Monday, 16 May 2016

श्रीसूर्यस्तुति

श्रीसूर्यस्तुति जयाच्या रथा एकची चक्र पाही । नसे भूमि आकाश आधार काही । असे सारथी पांगुळा ज्या रथासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १ ॥ करी पद्म माथां किरीटी झळाळी । प्रभा कुडलांची शरीरा निराळी । पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ २ ॥ सहस्त्रद्वये दोनशें आणि दोन । क्रमी योजनें जो निमिषार्धतेन । मना कल्पवेनाजयाच्या त्वरेसी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ३ ॥ विधिवेद कर्मासि आधारकर्ता । स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता । असे अन्नदाता समस्तां जनासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ४ ॥ युगे मंत्र कल्पांत ज्याचेनि होती । हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती । क्षयाती महाकाळरुप प्रकाशी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ५ ॥ शशी तारका गोवुनी जो ग्रहातें । त्वरें मेरु वेष्टोनिया पूर्वपंथे । भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ६ ॥ समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या । म्हणोनीच तूं श्रेष्ठ तया नाम सूर्या । दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ७ ॥ महामोह तो अंधकारासि नाशी । प्रभा शुद्ध सत्वाचि अज्ञान नाशी । अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ८ ॥ कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची । न पाहूं शके शत्रु त्याला विरंची । उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ९ ॥ फळे चंदनें आणि पुष्पें करोनी । पुजावे बरे एकनिष्ठा धरोनीं । मनीं इच्छिले पाविजे त्या सुखासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १० ॥ नमस्कार साष्टांग बापा स्वभावें । करोनी तया भास्करालागिं घ्यावें । दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ११ ॥ वरी सूर्य आदित्य मित्रादि भानू । विवस्वान इत्यादिही पादरेणू । सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १२ ॥ ॥ इति श्रीसूर्यस्तुति ॥ Shri SuryaStuti (Marathi) श्रीसूर्यस्तुति

No comments:

Post a Comment