|| शिवगित ||
जिजाऊच्या सुता तुला महादेवाचे वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
दिव्य तुझी शिव भक्ति दिव्य तुझी काया
बालपणी गेलासी तु तोरणा जिंकाया
हादरले मोघल थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
मुरारबाजीला आली मूच्छा लागुनीया बाण
दिल्ली साठी शिवा तु केले प्रयाण
तळहातावर देवुन तुरी घेवुनी आला पंचप्राण
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
शायीस्ते खानाचे शोधासाठी गाठलास लालमहल
तिथे तलवारीचा तु वाजविला डंका
मोगल खवळले सारे परि हसले पठाण
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
हार तुला राज्यभिषेकाचा जिजाऊनि घातला
पाहीलेस फोडुन मोती शिव कुठे आतला
उघडुनी निधडी छाती दाखविले शिवराज्य
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
पन्हाळ गडाच्या वेढ्या मध्ये सापडलास शिवा
परी बाजीच्या पराक्रमाने तोडलास वेढा
निष्ठुनी पन्हाळगड गाठला विशाळगड
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
तुझ्या भेटीसाठी अफजलखान आला
प्रतापगडाच्या पायथ्याशी कसा त्याला गाडला
पाहुनी तुझा पराक्रम हादरला औरंगजेब
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
धन्य तुझे शिवराज्य धन्य तुझी किर्ती
तुझे भक्त आम्ही सारे विस्कटलो का शिवा
धावत ये विरमराठा करूनी एकजुठ
एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय!!
No comments:
Post a Comment