Friday, 15 July 2016
मोफत बदला जीर्ण नोटा रिज़र्व बँकेचे निर्देश
जर तुमच्याकडे फाटक्या, अर्धवट अवस्थेतील किंवा खराब झालेल्या नोटा असतील, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्वरित तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन त्या नोटा बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बँकांना दिलेल्या निर्देशात खराब झालेल्या वीस नोटा विनाशुल्क बदलून देण्याविषयी बजावले आहे. मात्र, या नोटांची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये असेही नमूद करण्यात आले आहे.
खराब असल्याने परत करण्यात येणाऱ्या नोटा वीसपेक्षा अधिक असतील किंवा त्यांची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल, तर बँकेतर्फे त्यावर दंड आकारण्यात येणार आहे. 'कमी संख्येने नोटा जर बदलून घेण्यासाठी आल्या किंवा त्यांची संख्या वीसपेक्षा कमी असेल आणि त्यांची किंमत पाच हजार रुपयांपर्यंत असेल, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, त्यांची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक भरल्यास त्यावर शुल्क आकारण्यात येईल,' अशी माहिती रिझर्व्ह बँकेतर्फे देण्यात आली. आतापर्यंत खराब झालेल्या नोटा केवळ बँकांच्या चेस्ट शाखांमध्येच मिळत होती. याचाच अर्थ ज्या शाखांमध्ये करन्सी चेस्ट होते, त्याच बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. मात्र, आता सर्वसामान्य शाखांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या शिवाय पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांच्या नॉन चेस्ट शाखांनाही निर्देश दिले आहेत.
नोटांची किंमत पाच हजारांपेक्षा अधिक असल्यास..
जमा करण्यात येणाऱ्या खराब नोटांची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास संबंधित बँकेकडून ग्राहकांना एक पावती देण्यात येईल. त्या नोटांची बँकेकडून शाखास्तरावर तपासणी होईल आणि त्या करन्सी चेस्ट शाखांना पाठविण्यात येतील. करन्सी चेस्ट शाखेकडून क्लिअरन्स आल्यानंतरच बँकेकडून तुमच्या नोटा बदलून देण्यात येतील. जर नोटांची किंमत पन्नास हजारांपेक्षा अधिक असेल, तर त्या नोटांची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. जर एखादी व्यक्ती दररोज २० नोटा बदलून घेण्यासाठी येत असेल, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याविषयीही बँकेने बजावले आहे.
Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS
Web Title: Tarnished notes replacement
(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
अर्थ
02:28
RIL कंपनीला ७, ५४८ कोटींचा नफा
01:25
GM भारतात १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणा...
01:52
सेन्सेक्सचा निर्देशांक १०५ तर निफ्टी ५० अंशांनी...
02:49
इन्फोसिसच्या नफ्यात घट
02:06
मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन टॅक्स रिटर्नचा भरणाः FM
07:12
यात्राचे अमेरिकेतील एका कंपनीत विलिनीकरण
00:32
हिरोने लॉन्च केली स्पेलंडर आयस्मार्ट 110
02:32
भारताचा जूनमधील व्हीपीआय १.६२ टक्के, तर महागाई ...
02:10
'भेल'चा बांगलादेशमध्ये प्रकल्प
09:13
रॉकेलच्या किमतीमध्ये २५ पैशांनी वाढ
02:13
USFDA पुन्हा सन फार्माची तपासणी करणार
आणखी अर्थ
FROM THE WEB
Test drive the new Volkswagen Ameo now!
Ad Volkswagen India
Get unlimited free calls on Airtel broadband
Ad Airtel
Live in over 2 million unique homes
Ad Airbnb
There's a lot you can do 'Shaadi ke baad'
Ad NMIMS Distance Education
FROM MAHARASHTRA TIMES
‘सैराट’मधील ‘त्या’ संवादाबद्दल हरकत
१३ वर्षाच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिका प्रेग्नंट!
...अन्यथा बलात्कार करीन; कॅबचालकाची धमकी
‘यूपी’त काँग्रेसकडून शीला दीक्षित
Recommended By Colombia
अर्थवृत्त
इन्फोसिसने घटवले विक्रीचे लक्ष्य
सार्वजनिक बँकांना भांडवलाचा पहिला हप्ता
Check our network coverage in your area
Ad Airtel
पुनरुज्जीवनानंतर खत प्रकल्पांमध्ये रोजगार
कोट्यधीशांची संख्या पोहोचली अडीच लाखांवर
आणखी अर्थवृत्त
एक दृष्टिक्षेप बातम्या:
महाराष्ट्र
देश
थोडक्यात बातमी
विदेश
सिटी न्यूज
अर्थ
क्रीडा
संपादकीय
सिनेमॅजिक
करिअर
लाइफस्टाइल
इन्फोटेक
भविष्य
हसा लेको
लाइव टीव्ही
इतर
फोटो धम्माल
व्हिडिओ
फोटोगॅलरी
आमच्या इतर साइट्स:
தமிழ்తెలుగుമലയാളംবাংলাગુજરાતીहिन्दीಕನ್ನಡEnglish
आमच्या बद्दलवापर अटीडेस्कटॉप आवृत्ती
Copyright © 2016 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment