🚩 ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ🚩
तुच आरंभ तुच अंत
स्वामी आमचे भाग्यवेदांत🚩
तुम्ही पहाट तुम्हीच रात्र
आहेत स्वामी पाठीशी दिनरात् 🚩
पहाटेचा पहिला कीरण
रात्रीचा शितल चंद्र 🚩
दयेचा अथांग सागर
झुळूक हवेची असे मंजुळ🚩
तुम्ही असे पावसाच्या सरी
मातीचा सुगंध पसरे भुवरी🚩
पाण्याची खळखळ आहात स्वामी
पक्षांची कीलबिल आहात तुम्ही 🚩
भुतलाचे तुम्हीच स्वामी
विश्वस्वरूपाचे तुम्हीच धनी 🚩
तुम्ही ब्रम्हा तुम्हीच विष्णू
साक्षात असे तुम्ही निळकंठ शिवहरी🚩
हीच विनंती आहे स्वामी
वरदहस्त असो तुमचा आमच्या माथ्यावरी.🚩💐
🚩ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🚩
No comments:
Post a Comment