Friday, 18 December 2015

हनीमून मधे राडा पत्नीला सोडून पति निघुन गेला

AAAमटा ऑनलाइन वृत्त l लखनऊ हनिमून म्हणजे दोन जीवांचा खऱ्या अर्थानं एकत्र येण्याचा, भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नं रंगवण्याचा काळ! पण लखनऊमधील एका जोडप्याचं हे स्वप्न शुक्रवारी अर्ध्यावरच भंगलं आणि 'मधु इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात...' असा काहीसा अनुभव घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याचं झालं असं... लखनऊ येथील एक जोडपं हनिमूनसाठी गोव्याला गेलं होतं. हनिमून संपवून हे जोडपं काही मित्रांसोबत इंडिगो एअरलाइन्सच्या 'गोवा-कोलकाता-पाटणा-लखनऊ' विमानानं घरी परतत होतं. परतत असताना या दोघांमध्ये काही कारणावरून विमानातच जोरदार भांडण झालं. त्यामुळं नव्या नवरीवर तडकलेल्या नवरोबानं मागचा-पुढचा विचार न करता बायकोला एकटीला विमानात सोडून पळ काढला. पाटणा विमानतळावरून विमान सुटण्यापूर्वी प्रवाशांच्या मोजणीत एक प्रवासी कमी असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानं एकाच गोंधळ उडाला. त्यानंतर केलेल्या चौकशीत, भांडण झाल्यानंतर आपला नवरा उतरून गेल्याचं एका महिलेनं सांगितलं. तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही वेळ या प्रवाशांचा शोध घेण्यात आला. मात्र, तो न सापडल्यानं शेवटी त्याला न घेताच विमान लखनऊकडे रवाना झाले. मुळात विमानातील प्रवाशांना अशा प्रकारे मधल्याच ठिकाणी उतरण्याची परवानगी नसते. 'एयरलाइन्सच्या कोणत्याही प्रवाशाला विमानातून उतरण्याआधी स्वत:चा बोर्डिंग पास दाखवावा लागतो. त्यामुळं एखादी व्यक्ती कुणालाही न कळवता मध्येच सहज उतरून जात असेल तर त्यात सुरक्षा अधिकाऱ्याची गंभीर चूक असल्याचं पटना विमानाचे अधीक्षक आर. एस. लाहोटिया यांनी सांगितलं. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसाठी पूर्णतः 'इंडिगो एअरलाइन्स'ला दोषी ठरविलं आहे. मात्र, यावर इंडिगोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

No comments:

Post a Comment