Sunday, 30 October 2016

श्री लक्ष्मी कुबेर पूजन विधी

नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻

🚩शुभ दीपावली
(श्रीलक्ष्मी कुबेर पुजन माहिती)🚩

🚩 श्रीलक्ष्मी कुबेरा ची पुजन विधी माहिती या लेखातून करून घेऊ 🙏🏻

🚩या दिवशी श्रीलक्ष्मी कुबेर पुजन सोबत
महाकाली(काळी शाई)

/महालक्ष्मी(धन/रूपये)

/महासरस्वती(वही/खाते)

व चित्रगुप्त(पेन/दऊ)

व कुबेरपूजन (तिजोरी/माती चे बोळके कुबेर भंडार स्वरूपात) पुजन व आरती करावी🙏🏻

आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजना
करिता आपण घरातील सोन्याचे दागदागिने, जडजवाहिर, सोन्याचांदीचे जिन्नस व चांदीची नाणी एकत्र करुन, तीच लक्ष्मी आहे व संपत्ती देणारी देवता आहे अशा भावनेने तिची पूजा करतो. 🙏🏻

असेच लौकिकद्रुष्ट्या
सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाने पैसा, संपत्ती तसेच सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते अशी आपली श्रद्धा असते.लक्ष्मी ही संपतीची देवता आहे हे खरे आहे. तशीच ती नित्य विष्णूच्या सेवेत असते हे ही तितकेच खरे आहे. हरिप्रिया म्हणजे श्रीहरीला प्रिय अशी ती आहे. श्रीविष्णूला सोडून ती जात नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रसंगी लक्ष्मीपूजनाचे वेळी तिला आवाहन केल्यास ती एकटी येईल कां ?
ती तर विष्णूच्या सेवेत गर्क आहे. श्रीविष्णू हा क्षीरसागरी शेषाच्या शय्येवर विराजमान असून हरीप्रिया लक्ष्मी ही त्याच्या सेवेत रममाण झालेली आहे. ती विष्णूला सोडून कशी येणार ?श्रीविष्णूला श्रीमान असे म्हटले आहे म्हणजे श्री अर्थात लक्ष्मी, संपत्ती शोभा व सौंदर्य ज्याच्याजवळ नित्य आहे किंवा श्री म्हणजे लक्ष्मीदेवता पत्नीरुपाने ज्याच्याजवळ असते असा महविष्णु. विष्णूला माधव असेही म्हणतात. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती. म्हणूनच त्याला श्रीपती असेही म्हणतात. विष्णूचे असे स्वरुप पाहता लक्ष्मी विष्णूला सोडून एकटी कशी येणार ? म्हणूनच लक्ष्मीपूजनाचे प्रसंगी लक्ष्मीनारायण या दांपत्यास आदराने बोलावले पाहिजे.तुम्हाला लक्ष्मी, संपत्ती वैभव पाहिजे ना? मग लक्ष्मीपूजनाचे दिवशी श्रीविष्णूना आवाहन करून त्यांची यथासांग पूजा करा. 🙏🏻

तो महाविष्णू भक्तवत्सल आहे. हाकेसरशी धावून येतो असा त्याचा लौकिक आहे. श्री विष्णूंचे आगमन झाले की त्यांचेबरोबर महालक्ष्मी येणारच यात शंका नाही कारण ती नित्य विष्णूसमवेत छायेसारखी वावरत असते. अशा लक्ष्मीचा आदर करा. ती देवता आहे. तिला बँकेच्या लॉकर मध्ये बंदिस्त करुन तिचा कोंडमारा करू नका.तेव्हा लक्ष्मीप्राप्तीकरिता लक्ष्मीपूजनाचे दिवशी महाविष्णूला प्रथम आवाहन करून त्याची पूजा करा.🙏🏻
त्याचे स्तवन करा. विष्णुसहस्रनामाचा पाठ करा म्हणजे लक्ष्मीदेवतानक्कीच प्रसन्न होईल.
करण कोणत्या पतिव्रतेला आपल्या प्राणप्रिय पतीचा गौरव आवडणार नाही ?

अहो, एक बाब विसरलीच. लक्ष्मी हे सुद्धा प्रत्यक्ष विष्णूचे दुसरे नाव आहे. संपत्तीची अधिदेवता असलेली लक्ष्मी ही ज्याचे स्वरुप आहे असा महाविष्णू आहे असे विष्णुसहस्त्रनामात आहे ( श्रीविष्णूचे ९४३ वे नाव) अतएव विष्णूची पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन.🙏🏻

एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. महाविष्णू हा पांचजन्य नावाचा शंख धारण करणारा आहे. श्रीविष्णूच्या पूजेला शंखाची आवश्यकता असते. शंखाशिवाय विष्णूची पूजाच होऊ शकत नाही. यास्तव प्रथम शंखमहाराजांना बोलवणे पाठवा आणि मगच लक्ष्मीनारायणाला.🙏🏻

लक्ष्मीपूजनाचे दिवशी खऱ्या अर्थाने महालक्ष्मीस्वरुपी विष्णूची पूजा श्रद्धेने भावनेने आणि शुद्ध अन्तःकरणाने करून ऐहिक तशीच मानसिक श्रीमंती मिळवावी, हाच या लेखाचा मतितार्थ.🙏🏻

🚩धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत ही प्रार्थना 🙏🏻

आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांशनानाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. 🚩🙏🏻

आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया.🚩🙏🏻

१. कोजागरी पौर्णिमा व श्री लक्ष्मीपूजन : कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर आश्विन अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे.🙏🏻

🚩२. श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे.अनेकांना पैसा मिळविण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा हे माहीत नसल्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षातो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा', हे शिकविणारीआहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात.पुजन विधी"ॐ गं गणपतेय नम: " म्हणत पूजा करावी."

नंतर प्रथम सुपारी स्वरूपात गणपती हा दक्षिण कडे पानावर अक्षदा ठेऊन पुजन करने नंतर भुमी म्हणजे पृथ्वी पुजन करने नंतर दिपनाथ म्हणजे दिव्याची व सूर्याच्या पुजन करने नंतर श्रीगणेशाच्या उत्तर दिशेने मंगल कलश स्थापना करुन पूजन करने या नंतर'श्री लक्ष्मी ' च्या मूर्तीच्या प्रतीष्टापना चा अधिकार प्राप्ती साठी मन व मानव स्वरूप शरीर शुध्द करने ते म्हणजे प्रथम ॐ गं गणपतये नम: असे म्हणून ह्दय यास उजवा हात लावा मग शिरसो म्हणजे
डोक्याला हात लावून मग शिखा म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला हात लावून मग शरीराला कवच म्हणजे दोन्ही बहूना हात लावून कवच करावे मग अनामिका व तजनी हे दोन्ही बोटे डोळे मिटून स्पर्श करने मग उजव्या काना कडून हात फिर उन डवा हाता वर तळी वाजवावी मग लक्ष्मी पूजन करावे व प्रान प्रतिष्ठा करवीया सोबत महाकाली(काळी शाई)/महालक्ष्मी(धन/रूपये)/महासरस्वती(वही/खाते)व चित्रगुप्त(पेन/दऊ) व कुबेरपूजन (तिजोरी/माती चे बोळके कुबेर भंडार स्वरूपात) पुजन व आरती करावी आणि रात्री स्थिर सिंह लग्नात श्रीमहालक्ष्मी ला प्रिय असणारे कमल गुट्टा 108 आणि 108 मुरड शेंगॐ श्री महालक्ष्मी नम: असा मंत्र म्हणूनअर्पण कराव्या पुन्हा आरती करावी.🚩🙏🏻

सर्वांना शुभ लक्ष्मीपूजन 🚩

No comments:

Post a Comment