Thursday, 20 October 2016
यमाई देवीची आरती
श्री यमाई देवीच्या आरत्या :
श्री यमाई देवीची आरती
आरती आदिशक्तीची
जयदेवी आदिशक्ती | सुंदर सगुण मूर्ति | आरती ओंवाळीतो मनि उत्साह प्राप्ती || धृ ||
सगुण तूंचि ब्रह्म | सदा आनंद पूर्ण, विश्वचि व्यापियेलें | मायारूप धरियेलें || जय ० || १ ||
देव हे सकळ ध्याती तुझे पाय वंदिती | अभयासी पूर्ण देशी, वेद सतुतिही करती || २ ||
कीर्तीचे घोष गातां, सद्य होई तूं आतां | मागणें हेंचि आहे, परशुरामासी पाहे || जय ० || ३ ||
अंबेची आरती
निर्गुण जें होतें सगुणत्वा आलें, चराचर सकळीक तुज पासोनि झालें,
माया वेष्टित जग हें सगुण त्वां केलें, त्रैलोक्य सत्य ऐसें आपुलेंनि झालें,
जय देवी जय देवि जय आदि शक्ती, आरती ओंवाळूं एकाग्र भक्तिं ॥ १ ||
एसें सगुण तुजला लेणें जडिताचें, अनेक वस्त्रें शोभति कांचनभरिताचीं,
बैसुनि सिंहासनीं नृत्यें गणिकांची, पाहसी तूं जननी त्रैलोक्यीं साचीं || २ ||
हरिहर ब्रह्मादिक येती नमनासी, जे जे वर मागती ते ते त्यां देशी,
कृपाळु अंबे माते पालन भक्तासी, परशुरामा दीना करुणा कर होशी || ३ ||
स्त्रोत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment