Monday, 28 December 2015

कोंग्रेस नेत्याची फालतू बड़बड़

आसामधील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री निलमणी सेन डेका यांनी केद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत जाहीरपणे आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नवा वाद अंगावर ओढून घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पत्नी असल्याचेच अनेक लोक मानतात असे वक्तव्य माजी कृषीमंत्री निलमणी सेन डेका यांनी नालबरी इथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले आहे. डेका यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप नोंदवला असून काँग्रेस नेत्याने केलेले हे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुखही एक महिला आहेत. मग अशी लज्जास्पद वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना सोनिया गांधी पाठिशी घालत आहेत का असा सवालही राम माधव यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. आसाम भाजपने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून डेका यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी चालवली आहे. मोबाईल अॅप

No comments:

Post a Comment