Wednesday, 16 December 2015
PAN required for transaction above rs. 2 lakhs
दोन लाख रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी पर्मनंन्ट अकाउंट नंबर अर्थात पॅन देणे यापुढे अनिवार्य राहील. काळा पैशाचे व्यवहार वाढत असल्यामुळे कोणतेही बेनामी व्यवहार होऊ नयेत, यासाठी सरकारने ही खबरदारी घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान लोकसभेत सांगितले.
दोन लाख रुपयांहून अधिक व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य करण्याविषयी लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. देशांतर्गत निर्माण होणारा काळा पैसा तसेच देशातील व्यवहारांत फिरणारा काळा पैसा अशा दोन्हींवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment