Tuesday, 22 December 2015
मालवणीतुन गायब अब्दुल वाजिद शैख़ पुण्यात नोकरीच्या शोधात
AAAमालवणीतल्या तिघांपैकी एकाचा शोध लागला; पुणे एटीएसची कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मालवणीतून गायब झालेल्या तीन तरुणांपैकी एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. हे तरुण 'इस्लामिक स्टेट'च्या (आयस) वाटेवर गेल्याचा दाट संशय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर या तरुणाकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
मालाडच्या मालवणी परिसरात राहणारे तिघे तरुण गायब झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी मालाड पोलिसांना दिली होती. या वृत्तानंतर मालाड पोलिस, 'एटीएस' या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 'एटीएस'च्या तपासात पुण्यात आलेला तरुण हा दक्षिणेत गेल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे तरुणांभोवती तपासाची चक्रे फिरली होती. 'एटीएस'कडून या तरुणाच्या हालचाली टिपण्यात येत होत्या.
'एटीएस'चे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी अब्दुल वाजीद शेख याला ताब्यात घेतले. 'शेख याला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे,' अशी माहिती बर्गे यांनी दिली.
दरम्यान, नोकरीच्या शोधासाठी पुणे परिसरात आलो असल्याची माहिती शेखने पोलिसांना दिली आहे. शेख आणि त्याच्या मित्रांचा 'आयएस'शी काही संबंध आहे किंवा कसे, याबाबत कुठलाही ठोस पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. केवळ त्यांच्या घरच्यांनी या तरुणांच्या वर्तनावरून काढलेल्या अनुमानानुसार संशय व्यक्त करण्यात आला होता, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
माहिती मिळाल्यानंतर 'एटीएस'ची पाच पथके शोधासाठी तैनात करण्यात आली होती. या पथकांनी चोख कामगिरी बजावत त्याला ताब्यात घेतले. शेख आणि त्याच्या मित्रांभोवती ते 'आयएस'च्या वाटेवर असल्याचे वृत्त पसरले होते. त्याअनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. या मित्रांमधील आणखी एक तरुण घराबाहेर जाताना आपल्याला कुवेतच्या कंपनीत नोकरी मिळाली असून त्या संदर्भात पुण्याला जात असल्याचे त्याने घरच्यांना सांगितले होते.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment