Monday, 31 October 2016

श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय
(2)🙏🙏

॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥ स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥ गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥ ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥ अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥ साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥ त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥ तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥ पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥ स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥ मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥ घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥ पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥ मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥ केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥ येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥ तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥ तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो ॥२०॥ तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥ तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥ ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥ द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥ सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती ॥२५॥ कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥ वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥ त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥ ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥ दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥ अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥ अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥ तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻

स्वामीचरिञ अध्याय २रा.
या अध्यायामध्ये
पुढील प्रमाणे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे .
नृसिंह सरस्वती प्रगट झाले तेव्हा त्यांनी कितीतरी अगणित पापी तारले. पुढे ते कर्दळीवनात गुप्त झाले  असे गुरूचरिञ या मध्ये सांगण्यात आले आहे .पुढे याचा ठिकाणी म्हणजे कर्दळी वनामध्ये स्वामी प्रकट  झाले ,
पुढे स्वामी अक्कलकोटला गेले .स्वामी ऐके ठिकाणी बसता त्यांना विचारण्यात आले की आपण कोठून आला आहात तेव्हा स्वामीनी उत्तर दिले की आम्ही कर्दळी वनात प्रकटलो, मग आम्ही कलकत्ता, बंगालदेश, पाहिले, कालीचे दर्शन घेतले .हरिव्दारला गेलो, केदारेश्वर पाहिले, असे हजारो नगरे आम्ही फिरलो  पुढे हैद्राबाद ला गेलो, मंगळवेढ्यास गेलो तेथे देखील वास केला, मग पंढरपूर वरून येथे अक्कल कोटी आलो.नंतर आम्ही बेगमपूर आणि मोहोळ पाहिले आणि मग अक्कलकोटी वास्तव्यस आलो
स्वामी जेव्हा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा त्याची प्रख्याती विशेष नव्हती , जे सदा वास अरण्यात करत असत, गलिच्छ जागी बसत असत, कोणी काही आणून दिले तर ते खात.लोक त्यांना वेडा बुवा म्हणत.
त्या वेळी दिगंबर नावाचा एक व्यक्ती होता त्याला स्वामीनी दिव्य असे कंबरेवर हात ठेऊन दर्शन दिले.
असे काही थोडे फार दुसरा अध्यायाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे..
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

गीत हि सर्व ग्रंथांची आई आहे

कामगारांना मेसेज द्वारे मिळणार टीडीएस माहिती


दरमहा कामगारांच्या खात्यातून टीडीएस कापला जातो. हा टीडीएस अर्थिक वर्षात दर महिन्याला सारख्याच प्रमाणात कापला जातो. एखाद्या कंपनीतील १० कामगारांचा प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे १ हजार रुपये टीडीएस सामुदायिकरित्या जमा होतो. तो प्रत्येक कामगाराच्या खात्यात जमा होत नाही. काही कालावधीनंतर तो प्रत्येकाच्या खात्यात जमा होतो. कंपनी हा टीडीएस जमा करताना एकरकमी जमा करते. त्याबरोबर कामगारांची नावे देऊन रिटर्न भरते. मात्र, हा टीडीएस वैयक्तिक खात्यात जमा झाला की नाही याची माहिती याअगोदर कामगाराला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन टीडीएस कापत असली तरीही तो परत मिळवताना असंख्य अडचणी निर्माण होत असत. यंदाच्या वर्षापासून अर्थ मंत्रालयाने कामगारांची अडचण लक्षात घेऊन हा टीडीएस आपल्या खात्यात जमा झाला की नाही याची माहिती कामगारांना दर तीन महिन्यांनी एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावाने प्रत्येक कामागाराला एसएमएस पाठवले गेले आहेत. यामुळे आपल्या खात्यातून जमा झालेला टीडीएस आपल्या पॅनमध्ये जमा झाला की नाही हे लगेचच समजणार आहे.

श्री महालक्ष्मी स्तोत्र

|| *श्री महालक्ष्मी स्तोत्र* ||

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४||

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५||

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६||

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७||

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८||

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९||

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०||

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११||

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||

|| *जय जगदम्ब* | *उदयोस्तु* | *अंबे उदयोस्तु* ||

Sunday, 30 October 2016

भगवान शिव के अलंकार

भगवान शिव के अलंकार

हमारी परंपरा में भगवान शिव को कई सारी वस्तुओं से सजा हुआ दिखाया जाता है। उनके माथे पर तीसरी आंख, उनका वाहन नंदी, और उनका त्रिशूल इसके उदाहरण हैं। क्या सच में शिव के माथे पर एक और आंख है? और क्या वे हमेशा नंदी और त्रिशूल को अपने साथ रखते हैं? या फिर इन्हें चिन्हों की तरह इस्तेमाल करके हमें कुछ और समझाने की कोशिश की गई है? आइये जानते हैं ।

शिव की तीसरी आंख

शिव को हमेशा त्रयंबक कहा गया है, क्योंकि उनकी एक तीसरी आंख है। तीसरी आंख का मतलब यह नहीं है कि किसी के माथे में दरार पड़ी और वहां कुछ निकल आया! इसका मतल‍ब सिर्फ यह है कि बोध या अनुभव का एक दूसरा आयाम खुल गया है। दो आंखें सिर्फ भौतिक चीजों को देख सकती हैं। अगर मैं अपना हाथ उन पर रख लूं, तो वे उसके परे नहीं देख पाएंगी। उनकी सीमा यही है। अगर तीसरी आंख खुल जाती है, तो इसका मतलब है कि बोध का एक दूसरा आयाम खुल जाता है जो कि भीतर की ओर देख सकता है। इस बोध से आप जीवन को बिल्कुल अलग ढंग से देख सकते हैं। इसके बाद दुनिया में जितनी चीजों का अनुभव किया जा सकता है, उनका अनुभव हो सकता है। आपके बोध के विकास के लिए सबसे अहम चीज यह है – कि आपकी ऊर्जा को विकसित होना होगा और अपना स्तर ऊंचा करना होगा। योग की सारी प्रक्रिया यही है कि आपकी ऊर्जा को इस तरीके से विकसित किया जाए और सुधारा जाए कि आपका बोध बढ़े और तीसरी आंख खुल जाए। तीसरी आंख दृष्टि की आंख है। दोनों भौतिक आंखें सिर्फ आपकी इंद्रियां हैं। वे मन में तरह-तरह की फालतू बातें भरती हैं क्योंकि आप जो देखते हैं, वह सच नहीं है। आप इस या उस व्यक्ति को देखकर उसके बारे में कुछ अंदाजा लगाते हैं, मगर आप उसके अंदर शिव को नहीं देख पाते। आप चीजों को इस तरह देखते हैं, जो आपके जीवित रहने के लिए जरूरी हैं। कोई दूसरा प्राणी उसे दूसरे तरीके से देखता है, जो उसके जीवित रहने के लिए जरूरी है। इसीलिए हम इस दुनिया को माया कहते हैं। माया का मतलब है कि यह एक तरह का धोखा है। इसका मतलब यह नहीं है कि अस्तित्व एक कल्पना है।

भगवान त्रिनेत्र, त्र्यम्बक और सोमशेखर के नामों से भी जानें जाते हैं

चंद्रमा

शिव के कई नाम हैं। उनमें एक काफी प्रचलित नाम है सोम या सोमसुंदर। वैसे तो सोम का मतलब चंद्रमा होता है मगर सोम का असली अर्थ नशा होता है। नशा सिर्फ बाहरी पदार्थों से ही नहीं होता, बल्कि केवल अपने भीतर चल रही जीवन की प्रक्रिया में भी आप मदमस्त रह सकते हैं।

अगर आप जीवन के नशे में नहीं डूबे हैं, तो सिर्फ सुबह का उठना, अपने शरीर की जरूरतों को पूरा करना, खाना-पीना, रोजी-रोटी कमाना, आस-पास फैले दुश्मनों से खुद को बचाना और फिर हर रात सोने जाना, जैसी दैनिक क्रियाएं आपकी जिंदगी कष्टदायक बना सकती हैं। अभी ज्यादातर लोगों के साथ यही हो रहा है। जीवन की सरल प्रक्रिया उनके लिए नर्क बन गई है। ऐसा सिर्फ इसलिए है क्योंकि वे जीवन का नशा किए बिना उसे बस जीने की कोशिश कर रहे हैं। चंद्रमा को सोम कहा गया है, यानि नशे का स्रोत।

अगर आप किसी चांदनी रात में किसी ऐसी जगह गए हों जहां बिजली की रोशनी नही हो, या आपने बस चंद्रमा की रोशनी की ओर ध्यान से देखा हो, तो धीरे-धीरे आपको सुरूर चढ़ने लगता है। क्या आपने इस बात पर ध्यान दिया है? हम चंद्रमा की रोशनी के बिना भी ऐसा कर सकते हैं मगर चांदनी से ऐसा बहुत आसानी से हो जाता है। अपने इसी गुण के कारण चंद्रमा को नशे का स्रोत माना गया है। शिव चंद्रमा को एक आभूषण की तरह पहनते हैं क्योंकि वह एक महान योगी हैं जो हर समय नशे में चूर रहते हैं। फिर भी वह बहुत ही सजग होकर बैठते हैं। नशे का आनंद उठाने के लिए आपको सचेत होना ही चाहिए।

शिव का वाहन नंदी

नंदी अनंत प्रतीक्षा का प्रतीक है। भारतीय संस्कृति में इंतजार को सबसे बड़ा गुण माना गया है। जो बस चुपचाप बैठकर इंतजार करना जानता है, वह कुदरती तौर पर ध्यानमग्न हो सकता है। नंदी को ऐसी उम्मीद नहीं है कि शिव कल आ जाएंगे। वह किसी चीज का अंदाजा नहीं लगाता या उम्मीद नहीं करता। वह बस इंतजार करता है। वह हमेशा इंतजार करेगा। यह गुण ग्रहणशीलता का मूल तत्व है। नंदी शिव का सबसे करीबी साथी है क्योंकि उसमें ग्रहणशीलता का गुण है। किसी मंदिर में जाने के लिए आपके अंदर नंदी का गुण होना चाहिए। ताकि आप बस बैठ सकें। इस गुण के होने का मतलब है – आप स्वर्ग जाने की कोशिश नहीं करेंगे, आप यह या वह पाने की कोशिश नहीं करेंगे – आप बस वहां बैठेंगे। लोगों को हमेशा से यह गलतफहमी रही है कि ध्यान किसी तरह की क्रिया है। नहीं – यह एक गुण है। यही बुनियादी अंतर है। प्रार्थना का मतलब है कि आप भगवान से बात करने की कोशिश कर रहे हैं। ध्यान का मतलब है कि आप भगवान की बात सुनना चाहते हैं। आप बस अस्तित्व को, सृष्टि की परम प्रकृति को सुनना चाहते हैं। आपक

लक्ष्मी पूजन दिवाळी अमावस्या

!! लक्ष्मी पूजन (आश्विन अमावस्या ) !! दि.३०.१०.२०१६ रविवार
या दिवशी सायंकाळी (प्रदोषकाळी) लक्ष्मी चे स्वागत करण्याची प्रथा आहे. अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मी पूजन, श्री लक्ष्मी चे स्वागत, अलक्ष्मी नि:स्सारण होते. या दिवशी बलीच्या बंदिवासातुन लक्ष्मी ची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्ति भावाने पूजा करतात. व्यापारी लोकही यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.
!! पूजेची वेळ सायंकाळी सहा नंतर (प्रदोषकाळ) !!
पूजेचे साहित्य:
विड्याच्या पानावर खारिक, बदाम, सुपारी, नाणे, निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, पंचामृत, फुले( फुले शक्यतो पांढरी कान्हेर, शेवंती, जास्वंद, रुई, झेंडू) सीताफल,केळी ही फले व तुळशीपत्र जवळ ठेवावे. नैवेद्यास पूरणपोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, हळदी, कुंकू, अक्षता, फाराळाचे पदार्थ इत्यादि.
पूजेची मांडणी व् पूर्व तयारी :
* लक्ष्मी-नारायणाचा फोटो
* विड्याच्या पानावर श्रीलक्ष्मी ची सुपारी( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
*विड्याच्या पानावर श्रीकुबेराची सुपारी ( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
*कुलदेवतांचे टाक, श्रीलक्ष्मी (नाणे किंवा प्रतिमा), सोने, चांदी, नाणे, नोटा.
*नारळ + खोबरे वाटी, त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बत्ताशे.
*मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी. + घरासमोर तुळशी जवळ रांगोळी काढावी.
*तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गाईची पावले काढावीत.
*प्रवेशद्वारा बाहेर दोन्ही बाजुस स्वस्तिक काढावे
*घरात तेलाचा दिवा लावून घ्यावा.स्वस्तिक काढून त्यावर नविन केरसुनी ठेवावी.
वरील मांडणी झाल्यावर तुलसी पूजन करावे.
!! तुलसी पूजन !!
तुळशीजवळ जाउन दिवा, अगरबत्ती लावून तिची हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी व् तुलसी स्तोत्र एक वेळा म्हणावे किंवा तुलसी मंत्र ११ वेळा म्हणावा.
तुलसी मंत्र :
|| ॐ -हीं क्लीं ऐं वृंदावन्ये स्वाहा ||
तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी|
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय समा ||
सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा|
द्वापारे चावतीर्णासी वृंदात्वं तुलसी क्ली: ||
कुंकू वाहून (पंचोपचार) पूजा करावी.
प्रथम श्री लक्ष्मी पूजन ध्यान मंत्र म्हणावा.
श्रीलक्ष्मी ध्यान मंत्र
ध्यायामी ता महालक्ष्मी कर्पूक्षोदपाण्डुराम|
शुभ्र वस्त्र परिधानां मुक्तभरण भूषिताम||
पंकजासन संस्थान स्मेराननसरोरुहाग|
शारदेन्दू कला कांती स्निग्धनेत्रा चतुर्भुजाम ||
पद्मयुग्मा अक्षयवर व्यग्रचारू कराम्बूजाम|
अभितो गजयुग्मेन सिच्यामानां करानुना ||
सर्व पुजेवर प्रथम फुलाने ४ वेळा पाणी शिंपडावे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व् सर्व पुजेवर फुलाने थोड़े थोड़े पाणी शिंपडून १६ वेळा श्री सूक्त म्हणून नंतर लक्ष्मी-नारायणाच्या फोटो समोर एक वेळा पुरुष सूक्त वाचावे, सर्वांना अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता, फुले वहावी, धुप-दीप दाखवावा व् पुढील प्रार्थना म्हणावी.
!! श्रीलक्ष्मी प्रार्थना !!
कमलाचपला लक्ष्मी: चलाभुती: हरिप्रिया |
पद्मा पद्मात्मया समदूचै: श्रीपदमधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरिप्रिये|
या गति: त्वतप्रपन्नाना सागे भूयात त्वदर्चनात||
यादेवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता|
नमस्तसयै नमस्तसयै नमस्तसयै नमोनम:||
धनदायै नमस्तुभ्य निधीपदधिपायच|
भुवन्तुत्वत्प्रसादान्मे धनधन्यादी संपदा ||
फोटो व् सुपारीच्या स्वरूपातील देवतांची - खालील प्रमाणे पूजा सामूहिकपणे घरातील सदस्यांनी करावी.
देव्हा-यातील गणपतीवर गणपती अथर्वशीर्ष अभिषेकयुक्त करून पुढे लक्ष्मीची, विष्णुंची, कुबेराची, कुलदेविची, कुलस्वामी श्रीखंडोबाची पूजा करावी. यानंतर बरोबर प्रदोष काळात लक्ष्मीच्या फोटोवर(चार हत्तीयुक्त), कुलदेविचा टाक, लक्ष्मी-नारायणाचा फोटो यावर १६ वेला श्रीसूक्त म्हणून अभिषेक, फुलाने पाणी शिंपडून करावा.( पाद्य, अर्घ्य, आचमन, जलस्नान, पंचामृत, पुन्हा जलस्नान फुलाने पाणी शिंपडून हळद-कुंकू, फुल वहावे. धुप-दीप नैवेद्य दाखवावा) नंतर गणपती, देवीची, नारायणाची आरती करावी. शेवटी क्षमा प्रार्थना म्हणून पूजेची सांगता करावी.
अलक्ष्मी नि:स्सारणम
या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, व् सर्व दिवे रात्रि १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावेत. घराच्या मागील भिंती पासून केरसूणीने एक सरळ रेषेत झाड़ू न उचलता प्रवेशद्वारा पर्यंत झाड़त आणावे. उंबरठ्यावर केरसुणी ठेवावी. केरसुणी चा एक फड तोडून बाहेर फेकावा म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो.
लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ...!!
!! शुभ दीपावली !!

स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय

श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय
(1) 🙏

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥

ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥

जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥ चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥ नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥ जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥ त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥ जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥ मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥ सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥ तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥ जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥ मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥ जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥ ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥ तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥ मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥ नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥ जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥ ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥ तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥ कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥ चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥ त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥ वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥ पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥ शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥ सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥ नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥ धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥ लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥ मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥ कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥ ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥ त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥ तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥ किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥ पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥ तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥ कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥ ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥ उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥ ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥ आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥ मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥ व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥ कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥ श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥ ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥ अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥ आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥ महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥ परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥ संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥ परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥ न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥ स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥ त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥ की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥ कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥ अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥ आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥ वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥ यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
स्वामीचरिञ अध्याय-१ला

या अध्यायमध्ये जे काही सांगितले आहे ते सांगण्याचा एक अत्यल्प प्रयत्न करत आहे .
त्या काळी कलीचा प्रताप वाढला होता, लोक पापे करू लागली होती , ठिकठिकाणी द्रारिद्य , दुःख निर्माण झाले होते .सर्वत्र दुःखी दीन दुबळी परिस्थिती निर्माण झाली होती.नास्तिक लोक वेद वचने मानत नव्हती .होमहवने कमी होऊ लागली होती , धर्माचा राजाश्रय सुटला होता, जे अधर्मप्रवर्तक होते त्यांना कसलेच भय नव्हते , ज्या काही नाना विद्या आणि कला होत्या त्या संपूष्टात  गेल्या होत्या , त्यामुळे त्या ठिकाणी परमार्थ सुटला होता.लोक भ्रष्ट झाले होते, स्वधर्माला विसरले होते , सर्वञ नास्तिकमतवादी परिस्थिती निर्माण झाली होती.
मग त्यानंतर दत्ताञय अवतार परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी प्रसिद्ध झाले .
स्वामी प्रथम कर्दळीवनात प्रकट झाले होते .स्वामी अक्कल कोट मध्ये आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडू लागला कोण हा पुरूष कोठून आला आहे , याचे धर्म , कूळ कोणते , कोणत्या जातीचा आहे .
नंतर स्वामीनी अक्कलकोट मध्ये चमत्कार करून दाखवले म्हणून ते अक्कलकोटी स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध झाले .
नंतर पुढे श्रीधर, वामन,अनेक महाज्ञानी विद्वान हे स्वामीच्या ज्ञानापुढे कमी पडले.
स्वामीच्या लीला अगाध आहेत असे पहिल्या अध्यायात सांगण्यात आले, या अध्यायत सांगितले की पुढील सर्व अध्यायामध्ये स्वामीच्या लिलाचे वर्णन केले आहे .

असा हा खुप अत्यल्प असा या अध्यायचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे , या अध्यायात आणखी खुप काही माहिती आहे पण जेवढे या बृध्दीला सांगता आले तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे जे बरोबर असेल ते सर्व काही स्वामीचे आणि जे जे चुकीचे असेल ते माझे..
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹