Thursday, 1 September 2016

चिमुकल्या चोचिमधे आभाळाचे गाने

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग देते कोण देते कोण देते कोण देते ? सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक देते कोण देते कोण देते कोण देते ? नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा करवंदाला चिक आणि अळूला या खाज कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज देते कोण देते कोण देते कोण देते ? आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी भुईतून येतो तरी नितळ हा झरा चिखलात उगवून तांदूळ पांढरा देते कोण देते कोण देते कोण देते ? मुठभर बुल्बुल, हातभर तान कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान काजव्याच्या पोटातून जळे का रे दिवा पावसाच्या अगोदर ओली होते हवा देते कोण देते कोण देते कोण देते ? भिजे माती आणि तरी अत्‍तर हवेत छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे सरळशा खोडावर पुढे दहा फाटे देते कोण देते कोण देते कोण देते ?

No comments:

Post a Comment