Thursday, 19 January 2017

मकर रास.... राशीचक्रातील नावडती राणी

मकर रास....राशीचक्रातील नावडती राणी

मी आज गेली कित्येक वर्षे ज्योतिष मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. रोज नवनव्या माणसांशी ओळखी,चर्चा त्यांचे प्रश्न,समाधान, मार्गदर्शन मी करत असतो. माझ्या आजवरच्या निरिक्षण व अभ्यासानुसार राशीचक्रातील बारा राशींपैकी "मकर" ही एकमेव रास अशी आहे की जिच्या नशिबी अखंड त्रास,कटकटी आणि विवंचना सुरु असतात. मकरेची व्यक्ति एखादा हमाल असो की कोट्याधीश त्याला त्याच्या आयुष्यात कोणतीतरी चिंता,कटकट किंवा काहीतरी त्रास असतोच. राशीस्वामी शनिमहाराज आहेत पण शनिच्या कुंभ आणि मकर या अधिपत्याखाली असलेल्या दोन राशींपैकी बुध्दीमत्ता, मानसन्मान, प्रतिष्ठा, धनसंपत्ती या गोष्टी कुंभेला मिळाल्या आहेत पण मकरेच्या वाटेला मात्र प्रयत्नवाद, कष्ट, दगदग आणि सतत अवहेलनाच आलेली अनुभवास येते. मकर ही रास जबरदस्त महत्वाकांक्षी, धैर्यवान व प्रयत्नवादी आहे पण या सर्व गुणांना अनुलक्षून जे यश,लाभ पदरी पडायला हवं ते या राशीच्या नशिबात अगदी क्वचितच बघायला मिळते असा माझा अनुभव आहे.

अत्यंत विरोधाभासात्मक आयुष्य ही मंडळी जगत असतात...म्हणजे भरपूर छान शारिरीक बळ असते, अफाट प्रयत्नशक्ति असते तर पैसा नसतो....पैसा असला तर आरोग्य चांगले नसते....पैसा आणि आरोग्य उत्तम असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अपमान,अवहेलना व त्रास घडत असतात...मकरेला एकंदरीत आयुष्यात प्रगतीच्या संधीच कमी मिळतात असा माझा अनुभव आहे. मकर व्यक्तिंनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्यायला हवा असं माझं मत आहे...आणि आयुष्यात अतीभावनाप्रधानता (Emotional aspect) कटाक्षाने टाळून अत्यंत स्पष्ट व प्रयत्नवादी धोरण ठेवायला हवे. कर्मयोगी रहायला हवे...देवधर्म आणि प्रयत्नवादात समन्वय ठेवायला हवा. अन्यथा मकरेची भावनिक फसवणूक करणारे चोर जागोजागी उभे असतात. चाणाक्षपणा, धोरणीपणा, कावेबाजपणा व स्पष्टवक्तेपणा मकरेत नसल्याचा गैरफायदा अनेकदा व्यवहारात घेतला जातो असा अनुभव आहे. मकर व्यक्तिंनी स्वत:चा मानसिक तोल अजिबात ढळू देऊ नये...खंबीर रहावे. नशा आणणाऱ्या पदार्थांपासुन नुकसान संभवते. आलेला पैसा थोडाफार बचतीकडे वळवून बाकीच्या पैशाचा स्वत:साठी आणि स्वत:च्या आनंदासाठी, छंदसाठी व हौसेसाठी उपभोग घ्यावा, तसे न केल्यास मकरेच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा Regrets (पश्चात्तापात) व्यतित होतो...स्वत:साठी काहीही न केल्याचा त्यांना पश्चात्ताप होत रहातो....

राशीचक्रातील ही नावडती राणी भले कधीच आवडती राणी झाली नाही तरी चालेल पण तिने स्वत:चे आयुष्य उपभोगायला हवे आणि आनंदात रहायला हवे असं मला मनापासुन वाटते....

... call . Wtsp .. 7219526379

No comments:

Post a Comment