ध्यानीं मनीं नित्य गातां ॥
हरे रोगपीडा दरिद्रासि नाशी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥८॥
करोनी मनीं निश्चयो अष्टकाचा ॥ जनांनो करा पाठ दत्तस्तुतीचा ॥
करी माधवाच्या सुता दासदासीं ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥९॥
इति श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रं संपूर्णम् ॥

*अशोककाका कुलकर्णी*

अठरा पुराणांची नावे

*🔯अठरा पुराणांची नांवे-🔯*
__________s___________

♦मत्स्यपुराण,
♦वायुपुराण,
♦भागवतपुराण,
♦विष्णूपुराण,
♦ गरुडपुराण,
♦ ब्रह्मपुराण,
♦ नारदपुराण,
♦ वामनपुराण,
♦ कुर्मपुराण,
♦पद्मपुराण,
♦स्कंदपुराण, ♦मार्कंडयपुराण,
♦शिवपुराण,
♦ अग्नीपुराण,
♦वराहपुराण,
♦ ब्रम्हांडपुराण, ♦ब्रह्मावैवस्वतपुराण आणि
♦ भविष्यपुराण

*१८ पुराणांची थोडक्यात माहिती......*

*१. मत्स्यपुराण :*
भगवान विष्णूने मत्स्यरूपाने मनूला सांगितलेले हे पुराण इ.स.च्या दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे आणि त्याचा मूळचा भाग इ.स.पू ६००ते ३०० च्या दरम्यानचा असावा, असे म्हणतात. दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, नासिक वा नर्मदातीर या ठिकाणी ते लिहिले गेले असावे, अशी मते आढळतात. याचे २९१ अध्याय असून श्लोक सु. १४-१५ हजार आहेत. स्वल्पमत्स्यपुराण या नावाने याचे एक संक्षिप्त स्वरूपही आढळते. यात फार कमी प्रमाणात भर पडलेली असून यातील राजवंशाची हकिकत विश्वसनीय आहे. याच्या ५३ व्या अध्यायात सर्व पुराणांची विषयानुक्रमणी आलेली आहे. यात वितृवंश, ऋषिवंश, राजवंश, राजधर्म, हिमालय, तीर्थे इ. विषयांचे वर्णन प्रामुख्याने आलेले आहे.
*२. वायूपुराण :*
वायूने सांगितल्यामुळे वायुपुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे, असे डॉ. भांडारकरांचे मत असून काहीजणांनी त्याचा काळ सु.इ.स.३०० हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोदघात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणात ११२ अध्याय असून त्याची श्लोकसंख्या सू.११ हजार आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचीही वर्णने आढळतात. यात शिवचरित्राचे विस्तृत वर्णन असून भौगोलिक वर्णनांसाठीही हे पुराण प्रसिद्ध आहे.
*३. भागवतपुराण :* भागवतधर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले, असे म्हटले जाते. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले, असेही एक मत आहे. त्याचा काळ इ.स.पू. तिसरे शतक, इ.स.चे पाचवे ते दहावे शतक, असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तमिळनाडूमध्ये लिहिले गेले, असे मत आढळते. १२ स्कंधांत विभागलेल्या या पुराणात सु. १८ हजार श्लोक आहेत. हे पुराण दहा लक्षणांनी युक्त असून कृष्ण हा नायक आहे. भक्ती,तत्त्वज्ञान इ. दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रासपंचाध्यायी इ ,भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषांत व इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. चातुर्मास्यात भागवतसप्ताह करण्याची पद्धत सर्व भारतात आहे.
*४. विष्णूपुराण :* विष्णूभक्तिला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवतपुराणाखालोखाल महत्त्वाचे असून वैष्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्त्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले, असे म्हटले आहे. इ.स.च्या ३ ते ५ या शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. बलदेव उपाध्यांच्या मते इ.स.पू. दुसरे शतक हा त्याचा काळ होय. हे पुराण सहा अंशांत विभागलेले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत सु. सहा-सात हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुराणाइतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाही.यात अनेक आख्यानांबरोबरच कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे.
*५. गरुडपुराण :*
विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने या पुराणाद्वारे वैष्णव तत्त्वांचे वर्णन केले, म्हणून याला गरुडाचे नाव प्राप्त झाले. हे इ.स.च्या सातव्या चे दहाव्या शतकांत तयार झाले असावे, असे दिसते. डॉ हाझरा यांच्या मते हे मिथिलेत लिहिले गेले. याचे अध्याय २६४ असून श्लोक सु. ७ हजार आहेत. याच्या पूर्वखंडात व्याकरण, छंद साहित्य, वैद्यक इ. विषयांची माहिती असल्यामुळे हे विश्वकोशात्मक बनले आहे. याच्या उत्तरखंडाच्या 'प्रेतकल्पा' त और्ध्वदेहिराची माहिती आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसपर्यंत घरी गरुडपुराणाचा पाठ करण्याची प्रथा आहे. याच्या उत्तरखंडाचे जर्मन भाषांतर झाले आहे.
*६. ब्रह्मपुराण :*
ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण म्हटले जाणारे हे पुराण पुराणांच्या यादीत पहिले असल्यामुळे त्याला 'आदिपुराण' म्हटले जाते. त्यात सूर्योपासना वर्णिलेली असल्यामुळे त्याला सौरपुराण असेही म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावांच्या उपपुराणांहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्यपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत, असे एक मत आहे. हे पुराण इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांपुर्वी बनले असावे आणि दहाव्या, बाराव्या व पंधराव्या शतकांत त्यात भर पडली असावी; त्याचा काही भाग ओरिसात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा इ. मते आढळतात.या पुराणात २४५ अध्याय असून सु. १४ हजार श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्यतत्त्वज्ञान, वैदिक ग्रंथांतील उपाख्याने इ. महत्त्वाचे विषय आले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थांचे माहात्म्य १०६ अध्यायांत आले आहे.
*७. नारद पुराण :*
या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण, नारदपुराण आणि बृहन्नारदीयपुराण अशी समान नावांची तीन पुराणे आढळतात. यांपैकी महापुराण कोणते, यांविषयी संदिग्धाच आहे. यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ.स.७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात. याचे दोन भाग असून पूर्वभागात १२५ आणि उत्तरभागात ८२ अध्याय आहेत. यातील श्लोकसंख्या बलदेव उपाध्यायांच्या मते २५ हजार तर पां.वा. काणे यांच्या मते ५,५१३ इतकी आहे. याच्या ९२ ते १०९ या अध्यायांत १८ पुराणांची विस्तृत विषयानुक्रमणी आलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झाले आहे.
*८. वामनपुराण :*
यात वामनावताराचे वर्णन विशेषत्वाने असून पहिल्या श्लोकात वामनालाच नमस्कार केलेला आहे. हे पुराण पुलस्त्य ऋषीने नारदाला सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या वा सहाव्या ते नवव्या शतकांत हे पुराण तयार झाले असावे, अशी मते आढळतात. याची निर्मिती कुरुक्षेत्राला परिसरात झाली असावी, असे दिसते. याच्या उपलब्ध प्रतींत ९५ अध्याय व सु. ६ हजार श्लोक आहेत.याचा उत्तर भाग लुप्त झाला आहे. यात शैव, कालदमन, पाशुपत व कापालिक अशा चार शैव संप्रदायाचे वर्णन असून वैष्णव व पाशूपत शैव या दोहोंना समान महत्त्व दिलेले आहे. यात असुरांच्या कथा असून शिवपार्वतीचे विस्तृत चरित्र आलेले आहे. कालिदासाचे कुमारसंभव व वामनपुराण यांत वरेच साम्य आढळते.
*९. कूर्मपुराण :*
विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला हे पुराण सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या दुसऱ्याक, पाचव्या वा सहाव्या-सातव्या शतकांत ते तयार झाले असावे, अशी मते आहेत. याचे पूर्वार्ध (५३ अध्याय) व उत्तरार्ध(४६ अध्याय) असे दोन भाग असून उपलब्ध ग्रंथात सु.६ हजार श्लोक आहेत. नारदसूचीप्रमाणे याच्या ब्राह्मी, भागवती, सौरी व वैष्णवी अशा चार संहिता होत्या; परंतु सध्या फक्त ब्राह्मी संहिताच उपलब्ध आहे. याचे नाव वैष्णव असले, तरी हे शैवपुराण असल्यामुळे शिव व दुर्गा याचे माहात्म्य हेच याचे मुख्य विषय आहेत. यात पाखंड मते दिलेली असून वाममार्गीयांच्या यामलयंत्र या ग्रंथाची माहितीही दिलेली आहे. याच पुराणात 'ईश्वरगीता' व 'व्यासगीता' अशा दोन गीता आलेल्या आहेत. तेनकाशीच्या एका राजाने सोळाव्या शतकात या पुराणाचे तमिळमध्ये भाषांतर केलेले आहे.
*१०.पद्मपुराण :*
या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुराणांत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्या पुराणाचा बराचसा भाग इ.स.च्या पाचव्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आहे; आणि त्याचा उत्तरखंड मात्र सोळाव्या शतकानंतरच्या असावा, असे मत आढळते. बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतींत आढळणारे हे पुराण सु ५५ हजार श्लोकांचे असून श्लोकसंख्येच्या बाबतीत ते स्कंदपुराणाखालोखाल आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असून त्याचे ६२८ अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे सहा खंड मानले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा व तीर्थमाहात्म्ये हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत.उत्तरखंडाला जोडलेले 'क्रियायोगसार' हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शांकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे, असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात.
*११. स्कंदपुराण :*
स्कंदाने सांगितल्यामुळे त्याचे नाव मिळालेले हे पुराण इ.स.च्या सातव्या व नवव्या शतकांच्या दरम्यानचे असावे, असे म्हटले जाते.सर्व पुराणांत आकाराने मोठे असलेले हे पुराण ८१ हजार श्लोकांचे आहे. ते सनत्कुमार, सुत, शंकर, वैष्णव, ब्राह्मव सौर अशा सहा संहितांमध्ये विभागलेले असून माहेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, तापी व प्रभास या सात खंडांतील दुसरीही एक विभागणी आढळते.याच्या सूतसंहितेत ब्रह्मगीता व सूतगीता आहेत, तर रेवाखंडांत सत्यनारायणव्रताची कथा आहे.
*१२. मार्कंडेयपुराण :*
मार्कंडेय ऋषींनी सांगितल्यामुळे त्यांचे नाव प्राप्त झालेले हे पुराण अत्यंत प्राचीन असून त्याचा प्राचीन भाग इ. स. तिसऱ्या शतकाच्याही आधीचा असावा, असे म्हणतात. बलदेव उपाध्यायांच्या मते गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकांत झाले असावे. ते गोदावरीच्या उगमप्रदेशांत लिहिले गेले असावे, असे मत आढळते.यात सामान्यतः पंचलक्षणे आढळत असून केवळ १३७ अध्यायांच्या या पुराणात सु. ६,९०० श्लोक आहेत. यात द्रौपदीचे पंचपतित्व, तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या इ. प्रश्नांची चर्चा असून हरिचंद्र ब्रह्यवादिनी मदालसा, कृष्ण, मार्कंडेय इत्यादींच्या कथा आहेत. अग्नि,सूर्य, देवी इत्यादींची स्तोत्रे असून 'दुर्गासप्तशती' या नावाने विख्यात असलेले देवीमाहात्म्य १३ अध्यायांत वर्णिलेले आहे. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केलेले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषेतही भाषांतर झाले आहे.
*१३. लिंगपुराण :*
शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून या पुराणाद्वारे मोक्षादींचे विवेचन केले, या समजुतीमुळे याला लिंगपुराण हे नाव मिळाले आहे. याचा काळ सु, सातवे-आठवे शतक असण्याची शक्यता आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्धा असे दोन भाग असून, पूर्वार्धाचे १०८ व उत्तरार्धाचे ५५ अध्याय आहेत. त्यांपैकी उत्तरार्धाचे काही अध्याय गद्य आहेत. याची श्लोकसंख्या सु. अकरा हजार असून सु. सहा हजार श्लोकांचे आणखी एक छोटे लिंगपुराण होते, असे दिसते. यात ब्रह्मांडरुपी लिंगाची उत्पती, लिंगपूजा, शैवव्रते,शिवाचे २८ अवतार, काशीचे वर्णन ,तंत्रविद्या इ.विषय प्रामुख्याने आले असून हा लिंगायतांचा एक प्रमुख धर्मग्रंथ मानला जातो.
*१४. अग्निपुराण :*
अग्नीने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नीचे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, असे म्हणतात. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगालात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे, असे एक मत आहे. ३८३ अध्यायांच्या या पुराणात पंचलक्षणे आढळत असली, तरी परा व अपरा विद्यांचे वर्णनच महत्त्वाचे आहे. रामायण व महाभारताचे सार, बुद्धावतारासह इतर अवतार इ.विषयांबरोबरच छंद, व्याकरण, अलंकार, योग, ज्योतिष मंदिरे, मूर्ती, धर्म इत्यादींची शास्त्रे यात वर्णिलेली आहेत. यात गीतासार व यमगीता आलेली असून आयुर्वेद, वृक्ष आणि पशूंचे वैद्यक, रत्नपरीक्षा, धनुर्विद्या, मोहिनी व इतर काही इ. विषयांचे विवेचन आलेले आहेत.
*१५. वराहपुराण :*
वराहावतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत असून, ते नवव्या-दहाव्या शतकांत तयार झाले असावे आणि त्याचा काही भाग अकराव्या व काही भाग पंधराव्या शतकातील असावा, असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा नेपाळात लिहिला गेला असावा, असा तर्क आढळतो. याचे गौडीय व दक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. याचे २१८ अध्याय असून त्यांपैकी काही गद्यात्मक आहेत, तर काहींमध्ये गद्य व पद्य यांचे मिश्रण आहे. यात २४ हजार श्लोक असल्याचा उल्लेख आढळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सु. १० हजार श्लोकच आढळतात. व्दादशीच्या व्रतासारखी अनेक वैष्णव व्रते यात असून रामानुज संप्रदायाने यातून अनेक वैष्णव अनेक विषय स्वीकारले आहेत. यात मथुरामाहात्म्य, नचिकेत्याने उपाख्यान इ. विषय प्रामुख्याने आले आहेत.
*१६. ब्रह्मांडपुराण :*
ब्रह्मांडाची उत्पती आणि विस्तार यांचे वर्णन हा याचा मुख्य विषय असल्यामुळे याला ब्रह्मांड हे नाव मिळाले आहे. हे वायूने व्यासांना सांगितले असल्यामुळे याला वायवीय ब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. वायु व ब्रह्मांड ही पुराणे एकच असून वायुपुराणात थोडा फरक करून ब्रह्मांडपुराण बनविलेले आहे. त्यातील परशुरामचरित्राचा भाग हा वायुपुराणापेक्षा अधिक आहे. इ.स.च्या चौथ्या ,पाचव्या ला सहाव्या शतकात हे तयार झाले असावे, अशी मते आहेत. गोदावरीच्या उगमाचा प्रदेश वा सह्याद्री हे याचे निर्मितिस्थान असावे, असे दिसते. याचे प्रक्रिया, अनुषंग, उपोदघात व उपसंहार असे चार पाद असून श्लोक सु. १२ हजार आहेत. यात परशुराम व कार्तवीर्य यांचा संघर्ष. ललितादेवीचे आख्यान, क्षत्रियराजवंशाचे वर्णन इ. विषय प्रमुख आहेत. अध्यात्मरामायण हा ग्रंथ आणि ललितासहस्त्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ. भाग या पुराणातून घेतलेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांतील भाषेत त्याचे भाषांतर झाले असून ते अजूनही तेथे प्रचारात आहे.
*१७. ब्रह्मवैवर्तपुराण :*
कृष्णाने ब्रह्याचे विवरण केल्याचे वर्णन यात असल्यामुळे याला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. याला दक्षिणेत ब्रह्मकैवर्तपुराण असे म्हणतात.आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. आठवे, नववे वा दहावे शतक हा त्याचा काळ मानलेला असून काहींच्या मते ते पंधराव्या शतकानंतरचे आहे. बहुधा बंगालमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुराणाविषयी बंगाली वैष्णवांना फार आदर आहे. याचे २७६ अध्याय असून श्लोक सु. १८ हजार( एका मतानुसार सु.१० हजार) . ब्रह्म, प्रकृती, गणेश व कृष्णजन्म अशा चार खंडांत विभागलेल्या या पुराणाचा कृष्णजन्म खंड १३३ अध्यायांचा आहे. यात गणेश हा कृष्णाचा अवतार मानलेला असून उत्तान रासक्रिडा, अनेक माहात्म्ये इ. गोष्टी आढळतात.
*१८. भविष्यपुराण :*
वस्तुतः पुराण हे प्राचीन असल्यामुळे भविष्यपुराण या नावात आत्मविसंगती आहे. परंतु भविष्यकालीन घटनांची व व्यक्तिंची वर्णने करण्याची भूमिका घेतल्यामुळे याला भविष्यपुराण हे नाव मिळाले आहे. भविष्योत्तर पुराण या नावाचे एक स्वतंत्र पुस्तक असून काहींच्या मते ते भविष्यपुराणाचे उत्तर पर्व आहे. काहीच्या मते ते स्वतंत्र पुराण आहे. याचा काळ सु. सहावे-सातवे वा दहावे शतक हा मानला जात असला, तरी आपस्तंबधर्मसूत्रात त्याच्या नावनिशी उल्लेख असल्यामुळे त्याचा निदान काही भाग तरी अत्यंत प्राचीन असला पाहिजे. नारदपुराणानुसार याची ब्राह्म, विष्णू, शिव, सूर्य व प्रतिसर्ग अशी पाच पर्वे असून श्लोकसंख्या सु. १४ हजार आहे. याच्या वेगवेगळ्या चार प्रती मिळालेल्या आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा यात जास्त भर पडली असल्यामुळे याचे मूळचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यात इंग्रजी अमदानीतील घटनांचीही वर्णने आली आहेत. उदा, व्हिक्टोरिया राणीला यात विकटावती म्हटले आहे, तर रविवारला संडे म्हणतात, असे सांगितले आहे. यात सूर्योपासना विशेषत्वाने आली असून कित्येक घटनांची व राजवंशांची वर्णने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहे