🌺🌺श्री गणेशाय नमः ॥🌺🌺
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा ।
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा ।।
चिंता-क्लेश्-दरिद्र-दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ।।
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदूर पाझरे वरी बरे दूर्वांकुरांचे तुरे ।।
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे ।।
गणपती बाप्पा मोरया
No comments:
Post a Comment