😱भूते कुठे राहतात व् कोणत्या शरीरात प्रवेश करतात😱
🌺प्रेरणा श्रीराम स्वामी समर्थ तुकोबा माउली🌺
✒लेखिका तृप्ति पाटिल✒
आपल्या मनुष्याचे शरीर हे पृथ्वी अग्नि वायु जल आकाश ह्या पंचतत्वाने बनलेले आहे. मनुष्यात वायुचे प्रमाण खुप कमी असते. तर भूते ही वायुनि बनलेली असतात.त्यामुळे भूत आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. भुत ही राक्षस गनाला जास्त दिसतात. जी लोक मानसिक रीत्या कमजोर असतात अशाना भुत दिसतो. म्हणजे जी व्यक्ति भावना प्रथान असते कोणत्याही ठिकाणी गेले की त्या परिस्तितिशि जुळवून घेतात. तेथील परिस्तितिल घटकांशी सलग्न राहतात. ज्यांना काही बोलले की लगेच वाईट वाटते कोणी मस्करी केलि किंवा मस्ति केलि की ह्यांचे मन दुखते म्हणजे सहन शक्ति कमी असतात. त्यांच्या शरीरात ही भूत लगेच प्रवेश करतात. जी व्यक्ति इतरांचे दूख आपले समजते म्हणजे वीना एका ठिकाणी फिरायला गेले व तिथे एक बाई 6 वर्षांपूर्वी मृत होती. तिचे दुःख विनाने जानले व् त्या मृत बाईचे दुःख हे विनाचे दुःख असे विनाला वाटू लागले. म्हणजे परिस्थितिशि तिने त्या मृत व्यक्तीच्या जुळवुंन घेतले. मग त्या मृत बाइला ती वीना आपलिसि वाटू लागली व विनाच्या शरीरात त्या मृत बाइने प्रवेश केला. जी व्यक्ति कमजोर मनाच्या व खुप घाबर्या असतात.त्या मनुष्याच्या शरीरारात ही भुत प्रवेश करतात. म्हणून भूतांची गोश्त एकली किंवा वाचली की त्यात मन रमवु नये. लगेच दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.माझा एक अनुभव मी व माझी आई पौर्णिमेच्या रात्रि बाहेर फेर फटका आमच्या गावाच्या बाहेर मारायला गेलो. एक अदृश्य स्फेद शक्ति आईच्या जवळ खुप मोठी दिसते. पण आई म्हणते की तू जवळ त्या शक्तीच्या आली की खुप लहान व दिसेनासि होते असे किती वेळा तिने पाहिले. पण मला काहि ती शक्ति दिसलिच नाही. मी खुप प्रयज्ञ केला. तरीही ती शक्ति फक्त आइलाच दिसत होती. आई माझी खुप मनाने कमजोर आहे तिला मी खुप समजाविले की कोणतेही वाइट शक्ति आली की घाबरायचे नाही.मी तरी अजुन एकहि भुत पाहिले नाही. पण माझी आजी व माझे आजोबा गावाकडे खुप भुत पाहिली. म्हणजे स्त्रीया ह्या भावना प्रधान असतात. त्यांना ही भुत लगेच त्रास देतात. काही वेळेला ही 4 ते 8 भुत एकाच शरीरात प्रवेश करतात. ही भुत डोंगर दरया, माल रानात, उसाची मळे, शेत कोणते पडिक ठिकाण, सुनसान रस्ता, ज्यांच्या घरात अतृप्त आत्महये वास करतात ती भुत शौचालयात अद्रश्य रीतीने राहतात. जंगल ठिकाण दुरवर कुठेही मनुष्याची वस्ति नसते तिथे राहतात.विहीर, पड़िक घर, कारखांना, नाला खाड़ी परिसर एक पडिक झाड़ तिन रस्ते असतात त्या ठिकाणी रात्रि ही भुत हमखास असतात. ह्या भूतांची वेळ संध्याकाळी 6 पासून निघायची सुरुवात होते. ती सकाळी 4 पर्यन्त. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला ही भूत अदृश्य होतात. दुपारी सकाळी ही भुत किड मुंगी ह्यांच्या रुपात राहतात. ह्यांच्या वेळेला जर मनुष्य गेला की त्यांना चालत नाही. ते लगेच त्या मनुष्यात प्रवेश करतात. ह्या भूतांचे जे साधक देवाचे भक्त ह्यांच्या समोर काहीही चालत नाही. त्यांच्या पासून ही भुत 10 पावले दुरच असतात. जी व्यक्ति अखण्ड नामस्मरन करते त्या व्यक्तीच्या शरीरात भुत कधीच प्रवेश करत नाही. जे लोक रात्रि अपरात्रि दारु पिवून भटकतात त्यांच्या शरीरात लगेच भुत प्रवेश करतात भूतांची दुनिया खुप भयानक दुःखाचे आहे. त्यांची वासना जो पर्यन्त पूर्ण होत नाही तोपर्यन्त त्यांचा प्रवास एकाच ठिकाणी असतो.जेव्हा त्या भूतांची वासना इच्छा पूर्ण होते. तेव्हाच ते मुक्ति साठी मनुष्याला हेरतात. पण ते दिसत नसल्यामुळे ह्या वाइट शक्ति एखाद्याच्या शरीरात प्रवेश करून मुक्ति मागतात. मुक्ति म्हणजे भुत योनीतून बाहेर येवून पुढचा प्रवास करने. म्हणजे त्यांची शान्ति केलि की ते त्या ठिकाणी न राहता दुसरया ठिकानि स्वताचा प्रवास चालु ठेवतात. गरुड़ पुरानात दिल आहे की अश्या अतृप्त जिव वासना पूर्ण झाल्या की देवाला दुसऱ्या योनीत जन्मासाठी आवाहन करतात. त्यांना ही खुप दुःख आहेत भुत योनि तर दुखाचीच आहे. परत जन्म मनुष्याचा भुत योनीत गेले की मिळत नाही. ती आत्महया इतरांना त्रास तरी देते नाहीतर त्याच ठिकाणी घुतमलत राहते. त्यांची वासना सम्पली की मगच त्यांना झाड़ वेली प्राण्यात जन्म मिळतो. मनुष्य जन्म अजिबात मिलत नाही. त्यांचा प्रवास नंतर नरकात होतो. तो प्रवास दुःख झेलले की मगच झाड़ झुड़पांमधे जन्म मिळतो. मनुष्याने जीवनात कधीच कमजोर राहू नये. जी दुःख येतात ती देवाचे नामस्मरण करूंनच सहन शक्ति वाढवून त्यावर मात करावी. नाहीतर कमजोर मनाला दुःख वेदना भुत प्रेत ह्यांच्या त्रास होतोच. शेवटी मनुष्याच्या कर्मावर अवलंबून असते. ज्याचे कर्म जसे असेल त्यांनाची ही वाइट शक्ति दिसते त्यानच्याच् शरीरांत ती वाइटशक्ति प्रवेश करते. कारण चांगले कर्म करणारा असतो त्याला ही शक्ति पकड़त नाही. फक्त डोळ्यांनी दिसते.पण त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत नाही ह्या जन्मिचे किंवा प्ररब्धयाचे भोग असतील त्यांनाच् ही शक्ति त्रास देते.ही जितकि माहिती तुम्हाला मिलालिय सर्व सत्य आहे खुप त्रास घेतला तेव्हा ही माहिती मिळाली ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी बिलकुल likes comnts करू नका ही विनंती उगाच्च् वाद घालत बसु नका उद्याची पोस्ट शेवटची असेल कारण मृतु नंतर जीवन कसे असते हे मला ह्या पोस्ट मधून दाखवायचे आहे जेने करून तुम्ही जानाल की मनुष्य योनि किती महत्वाची आहे देवाचे नामस्मरण करने व् स्वताच्या उद्धार करने किती महत्वाचे आहे नाहीतर वासनेच्या मागे लागूंन मनुष्य जन्मों जन्मी वेगवेगळ्या योनीत राहून दुःख भोगत असतो
🌺सद्गुरुपर्णामस्तु तुकोबा माउली🌺
Friday, 23 September 2016
भूते कुठे राहतात व कोणत्या शरीरात प्रवेश करतात ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment