🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे... रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*डॉ. गजानन पाटील*
*DICPD रायगड*
*भाग ०५*
_*फ्लॅश नोटस् काढण्याचे तंत्र*_
📝📝📝
*माझ्या प्रिय मुलांनो...*
*फ्लॅश नोटस् म्हणजे काय ?* 📝
*फ्लॅश नोटस् म्हणजे पाठय पुस्तकातील एक किंवा सर्व पाठयघटक संक्षिप्त स्वरूपात किंवा कोडींग करुन छोटयाशा कागदावर मांडली जाते त्यास फ्लॅश नोटस् असे म्हणतात .*
*फ्लॅश नोटस् काढण्याचे तंत्र कसे शिकलो*
*मी महाविद्यालयात शिकत होतो तेंव्हा सर उद्या काय शिकवणार आहेत तो भाग आदल्या दिवशी वाचून जायचो . प्रत्येक तासाला जे शिकवले जायचे त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण करायचो . घरी आल्यावर ए फोर साईझच्या कागदाला ३ घड्या घालून एका बाजूला स्टेपल करुन ३ बाजू कट केल्यावर पाटकोरी १६ पानांची छोटी वही तयार होते. त्या वहीवर श्रवण केलेले सर्व मुद्दे कोडींग करून लिहायचो . उदाहरणार्थ _भारताची प्राकृतिक रचना _ हा घटक असला तर मुख्य मुद्यातील पहिले अक्षर घेवून एक संकेतशब्द तयार करायचो . जसे - स्था= स्थान , ह= हवामान , ता= तापमान , प=पर्जन्यमान , प्रा= प्राकृतिक रचना , प= पर्वत , प=पठारे , म= मैदाने ,न= नद्या , पि= पिके , उ= उद्योगधंदे आता हे सगळे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी त्याचा एक अर्थपूर्ण अथवा अर्थहिन संकेतशब्द तयार करायचो जसे - _स्थाहतापप्रापपमनपिउ_ एवढा ११ अक्षरी शब्द त्या छोटया वहीत लिहिला की जन्मभर हा घटक स्मरणात राहिला म्हणून समजा . एका शब्दात एक घटक म्हणजे दोन पानावर सगळा विषय बसायचा .हे तंत्र माझ्या लक्षात आलेवर सर्व विषय त्या छोटया वहीत ठेवू लागलो . त्यामुळे भाराभर पुस्तके , नोटस् , गाईड , संदर्भ पुस्तके सोबत न्यायची गरजच भासायची नाही . सगळे विषय खिशात असायचे . मग त्या नोटसना _फ्लॅश नोटस_ असे नाव दिले कारण नोटस् हातात घेवून नुसती नजर फिरविल्यावर वर्षभरात सर्व विषयांचा जो अभ्यास झाला त्याचा एकत्रित फ्लॅश मेंदूत पडायचा आणि वर्गातील सर्व व्याख्याने , चर्चा , वाचन , लेखन क्षणात आठवायचं. म्हणून त्यांना फ्लॅश नोटस् असे नाव दिले . आजही मी महत्वाच्या बाबींची नोंद ठेवण्यासाठी फ्लॅश नोटस् वापरतो .*
_*तुम्ही या तंत्राचा वापर असा करावा*_
☄ *तुमच्या गरजेनुसार अथवा मर्जीनुसार एका विषयाला एक किंवा सर्व विषयांना एक अशी वर सांगितले प्रमाणे छोटी वही तयार करा .*
☄ *खरं तर हे काम शाळा सुरू झालेल्या दिवसापासूनच करायचे असते पण हरकत नाही आता जसे वाचत जाल तसे घटकनिहाय मुद्यांचे अर्थपूर्ण अथवा अर्थहिन शब्द तयार करा ते वहीत नोट करून ठेवा .*
☄ *परीक्षेला जाण्यापूर्वी १ दिवस आगोदर विषय निहाय नोटस् नुसत्या नजरेखालून घाला . तुम्हाला सगळे आठवायला लागेल .*
☄ *परीक्षेला जाण्यापूर्वी याच नोटस् वरून नजर फिरवा . सगळा विषय मेंदूत जावून फ्लॅश होतो . त्यामुळे परीक्षेच्या आगोदर किमान १६ तास पुस्तक , गाईड किंवा इतर काहीच वाचू नका . फक्त फ्लॅश नोटस् च वाचा . प्रश्न कसाही आला तरी उतर मेंदूत तयार होते .*
☄ *गणितातील समिकरणे , विज्ञानातील सुत्रे , भाषेतील संदर्भ असो अथवा व्याकरण असो तुम्ही*
*फ्लॅश नोटस् काढण्यात पटाईत झाला की आपोआपच सगळे स्मरणात राहू लागते . पण त्यासाठी एकाग्रता आणि चिकाटी लागते . मग काय परीक्षेत पाहिले यायला खूप सोपे आहे.*
( _*उद्याच्या भागात वाचा*_
_*परीक्षेत पाहिलेच येण्याचे तंत्र*_)
*धन्यवाद ! ! !*
*डॉ.गजानन पाटील*
No comments:
Post a Comment