Sunday, 6 December 2015
असहिष्णुता हा पूर्णपणे राजकीय मुद्दा _सरन्यायाधिश .टी एस .ठा़कूर
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
'असहिष्णुतेचा मुद्दा पूर्णपणे राजकीय आहे', असं मत व्यक्त करत नवनियुक्त सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी असहिष्णुता मांडणाऱ्यांचे आरोप अप्रत्यक्षपणे खोडून काढलेत. देशात कायद्याचं राज्य आहे आणि जोपर्यंत स्वतंत्र न्यायप्राणाली आहे तोपर्यंत चिंतेचं काहीही कारण नाही, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
'असहिष्णुता हा राजकीय मुद्दा आहे. हक्कांच्या रक्षणासाठी आणि आक्षेपांची दखल घेण्यासाठी देशात स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही नाही', असं ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा करताना सांगितलं.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सुरू असललेल्या राजकारणावर मात्र ठाकूर यांनी बोलण्यास नकार दिला. 'राजकारणी आणि नेते या असहिष्णुतेच्या मुद्द्याचा कसा वापर करताहेत यावर आपल्याला भाष्य करायचे नाही. कायद्याचं राज्य असल्याने देशातील कुठल्याही समाजाच्या किंवा नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण होईल. त्यामुळे कुठल्या एका समाजाने घाबरू जाऊ नये', असं ठाकूर म्हणाले.
'देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. आपल्या देशातील सांस्कृतिक विविधता ही इतर देशांसाठी एक आदर्श आहे. तसंच साहित्यिकांवरील झालेल्या हल्ल्यांप्रकरणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट सु-मोटो दाखल करणार नाही. हा एक गुन्हा आहे. मनुष्य आहे तोपर्यंत असे गुन्हे समाजात होतच राहणार', असं ठाकूर यांनी नमूद केलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment