Wednesday, 25 October 2017

गुरु स्तुति

|| श्री गुरुस्तुति ||

श्रीगुरुस्तुतिजो सत्य आहे परिपूर्ण आत्मा |
जो नित्य राहे उदित प्रभात्मा |ज्ञानेज्याच्या नर हो कृतार्थ |
तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||१||अखंड आत्माअविनाशी दत्त |
तया पदी लाविती जे स्वचित्त |वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ |
तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||२||
जो जागृती स्वप्न सुषुप्तीसाक्षी |
जो निर्विकारे सकला निरीक्षी |वीक्षी परी ज्यासी नसे निजार्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||३||
जळी स्थळी सर्वही वस्तुमाजी | व्यापुनी राहेचि तयासी राजी |
जो ठेवी भावे नर हो कृतार्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||४||
जे दृश्य ते रूप नसे जयाचे | दृश्यांत राहे अविकारी ज्याचे |स्वरूप तोची अविनाशी अर्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||५||
दृश्यासी घेता नच घेववे जे | स्वरूप तत्स्थ प्रभुचे स्वतेजे |स्वये प्रकाशे जगी जोपरार्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||६||असोनी सर्वत्र गुरुप्रसादा | विना न लाभे करताही खेदा |भेदाची वार्ता करी जो अपार्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||७||अनन्य भावे भजता अनन्य | लभ्य प्रभू जो नच होई अन्य |सन्यस्त सर्वेषण तारणार्थ| तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ||८||मागे तुकाराम तयासी दत्त | दे वासुदेव करुनी निमित्त |हे स्तोत्र चिन्मात्रपदा समर्थ | द्याया हराया सकलाध्यानार्थ ||९||गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकामाधी|उदेले स्तोत्र हे आधिव्याधि हारी हरी कुधी||१०||इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्यश्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितंगुरुस्तुति: संपूर्णम् ||

No comments:

Post a Comment