Sunday, 23 October 2016

वसुबारस

वसुबारस........( आश्विन शुध्द द्वादशी ) "वसू " या शब्दाचा अर्थ " धन " किवां " द्रव्य " असा आहे. यादिवसाला " गोवत्स द्वादशी " असे पण ओळाखले जाते. सायंकाळी गोमाता व तिचे पाडस यांची मनोभावे पूजा केली जाते कारण या योगें घरात लक्ष्मी चे आगमन होतें असा समज आहे. या दिवसा पासून दीपावलीची खरी सुरवात होतें कारण लोक घरापुढे पणत्या लावतात व रांगोळी काढतात ते दिवाळी संपे पर्यंत. धनत्रयोदशी ........ ( आश्विन कृष्ण त्रयोदशी ) भगवान धन्वंतरीची पूजा करा. घरात नवीन झाडू किवां सूप खरेदी करून त्याची पूजा करा. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी. मंदिर ,गोशाला, घाट,विहीर,तलाव,बागेत दिवा लावावा. तांबे, पीतळ, चांदीच्या गृहपयोगी वास्तु व आभूषणाची खरेदी करा. कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट,गोशाला ,विहीर,मंदिर आदि स्थानावर तीन दिवस दिवा लावा. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. गंध, पुष्प, आणि अक्षतानी पूजा करा आणि दक्षिणेकड़े तोंड क रुन यमाकरता खलील प्रार्थना करा. " मृत्यना दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सह / त्रयोदश्यां दिपदानात सुर्यज प्रयातां मम / " नरक चतुर्दशी ........( कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शी ) कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते. पौराणिक महत्त्व या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हें व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते.रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता. चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा. 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।' या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा. दत्तो दीप: चतुर्दश्या नरक प्रीतये मया // चतु: वर्ती समायु सर्वपापापनुत्तये // संध्याकाळी घर, दूकान, कार्यालय आदि प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा. नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्‍याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे. नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती. त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्‍ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता. लक्ष्मीपूजन........ ( अमावास्या ) धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो. महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्‍यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो. भाऊबिज .................. यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने खलील मन्त्र म्हणून भावाच्या दिर्घायुषासाठी प्रार्थना करावी . भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।। तसेंच भावाला गोड जेवण घालुन त्यास औक्षण करावे व भावाच्या दीर्घायुषांसाठी प्रार्थना करावी व भावाने जर बहिण मोठी असल्यास तिच्या पाया पडावे व भेटवस्तू द्यावी व तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी व आशीर्वाद घ्यावा. या दिवशी यमपूजा केली जाते व खालील यामंत्र म्हणावे. धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज। पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।। चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्। लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।। धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्‍या नरकासूरांचा नाश केला पाहिजे.

No comments:

Post a Comment