Wednesday, 10 May 2017

नवनाथ पारायणाचे महत्व

*||श्री स्वामी समर्थ||*

प.पु.गुरुमाऊलींच्या आदेशान्वये श्री गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर येथे *शनिवार दि १३/०५/२०१७* रोजी *_एकदिवसीय श्री नवनाथ पारायण_* होणार आहे.

जास्तीत जास्त सेवेकर्यांनी सदर सेवेसाठी सहभागी व्हावे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी.

*श्री गुरुपीठ (त्र्यंबकेश्वर , नाशिक ) येथे सकाळी ७:०० वाजेपर्यंत उपस्थित रहावे.*

संपर्क : ०२५९४-२०४२५२/५४

*नवनाथ पारायण करण्याचे महत्व :*

अध्याय १ : समंधबाधा नाहीशी होऊ शकते.

अध्याय २ : धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते.

अध्याय ३ : शत्रूचा नाश , मुष्टियुद्ध , विद्येची प्राप्ती , घरात मारुतीचे वास्तव्य.

अध्याय ४ : कपटाची बंधने सुटतील , शत्रूचा पराभव, राजदरबारी मान .

अध्याय ५ : घरात भूतबाधा असेल, तर थांबेल व पुनः होणार नाही.

अध्याय ६ : शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल.

अध्याय ७ : ८४ लाख योनीत जन्म येणार नाही. व्यथा, चिंता संपेल.

अध्याय ८ : दूरदेशी गेलेला मित्र परत येईल. काळजी संपेल.

अध्याय ९ : चौदा विदया व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील.

अध्याय १० : स्त्री - दोष नाहीसे होतील. मन सात्वीक होईल. मुले जगतील .

अध्याय ११ : अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल.

अध्याय १२ : देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील.

अध्याय १३ : स्त्री - हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.

अध्याय १४ : कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकांत राहता येईल.

अध्याय १५ : घरातील भांडणे थांबून सुख - शांती लाभेल.

अध्याय १६ : वाईट स्वप्नांचा नाश होईल.

अध्याय १७ : योगसिध्दि लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल.

अध्याय १८ : ब्रम्हहत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल.

अध्याय १९ : परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल.

अध्याय २० : मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल.

अध्याय २१ : गो - हत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल.

अध्याय २२ : ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल.

अध्याय २३ : घरातील सुवर्ण टिकून राहील.

अध्याय २४ : बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील.

अध्याय २५ : शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल.

अध्याय २६ : गो - हत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत.

अध्याय २७ : हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल.

अध्याय २८ : गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल.

अध्याय २९ : क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल.

अध्याय ३० : चोरांची दृष्टी नाहीशी होईल.

अध्याय ३१ : शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.

अध्याय ३२ : गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल.

अध्याय ३३ : धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल.

अध्याय ३४ : सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल.

अध्याय ३५ : महासिध्दी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उध्दार होईल.

अध्याय ३६ : साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल.

अध्याय ३७ : दु:शीलपणा संपून विदया प्राप्त होईल.

अध्याय ३८ : हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.

अध्याय ३९ : युध्दात विजय प्राप्त होऊ शकेल.

अध्याय ४० : कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

No comments:

Post a Comment