ज्योतिबाच्या नावानं चांगभलं .......
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं .......
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं....
माया ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं .....
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥धृ॥
तुझ्या नामाचा रं डंका, बारा ज्योतिर्लिंगा मधी रं .....
तुझ्या चरणाचं तीर्थ,माय पंचगंगा नदी रं.....
दर्शन घ्याया तुझं गं या या .....
मन हे येडं खुळं रं ....
चांगभलं रं चांगभल
चांगभलं रं चांगभलं, देवा भैरवनाथा चांगभलं ॥१॥
ह्या दक्षिण काशीला रं, राजा राहिला डोंगरी रं.....
घाट जरी वळणाचा, चढू मोक्षाची पायरी रं ....
भगवंताच्या देवपणाला, हात आमुचा जुळं रं ...
चांगभलं रं चांगभल
चांगभलं रं चांगभलं, देवा केदारा चांगभलं ॥२॥
बारा गावाचं भगतं, तुझी वाहती पालखी रं......
नऊ खंडाचा तू स्वामी, सा-या जगाची मालकी रं.....
जत्र मंदी पुण्याईची, सासण काठी डुलं रं .....
चांगभलं रं चांगभल
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥३॥
No comments:
Post a Comment