Saturday, 10 September 2016

अष्टविनायक दर्शन - ओझरचा विघ्नेश्वर 5

🚩अष्टविनायक यात्रा
भाग - ५🚩

🚩 ओझर चा विघ्नेश्वर 🙏🏻

🚩विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.
हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. 🙏🏻🚩
अष्टविनायक पैकी सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून या गणपती ची ओळख आहे 🙏🏻🚩💐 

🙏🏻🚩अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर.🙏🏻🚩

🚩 या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.🙏🏻
जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे.
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.🙏🏻🚩

🚩१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.
विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.🙏🏻

🚩भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.

माझे श्रद्धा स्थान 🙏🏼माझे ग्रामदैवत 🙏🏼🌹

🚩 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

No comments:

Post a Comment