Thursday, 9 February 2017

तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे भाग 4

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय  मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  *डॉ. गजानन पाटील*
    *DICPD रायगड*

        *भाग ०४*

     _*त्राटक तंत्र*_

        👁   👁

*माझ्या प्रिय मुलांनो...*

( *या सदराच्या ३ भागाला आपण व आपल्या पालकांनी व्हॉटस अप वरून आणि प्रत्यक्ष भ्रमणध्वनी वरून  जो उंदड प्रतिसाद दिला त्या बद्दल  मी आपले व आपल्या पालकांचे मनापासून  आभार मानतो..* ) 🙏🏻🙏🏻🙏🏻

    *आज आपण या भागात शिकणार आहोत अभ्यासात एकाग्रता टिकविण्यासाठी*
_*त्राटक तंत्र.*_  *माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात* *माझे आद्य गुरु कै.दिगंबरशास्त्री कुलकर्णी यांनी मला ते शिकविले तेव्हा पासून आजपर्यंत या त्राटक तंत्राचा वापर करून* *अभ्यासात एकाग्रता तयार करण्यासाठी उपयोग करतो आहे .आपणासही तो व्हावा त्यासाठी हे तंत्र मी संक्षिप्त स्वरूपात आपणास सांगत आहे .*

*त्राटकचा  मूळ अर्थ अश्रू असा आहे . डोळ्याची पापणी न लवता, डोळ्यातील अश्रू रोखून  एकटक बिंदूकडे  पहाणे म्हणजे बिंदू त्राटक होय . तसे बिंदू त्राटक, अग्र त्राटक,   ज्योती त्राटक, शक्ती त्राटक, केंद्र  त्राटक , चंद्र त्राटक आणि सूर्य  त्राटक  असे त्राटकाचे  ७ प्रकार पडतात . एक एक प्रकार शिकून त्याचा नित्य सराव करून त्याची परीक्षा घेवून पुढील प्रकार शिकायचे असतात .सहा प्रकार शिकून झाल्यावर सातवा  _सूर्य त्राटक_  हा प्रकार सगळ्यात कठीण असतो . सूर्य मावळतीला जाण्यापूर्वी १ तास अगोदर पापणी न लवता सूर्यबिंबाकडे पहाणे खूप धोकादायक असते पण माझ्या गुरूंनी मला तेही तंत्र सहज अवगत करून दिले त्यामुळे डोक्यावर सूर्य असतानाही त्याच्या प्रखर प्रकाशाकडे मला सहज पहाता येते . असो . त्राटक हा योग धारणेचा एक भाग असून स्वसंमोहन शास्त्र शिकण्यासाठी प्रथम हे शिकावे लागते .आपली अभ्यासात  एकाग्रता टिकावी , स्मरण वाढावे म्हणून  मी आपणास बिंदू त्राटक कसे करायचे ते थोडक्यात सांगणार आहे .प्रथम त्राटक करण्याचे  फायदे पाहू*

  _*त्राटक करण्याचे फायदे*_

☄ *आपले मन चंचल असते . मनाच्या चंचलतेमुळे, मनाच्या भरकटलेपणामुळे  आपली एकाग्रता होत नाही, त्राटकामुळे मनाची चंचलता पूर्ण थांबून एकाग्रता वाढते .*
☄ *मन एकाग्र करण्याच्या सवयीमुळे आपली श्रवण शक्ती विकसित होते .*
☄ *श्रवण शक्ती विकसित झाली की आकलन निट होते .*
☄ *आकलन निट झाले की अभिरुची वाढते .*
☄ *अभिरूची वाढल्यावर आपोआपच स्मरण वाढते .*
☄ *सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या ध्येयाप्रत जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होते .*
☄ *दिवसातील केवळ १० मिनीटे त्राटक केल्यास २४ तास अलर्ट रहाण्याची सवय लागते .*
☄ *केवळ मुलांनी अभ्यासाठीच नव्हे तर पालकांनी , थोरा मोठयांनीही मन स्थिर रहाण्यासाठी त्राटक करणे फायदेशिर आहे . .*
☄ *नित्य त्राटक केल्याने डोळे सतेज होतात, डोळ्यांची शक्ती वाढते .*

_*बिंदू त्राटक करण्याची पद्धत*_

👁  *आपण जिथे बसणार आहात त्या समोरच्या  भिंतीवर एका कोऱ्या कागदावर २ इंच व्यासाचे वर्तुळ काढून ते काळ्या रंगाने रंगवावे . व ते भिंतीवर आपण बसल्यावर समान रेषेत दिसेल असे  चिकटवावे .*
👁  *रात्री  पूर्ण विश्रांती घेवून पहाटे लवकर उठावे . प्रातःविधी आटोपून साध्या किंवा पद्यासनात भिंतीवरील काळे वर्तूळ आणि आपले डोळे यात किमान ५ फुटाचे अंतर ठेवून शांत बसावे .*
👁  *दिर्घ श्वास घेवून मनातले सगळे वाईट साईट विचार उच्छ्वासा बरोबर काढून टाकावेत .*
👁 *दिर्घ श्वास घेताना माझे मन एकाग्र होणार आहे अशी सूचना द्यावी .*
👁 *पापणी न लवता त्या वर्तुळाच्या मध्य बिंदूकडे एकटक पाहत रहा .*
👁 *प्रथम प्रथम सराव नसलेने डोळ्यातून अश्रू येतील , पापण्यांची उघडझाप होईल तरीही न थांबता जास्तीत जास्त १० मिनीटे बसा.*
👁 *प्रथम काही दिवस ते वर्तुळ फिरल्याचा भास होईल नंतर नंतर ते वर्तुळ स्थिर होईल . त्यावेळी समजायचे की, आपले मन स्थिर होत आहे .*
👁   *हे बिंदू त्राटक केवळ मुलांनीच नाही तर पालकांनीही करावे .*
👁  *आपल्या शारीरिक व मानसिक कुवती नुसार बिंदू त्राटक १ मिनिटापासून कितीही वेळ करू शकता जेथे डोळयांच्या पापण्या लवतिल तेथे त्राटक संपले असे समजावे .*
👁  *चष्मा असेल तर तो काढून बिंदू त्राटक करावे काही अडचण येणार नाही .*
👁 *दररोज बिंदू त्राटक केल्यावर आपली एकाग्रता वाढीस लागली आहे याचा अनुभव तुम्हाला येईल , तुमचे मन शांत होईल , चंचलता नाहीशी होईल . मग काय*
_*करा  थोडाच अभ्यास ॥ पाहिल्या नंबरात या झकास ॥*_

*आहे की नाही जबरदस्त अभ्यास तंत्र . मग आजपासून आपण हे बिंदू त्राटक करून अभ्यासाला करणार सुरवात .. उद्या आपणास सांगणार आहे सगळे पुस्तक कागदाच्या एका तुकड्यावर कसे आणायचे त्याचे तंत्र ...*

*( _उद्याच्या भागात वाचा  फ्लॅश नोटस् काढण्याचे   तंत्र_  )*
    📕📒📘📗📙
   
*धन्यवाद ! ! !*

  *डॉ.गजानन पाटील*

No comments:

Post a Comment