🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺
*तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा !*
ह्रदयी कळवळा वैष्णवाचा !!
-------------------------------------
तुळसीचे दर्शन घेतल्याने पापाचे कळप नाश पावतात.
स्पर्शाने शरीर पावन होते वंदन केल्याने रोग नाहीसे होतात. पाणी घातल्याने यमाची भिती नाहीसी होते. तुलसीपत्र देवाला अर्पण केल्यास मुक्ती मिळते.
जयाचिये द्वारी तुळसी वृदावंन ! धन्य ते सदन वैष्णवाचे !!
वृन्दा वृदावंनी विश्व पुजीता विश्वपावनी !
पुष्पसारा नंदीनीच तुलसी कृष्णजीवनी !!
* देह छत्तीस तत्वाचा आहे व गुण तीन
याचा गुणाकार 108.
म्हणजे या गुणातीत देहावर तुलसीपत्र तसेच
* सत्ताविस नक्षत्र व त्याचे चार चरण याचा गुणाकार 108.
तसेच
* बारा राशि व नऊ ग्रह याचा गुणाकार 108.
* उपनिषदे 108 म्हणून 108 मणी .
* जगात 108 तिर्थ आहेत म्हणून 108 मण्यांची माळ.
सर्व तिर्थाचं स्नान केल्याच पुण्य पदरात पङते.
अशी पवित्र तुलसी माळ धारण करून,
लल्लाटे केशवं कंठे श्रीपुरूषोत्तमं ! नाभो नारायणं देवं वैकुंठ ह्रदयेस्तथा !!
दामोधर वामपाश्वे दक्षीनेच त्रिवीक्रमं !मुर्घीचैव ह्रषीकेशं पद्मनाभं पृष्टत: !!
कर्णयो यमुना गंगे बाहो कृष्णं हरि तथा ! यथा स्थानेशु तृष्यन्ती देवता द्वादशा स्मृता !!
द्वादशेतानी नामानी कर्तव्यो तिलक पठेत ! सर्व पाप विशुद्वात्मा विष्णुलोकं स गच्छति !!
कपाळ- केशव
कंठ - पुरूषोत्तम
नाभी - नारायण
ह्रदय - वैकुंठ
पोटाची ङावी बाजू - दामोधर
पोटाची उजवी बाजू - त्रिवीक्रम
ङोक्यावर ( शेंडीच्या ठिकाणी ) - ह्रषीकेश
पाठ - पद्मनाभ
ङावा कान - यमुना
ऊजवा कान - गंगा
ङावा दंङ - कृष्ण
उजवा दंङ - हरि
या बारा श्री विष्णूच्या नामाने व वैष्णवाविषयी ह्रदयात कळवळा असणारा भक्त
सर्व पापातुन मुक्त होऊन वैकुंठाला प्राप्त होतो
म्हणून तर संत महात्मे म्हणतात,
होय होय वारकरी !
पाहे पाहे रे पढंरी !!
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺
No comments:
Post a Comment