Monday, 15 May 2017

श्री स्वामी समर्थ अष्टक

!! श्री स्वामी समर्थ अष्टक !!

वडा खालती बैसला योगी राणा
जया पाहता शांती मिळत मनाला
समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥१॥

स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल
स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल
चिंतामणी स्वामी मांगल्य मूर्ती
करा भक्त हो  नित्य स्वामींची भक्ती ॥२॥

ब्रह्मांडनायक अजाण बाहु यती हा
रुळते गळ्यात रुद्राक्ष माळी
टिळा चंदनी भाळी सतेज कांती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥३॥

आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे
चित्तात साठ्वूनी करा चिंतन स्वरूपाचे
कनवाळू स्वामीराज घ्यारे अनुभूती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥४॥

असे स्वामींचे नाम सामर्थ्यशील
मुखी गर्जत आधी व्याधी टळेल
भक्तांवीकरी समर्थ अलोट प्रीती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥५॥

करिता अखंड स्वामी चरणांची सेवा
मनुजा जीवास लाभे खरा विसावा
स्वामी समर्थ योगेश्वर दत्तमूर्ती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥६॥

जवळी असेल जरी शुद्ध भक्ती शिदोरी
स्मरताच धावुनी समर्थ भक्तांस तारी
देई समर्थ भक्तास भक्तीस शक्ती
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥७॥

वाटे जीवास जरी सार्थ नरजन्म व्हावा
जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखे म्हणावा
निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी
करा भक्त हो नित्य स्वामींची भक्ती ॥८॥

No comments:

Post a Comment