श्री स्वामी समर्था तुम्हावीण
नाही दूजा आधार
उध्दारकर्ते तुम्ही
द्यावा भक्तांना आधार
साद घालता आर्ततेने
धावती स्वामी अती त्वरेने
माऊलीसम उचलूनी घेती
करवती भवदुःखातून पार
स्वामीनाम मुखी यावे अविरत
स्वामी रहाती समीप नित्य
दयाघन स्वामी कृपावंत
देती बुडत्याला आधार
अक्कलकोटी स्वामी अवतरले
उध्दरण्या जगता दत्तप्रभू आले
दर्शनमात्रे कामना पुरविती
देती साक्षात्कार
स्वामीवीण नाही दूजा आधार
स्वामीवीण नाही दूजा आधार
!! ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम: !!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
स्वामी सकाळ
No comments:
Post a Comment