Saturday, 1 October 2016

पंच प्राण ,उपप्राण आणि त्यांचे कार्य

*🍁||श्री स्वामी समर्थ||🍁*

*🌷||पंचप्राण|🌷*

आपल्या देहात पाच मुख्य प्राण व पाच उपप्राण असुन, प्रत्येक प्राणाचे कार्य भिन्न भिन्न आहे.

पाच मुख्य प्राण....

*१) प्राण  २) अपान  ३) व्यान  ४) उदान ५) समान*

*१) प्राण* :- हा वायु हृदयात राहतो व श्वासोच्छवास करतो.

*२) अपान* :- हा वायु मोठया आतडयात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.

*३) व्यान* :- हा सर्व शरीरव्यापुन राहतो.

*४) उदान* :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.

*५) समान* :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवितो.
-------------------------

पाच उपप्राण आहेत....

*१) नाग  २) कूर्म  ३) कृकल  ४) देवदत्त  ५) धनंजय*

*१) नाग* :- हा वायु ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकतो.

*२) कृर्म* :- हा वायु पापण्यांची उघडझाप करतो.

*३) कृकल* :- हा वायु शिंक व खोकला निर्माण करतो

*४) देवदत्त* :- हा वायु जांभई निर्माण करतो.

*५) धनंजय* :- हा वायु मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल की. प्रेत जाळणे ही गोष्ट शास्त्रीयद्रुष्टया अतिशय चांगले आहे. कारण प्रेत जाळल्याने धनंजय वायू शरीरात अडकून राहत नाही व जीवात्म्याचीही मायेतून त्वरीत सुटका होते.

*सिद्धपुरुषांचे देह चिन्मय असतात*, त्यांचे देह पुरावेत व त्यावर समाधी बांधावी व त्या समाधीची पूजा करावी. अर्थात तेही सिद्धपुरुषाच्या इच्छेनुसार करावे.
प्राणायाम ध्यान धारणा, ईश्वरभक्ती, ईत्यादी साधनांनी आपल्या देहात असणारी *कुंडलिनी* व *षड्चक्रे* जागृत होतात व ध्यानामध्ये अतिशय दिव्य अनुभव येऊ लागतात.

*मूलाधारचक्र*:- मूलाधारचक्र जागृत झाल्यावर साधकाला मूलाधारचक्रामध्ये ऐरावताचे दर्शन होते. अथवा  ॐ काराचे दर्शन होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधक विद्वान बनतो. कवी बनतो गद्य-पद्याची रचना त्याच्या कडून होतात. *'गणपती'* ही या चक्राची देवता आहे.

*स्वाधिष्ठानचक्र* :- स्वाधिष्ठानचक्र जागृत झाल्यावर ध्यानामध्ये एक मोठा देवमासा समुद्रात विहार करत आहे. असे दिसते. स्वाधिष्ठानचक्राची
देवता *ब्रम्हदेव* असुन, येथे साधकांना ब्रम्हदेवाचे दर्शन घडते.

*मणिपुरचक्र* :- मणिपुरचक्र जागृत झाल्यानंतर एक मेंढा अंगावर चाल करून येत आहे. असे दिसते, मणिपुरचक्राची देवता *विष्णू* असुन, येथे साधकांना भगवान विष्णुंचे दर्शन घडते.

*अनाहतचक्र* :- अनाहतचक्र जागृत झाल्यानंतर दशविध नाद ऐकू येतात. या नादावरच नंतर अनुसंधान ठेवायचे असते. या चक्राची देवता *रूद्र (शंकर)* ही असुन, येथे साधकास साक्षात शंकराचे दर्शन घडते.

*विशुद्धचक्र* :- विशुद्धचक्र जागृत झाल्यावर आपल्या म्हणजेच स्वस्वरूपाचे दर्शन होते. या चक्राची देवता *जीवात्मा* म्हणजे आपण स्वताःच येथे आपल्याला आरशात प्रतिबिंब पाहिल्याप्रमाणे आपलेच रुप दिसते, तसेच काही लोकांना येथे निळ्या रंगाचा हत्ती दिसतो, अथवा निळा प्रकाश दिसतो.

*आज्ञाचक्र* :- आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर *अर्धनारीश्वराचे* दर्शन होते. काही साधकांना *हंसाचे* दर्शन होते. आकाशात हंस विहार करतांना दिसतो. काही साधकांना येथे अनेक देव-देवतांचीही दर्शने होतात. व महत्वाचे म्हणजे आपल्या सदगुरूंचे दर्शन होते.

*सहस्त्रारचक्र* :- सहस्त्रारचक्र जागृत झाल्यानंतर साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. साधक जीवनमुक्त सिद्धपुरुष बनतो. येथे साधकाला *परमेश्वराचे दर्शन* होते. व तो परमेश्वराशी एकरूप *(शिवरूप)* होतो.

संकलन:- श्री दत्तावधूत वाड्मय

*🌷||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌷*

No comments:

Post a Comment