अक्कलकोटचे परमसद्गुरु 'श्रीगजाननमहाराज राजीमवाले'रचित
'श्रीस्वामी समर्थध्यानाष्टक'
भव्यमूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड साजरा
मोद होई जना लागी मुखडा पाहता बरा||१||
विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती
गौरकांती जयाचे ते बाहू जानुस टेकती||२||
लंबोदर पहा त्याचे गजास्या परी भासते
वक्षस्थल तसे मोठे नास अव्यंग शोभते||३||
रेशमासारखे ऐसे पाद ज्याचे अति मृदू
ब्रह्मादि जाहले मुग्ध काय मी त्या मुखे वदू||४||
एक रुद्राक्ष कंठी तो कौस्तुभापरी भासतो
मोतियाच्या कुंडलाने कर्णही बहु शोभतो||६||
तुलसिकाष्ठमाला ती वैजयंतीच दुसरी
पहा ती योगीरायाची ज्ञानमुद्रा तशी बरी||७||
कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा तसा
कटी कौपिन लेवोनी स्वामिनाथ दिसे कसा||८||
पूर्णावतार विष्णूचा बुद्धिग्रामासी पातला
भक्त तारावया लागी यतीचा वेष घेतला||९||
स्तोत्र हे स्वामिदासाचे नित्य कोणीही वाचील
शीघ्र त्या स्वामिनाथाचा कृपावर्षाव होईल||१०||
।। सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा जयजयकार असो ।।
No comments:
Post a Comment