*एकादशीचे धार्मिक महत्त्व*
आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात.
आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.
*एकादशी कथा*
पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणिमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. मराठी हिंदूंच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
*एकादशी प्रकार*
एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..
२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.
४. एकादश्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.
६. पहिल्या दिवशी येणार्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.
: आ. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते.) आपले अनुभव सांगत, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.’
: आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
२. इतिहास
‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
३. महत्त्व
अ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.
आ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.
४. व्रत करण्याची पद्धत
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
५. पंढरपूरची वारी
हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.
: गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगणे
महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने ‘गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे ?’, असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने ‘एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्यादोष नाहीसा होईल’, असे त्याला सांगितले. या व्रताचे आचरण केले असता, महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील.
No comments:
Post a Comment