Thursday, 1 September 2016
स्वयं त्राटक - प्राणशक्तिचा प्रवाह
प्राणशक्ती खालीलप्रमाणे आपण स्वयं त्राटक साधनेच्या माध्यमातून वाढवु शकतो ते खालीलप्रमाणे आहे.
१. भगवान सुर्य ऋग्वेदीय मंत्राद्वारे स्वदेहात सुर्यप्राणाचे परिवहन.
२. औदुंबर, पिंपळ वृक्षातुन सुक्ष्मक्रीयेद्वारे प्राणशक्तीचे स्वदेहात संचरण.
३. दुर्लभ व निर्जन स्थानातील दैवी शक्तींचे मध्यरात्रीच्या काळभैरव साधनेतुन दैवी प्राणशक्तीचे आवाहन.
आपल्या देहात स्वयं त्राटक साधनेच्या माध्यमातून प्राणशक्तीचे वहन होणेसाठी आपली पंचकोषात्मक क्रीया, पंचभुतात्मक शुद्धीकरणावर विशेष भर प्रारंभीक स्वरुपात देण्यात आला पाहीजे. ह्या पंचकोषात्मक क्रीयेत अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, ज्ञानमय कोष व आनंदमय कोषाचे यथार्थ ज्ञान योग्यप्रकारे आत्मपचनी पडायला पाहीजे. अनुक्रमे पंचमहाभुतांचे देह व देहातीत शुद्धीकरणावर भर द्यायला हवा. आपल्याला देहाच्या पलिकडील अनंत अस्तित्व अनुभवण्याची व विलक्षण आनंद निर्विघ्नतेने लुटण्याची सुदृढ अंतरीक ईच्छा असल्यास वरील सर्व साधना करावीच लागेल. या ईतर दुसरा कोणताही मार्ग या मृत्युलोकात उपलब्ध नाही. सर्व ठिकाणी आध्यात्माच्या नावान घोर फसवणूकच होत आहे. कोणीही योग्य मार्ग टप्प्याटप्याने सांगत नाही. कारण तेच स्वतः आध्यात्मिक ब्रँडच्या जोरावर भोगीविलासी जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांना योगीजनांचे वैराग्य व योगज्ञान कोठुन कळणार.
आपल्या देहात ईतके रहस्य लपलेले आहेत की, फक्त ओळखण्याची ईच्छा असणाऱ्यांना हाच वर्तमान जन्म अपुरा पडेल. ह्दयातील आत्म्यापासुन ते सहस्त्रारातील परमात्म्यापर्यंत अनंत शक्तींचा अनुभव योगीजनांना येत असतो. तो आनंद आणि दत्त सान्निध्यात रंगलेल्या साधुला बाह्यदुनियेचा विसर पडणे हे तर स्वाभाविकच आहे.
स्वयं त्राटक साधना सुरवात कराण्याहेतु आपली शारीरीक क्षमतेचे व आचरणाचे योग्य अनुमान निर्धारीत करावे लागते. ह्या आत्मसंतुलनाच्याच आधारावर अत्यंत शक्तीमय अशी प्राणशक्ती आपण स्वयंनियंत्रित करु शकतो. त्यायोगे स्वहीत व जनहीतही महाराजांच्या ईच्छ्येने साधता येईल.
नवीन सभासद नोंदणी हेतू येथे क्लिक करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment