गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर-घाट
गुरुवीण ……
अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले
काटेबन घनदाट
गुरुवीण ……
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी,
लोचन काठोकाठ
गुरुवीण …………
भुकेजलो मी, तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
सांजेपाठी सुदीर्घ रजनी,
दिसणे कुठून पहाट
गुरुवीण ……
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज,
दावी रूप विराट ।
गुरुवीण ……………
*गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात, म्हणून "गुरू हवा"!*
🌿🌷🍃
No comments:
Post a Comment