Saturday, 31 December 2016

गायत्री मंत्राचे फायदे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

जय माता दी ...!!!

गायत्री मंत्र पठणाचे  आरोग्यदायी फायदे
निरोगी स्वास्थ्यासाठी करा गायत्री मंत्राचे पठण !

ॐ भूर्भूवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धीयो यो नः प्रचोदयात्। हा गायत्री मंत्र , प्राचीन वेदातील एक महत्त्वपुर्ण  मंत्र आहे. गायत्री मंत्राचे नियमित  पठण केल्यास त्याचा  आपल्या शारिरीक व मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.मग पहा गायत्री मंत्राचे 10 आरोग्यदायी फायदे - 
मनःशांती मिळते -  गायत्री मंत्राची सुरूवात 'ॐ' पासून होते. ॐ चा उच्चार करताना,  ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतून विशिष्ट लहरीं  उत्त्पन्न होतात. यामुळे शरीरात शांतता प्रस्थापित करणार्‍या हार्मोन्सची निर्मीती होते. अस्वथता कमी  होऊन शांतता निर्माण झाल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते -  गायत्री मंत्राच्या उच्चाराने ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतील एकाग्रता वाढवणारा भाग यावर ताण येऊनतेथे अनुनाद निर्माण होतो. या लहरींमुळे शरिरातील विविध कार्य संतुलित करणारी 'हायपोथॅलमस' ही ग्रंथी उत्तेजित होते. व  रोगप्रतिकारशक्तीचे  सबलीकरण करण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे, आनंद देणार्‍या हार्मोन्सची उत्त्पती होते.त्यामुळे एकाग्रता वाढते. तुम्ही जितके आनंदी रहाल तितकी तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढेल.
आकलन व स्मरणशक्ती वाढते.- इंटरनॅशनल  जनरल ऑफ़ योगाने प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार, गायत्री मंत्राचे उच्चारण केलेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती व एकाग्रता इतरांपेक्षा अधिक आहे. कारण या मंत्राच्या उच्चाराने शरीरात असणारी  चक्र कार्यान्वित होतात. व त्यामुळे शारिरीक स्वास्थ्य राखण्यास मदत होते.
श्वसनाची क्रिया सुधारते- गायत्री मंत्राच्या उच्चारासाठी दिर्घ व नियंत्रित  श्वसनाची गरज असते. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते.परिणामी श्वसनही सुधारते. दिर्घ श्वास घेतल्याने शरिरात सतत ऑक्सिजनचा पुरवठा होतो व स्वास्थ्य सुधारते.
हृदयाचे कार्य सुधारते  -  ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार , गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे , मानवी श्वसनाची क्रिया संतुलित होते त्यामुळे ह्र्दयचे ठोके नियमित होण्यास व ह्र्द्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. या अभ्यासानुसार हृदयाचे सुरळित कार्य व श्वसन क्रिया यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदयाचे विकार  दुर ठेवण्यास मदत होते.
मज्जातंतूंचे  कार्य  सुधारते  - गायत्री  मंत्र  उच्चारताना, ओठ ,जीभ ,घशातील मागील बाजू व मेंदूतील एकाग्रता वाढवणारा भाग,स्वरयंत्र यावर ताण येतो व तयार होणारा अनुनाद मज्जातंतूंचे कार्य सुरळित करून त्यांना चालना देतो.तसेच यामुळे न्युरोट्रान्समीटरचा प्रवाह देखील सुरळित होतो.
ताण-तणाव कमी होतो - गायत्री मंत्रामुळे ताण-तणावामुळे होणारा  त्रास  कमी होतो. ताणतणावाचा शरीरावर घातक परिणाम होत असतात त्यापासून रक्षण करण्याबरोबरच  रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.  तसेच रोज गायत्री मंत्राचे उच्चार केल्यास ताण  दुर होतो. व शारीरिक स्वास्थ्य सुधारते.
मानसिक स्वास्थ्य सुधारते व नैराश्य दुर होते - गायत्री मंत्र मेंदुचे कार्य सुधारतो,तुम्हाला अधिक शांत व ध्येयवादी करतो.तसेच गायत्री मंत्रामुळे , ताण कमी होऊन माणूस अधिक लवचिक होतो.इंटरनॅशनल  जनरल ऑफ़ योगाच्या अहवालानुसार वेगस नर्व्हचे कार्य सुधारण्यास मदत होते.तसेच एंडॉरफिन या हार्मोन्सची निर्मिती वाढते. यामुळे नैराश्य दुर ठेवण्यास मदत होते.
त्वचेला कांती देते  - गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे चेहर्‍यावरील काही विशिष्ट बिंदूंना उत्तेजना मिळते . त्यामुळे रक्तप्रवाह सुरळित होतो व विषारी घटक  बाहेर पडण्यास  मदत होते. याचबरोबरीने  दिर्घ श्वसन केल्याने त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो व  कांती मिळण्यास  मदत होते.
अस्थमाच्या लक्षणांपासून दुर ठेवते -  गायत्री मंत्राचा उच्चार करताना, दीर्घ श्वास  घेऊन तो काही काळासाठी रोखून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे फुफ्फुसांचे  कार्य सुधारते  व तुम्ही अस्थमापासून दुर राहता

No comments:

Post a Comment