Wednesday, 30 November 2016

मी पैसा बोलतोय

शुभ संध्या मिञांनो़़़़
सुंदर संध्याकाळच्या गोड शुभेच्छा़़़़

मी पैसा बोलतोय
**************
सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो,
मी आहे पैसा. माझ साधारण रूप आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.

मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. कारण मनुष्य मला आदर्श समजतो.

आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात, आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वताच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.

मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात.

खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वताचाहि  जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.

मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत. मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमच वय नाही वाढऊ शकत.

मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही.मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही.

मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही.मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो पण विद्या नाही.

मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

म्हणून लक्षात ठेवा
पैसा हेच सर्वस्व नाही ,पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका . पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.

आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ  हेच आपले धन आहे, त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हांला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत.

तुम्ही केलेला परोपकार,दुसऱ्याना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती,त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे.तेव्हा सेवा,साधना व सतसंग करा.आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार..

Tuesday, 29 November 2016

If. You cheat on someone who is willing to do anything for you

If you cheat on someone who is willing to do anything for you, you actually cheated yourself out of true loyalty. I loved a man so much to the point of almost failing to love myself, but what did he do? He hurt me again and again, lied to me again again, wasn’t contented with me in spite the love I’ve shown him. I think it’s not my loss, it’s his. ~ Madi Duyang If they will do it with you, they will do it too you. Cheating is always wrong. If you aren’t getting something in your relationship you need to talk to your spouse about it or end the relationship, not cheat. You get what you give. Cheaters are just selfish people who only care about themselves. ~ Andrea Wells Do not be too moral. You may cheat yourself out of much life so. Aim above morality. Be not simply good; be good for something.~ Henry David Thoreau My peers, lately, have found companionship through means of intoxication - it makes them sociable. I, however, cannot force myself to use drugs to cheat on my loneliness - it is all that I have - and when the drugs and alcohol dissipate, will be all that my peers have as well.~ Franz Kafka Cheating in school is a form of self-deception. We go to school to learn. We cheat ourselves when we coast on the efforts and scholarship of someone else.~ James E. Faust

Saturday, 26 November 2016

शेगाव चे गजानन महाराज बावनीं

|| श्री गजानन महाराज बावन्नी ||
                                         
जय जय सद्गुरु गजानन ।
रशक तूची भक्तजना ।।१।। 
 
निर्गुण तू परमात्मा तू ।
सगुण रुपात गजानन तू ।।२।।  

सदेह तू परि विदेह तू ।
देह असूनि देहातील तू ।।३।। 
 
माघ वद्य सप्तमी दिनी ।
शेगांवात प्रगटोनी ।।४।। 
  
उष्ट्या पञावळी निमित्त ।
विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।

बंकटलालावरी तुझी ।
कृपा जाहली ती साची ।।६।।
       
गोसाव्याच्या नवसासाठी ।
गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।। 
        
तव पदतीर्थे वाचविला ।
जानराव तो भक्तभला ।।८।।  

जानकीराम चिंचवणे ।
नासवुनी स्वरुपी आणणे ।।९।।

मुकिन चंदुचे कानवले । 
खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।।

विहिरामाजी जलविहिना ।
केले देवा जलभरना ।।११।।  

मद्य माश्यांचे डंख तुवा ।
सहन सुखे केले देवा ।।१२।।
   
त्यांचे काटे योगबले ।
काढुनि सहजी दाखविले ।।१३।।

कुश्ती हरिशी खेळोनी ।
शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।।
       
वेद म्हणूनी दाखविला ।
चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।  
  
जळत्या पर्यकावरती ।
ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा ।
अश्र्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा ।
समर्थ भक्तचि जो होता ।।१८।। 

रामदासरुपे त्याला ।
दर्शन देवुनि तोषविला ।।१९।। 
   
सुकलालाची गोमाता ।
व्दाड बहू होती ताता ।।२०।। 
   
कृपा तुझी होतांच सनी ।
शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लश्मन शेगांवी ।
येता व्याधी तूं निरवी ।।२२।।  
   
दांभिकता परि ती त्याची ।
तू न चालवूनी घे साची ।।२३।।
    
भास्कर पाटील तव भक्त ।
उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।।

आघ्ना तव शिरसा वंद्य ।
काकहि मानति तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रश्शियला ।
देवां तू गणु जवर्याला ।।२६।। 

पितांबराकरवी लीला ।
वठला आंबा पल्लविला ।।२७।।
   
सुबुध्दी देशी जोश्याला ।
माफ करी तो दंडाला ।।२८।। 
  
सवडद येथील गंगाभारती ।
थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।।

पुंडलिकाचे गंडातर ।
निष्ठा जाणुनि केले दूर ।।३०।। 
   
ओंकारेश्र्वरी फुटली नौका ।
तारी नर्मदा शणात एका ।।३१।।
     
माधवनाथा समवेत ।
केले भोजन अदृष्य ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना ।
प्रसाद तूंची पाठविला ।।३३।।

कवर सुताची कांदा भाकर ।
भश्शिलीस प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत ।
लिला  दाविली विपरीत ।।३५।।
  
बायजे चिती तव भक्ती ।
पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।। 
  
बापुना मनी विठ्ठल भक्ती |
स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

कवठ्याचा त्या वारकर्याला ।
मरीपासूनी वाचविला ।।३८।।

वासुदेव यति तुज भेटे ।
प्रेमाची ती खुण पटे ।।३९।।  
 
उध्दट झाला हवालदार ।
भस्मिभूत झाले घरदार ।।४०।। 
  
देहांताच्या नंतरही ।
कितीजना अनुभव येई ।।४१।। 

पडत्या मजुरा झेलियले ।
बघती जन आश्चर्य भले ।।४२।। 

आंगावरती खांब पडे ।
स्ञी वांचे आश्चर्य घडे ।।४३।। 

गजाननाच्या अदभुत लीला ।
अनुभव येती आज मितीला ।।४४।।  
शरण जाऊनी गजानना ।
दुःख तयाते करि कथना ।।४५।।

कृपा करी तो भक्तांसी |
धावुन येतो वेगासी।।४६।।
  
गजाननाची बावन्नी ।
नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।
    
बावन्न गुरुवारी नेमे ।
करा पाठ बहूं भक्तीने ।।४८।।

विघ्ने सारी पडती दूर ।
सर्व सुखांचा येई पुर ।।४९।।

चिंता सार्या दूर करी ।
संकटातुनी पार करी ।।५०।। 

सदाचार रत सदभक्ता ।
फळ लाभे बघता बघता ।।५१।। 
    
भक्त गण बोले जय बोला ।
गजाननाची जय बोला ।।५२।।   

जय बोला  हो जय बोला । गजाननाची जय बोला।। 
                            
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ।।                

।। गण गण गणात बोतेे ।।

ज्ञानेश्वर माउली स्तोत्र

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्री ज्ञानेश्वर माउली चे स्तोत्र
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री ज्ञानेश्वर स्तोत्र.

प्रभु सद्गुरुसी करुनी प्रणाम । करी मानसा, शुद्धता शांतिधाम ॥
मग ज्ञानदेव-स्तवा । मी प्रवृत्त । नमो ज्ञानिया तूं महा श्रेष्‍ठ संत ॥१॥
श्री पैठणासन्निध दिव्य भूला । आपेगांविं, साधूचि जन्मासि आला ॥
सुपुत्र, मातेसि संतोष व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२॥
संन्याशि यासीच सुपुत्र झाला । म्हणूनि वाळींत द्विजांनीं ठेला ॥
परी योग्यता पाहतां मान द्यावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥३॥
रेडयामुखीं वेदचि बोलवीला । द्विजसंघ सगळाहि संतुष्‍ट झाला ॥
म्हणूनि देवासम हा स्तवावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥४॥

भावंड चारी, समवेत बैसे । भिंतीवरी ओपचि घेत भासे ॥
भेटे अशा कालिंच चांगदेवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥५॥
चांगाची व्याघ्रावरुनी, किं आला । सर्पासि आसूड करिं घेववीला ॥
जडभिंति चालेचि, होई सजीवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥६॥
निवृत्ति ज्ञानदेव, सोपानकाका । मुक्ताई, चत्वारि भावंड, ऐका ॥
अवतारि पुरुषांसम, मानिं देवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥७॥
इंद्राहुनी वैभविं फार थोर । इंद्रायणी दिव्य सरित्-सुतीर ॥
तटीं तियेचे चिरवास ठेवा । नमोदेव-देवा, तुम्हां ज्ञानदेवा ॥८॥
आषाढ कार्तीक या दोन मासीं । पाहा कृष्ण पक्षींच एकादशीसी ।
विठू पंढरीचा अकस्मात् यावा । नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥९॥
समाधीसि वंदी प्रभू पंढरीचा । असा भक्त प्रेमाहि अन्यत्र कैचा ॥
वर्णूं कसा मी अतुल प्रभावा । नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥१०॥
जयाचे सभा-मंडपीं, घोषवीणा । अखंड ध्वनी ईश-नामासि जाणा ।
असा छंद आळंदि भक्तस्वभावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥११॥
ज्ञानेश्वरी ही कृति थोर ज्याची । ’अमृतानुभव’ ही रचना तशीची ॥
ग्रंथ द्वयीं त्या प्रगटीं सुभावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१२॥
अजाना-तरुचेंचि ऐश्वर्य फार । अशा कल्पवृक्षासि थारा समोर ॥
सिद्धेश्वरा संमुख वास व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१३॥
महाद्वारिं सौवर्ण अश्वत्थ डोले । "सेवा, सुपुत्रासि देईंच" बोले ॥
अशा वैभवा योग्य, तो पूर्ण व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१४॥
समाधी नव्हे, पाहिं साक्षात् सुदेव । दिसे त्यांसि ऐसा जयांचें सुदैव ॥
समर्पीं तयाला उपचार सर्व । नमो संतवर्या तुम्हां ज्ञानदेवा ॥१५॥
ज्ञानेश विष्णूचि साक्षात् पहावा । आळंदि वैकुंठ कीं, भाव ठेवा ॥
श्रीपंढरी तुल्य महिमाची गावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१६॥
महोदार तूं घातलीसे गवांदी । भक्तां सुभक्तांचि मोक्षाचि, आदि ॥
तिथें वैष्णवांची मिनलीच मांदी । नमो ज्ञानराया अनंता अनादि ॥१७॥

सिद्धेश्वराचें स्वयंभूचि स्थान । म्हणूनी तदाज्ञाचि देवां प्रमाण ।
"वसा येथ, सांभाळित ज्ञान देवा" । परब्रह्म सांगे, नमो त्यां सुदेवां ॥१८॥

शंकर प्रभू तो निवृत्तीच झाला । भगवान् विष्णूचि, ज्ञानेश बनला ।
सोपान ब्रह्माचि, मुक्ताई माया । अशा सगुण ब्रह्मा, नमो, शीरपायां. ॥१९॥
"चांग देव पासष्‍टि" चांग्यासि सांगे । इतरां सुभक्तां "हरिपाठ" जागे ॥
अभंगावली योग ज्ञानासी ठेवा । नमो संतवर्या, नमो ज्ञानदेवा ॥२०॥

आळंदि क्षेत्रीं प्रतिव्यक्ति देव । उपतिष्‍ठती जेथ देवाधिदेव ॥
सदा, वा,सुपर्वींच भेटीसीं जावें । नमो ज्ञानराया, नमो भक्तिभावें ॥२१॥

ज्ञानेश्वरांनीं सहनाम देवा । तीर्थाटणें केलिं सुभक्ति भावा ॥
’द्वारका प्रभासादि’ अनेक क्षेत्रें । पाहून केलींच पवित्र गात्रें ॥२२॥
बिकानेर प्रांतीं ’कोलादगी’ त्या । ग्रामीं जला काढिति, आत्मशक्‍त्या ॥
नामाकरी विठ्ठल प्रेमधावा । ज्ञानेश दावी किं, योगप्रप्रभावा ॥२३॥

दोघेही ज्ञानचि सुभक्त होते । परंतु ज्ञानेशयोगीहि ज्ञाते ॥
भक्तद्वयांचा अशिर्वाद व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२४॥

"बाप रखुमादेवीवरु विठ्ठलू" हा । अभंगासी ’पालूपदा’ तुम्हि पाहा ॥
नमी शंकरा पार्वती दोन्ही देवां । प्रकृती पुरुषात्मकां आदिदेवा ॥२५॥
ही खूण ज्यांच्या अभंगासि व्हावी । अशा ज्ञानदेवां प्रणती करावी ॥
प्रार्थीं किं "दे भक्ति, मुक्तीच देवा ।" नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२६॥
’ज्ञानेश नाम् देव’ काशीसि जाती । विश्वेश्वरीं, त्यांसि सामोरे येती ॥
प्रेमें धरीला कर, विश्वनाथें । हें प्रेम वर्णूं किती म्यां अनाथें ॥२७॥

नामदेव गुरु संत विसोबा । खेचरुं जरि वालि विठोबा ।
ज्ञानदेवचि दाखवि हा गुरु । ज्ञानिया नमिंच, मोक्षदसद्गुरु ॥२८॥

काशीचि यात्रा करुनी निघाले । खानदेशिं तापी तिरिं सर्व आले ।
वाळुवंटिं नाचूनि भजनीं सुरंगीं । पंढरपुरा, मागुति येति मार्गीं ॥२९॥

निवृत्ति, ज्ञानेश, सोपान, नामा । विसोबाचि, परिसा निष्काम प्रेमा ॥
पंढरीं, सुक्षेत्रीं आनंद केला । नमो त्याच ज्ञानेश्वरा सद्गुरुला ॥३०॥
निवत्तिनाथांसि गुरु ज्यांनिं केला । वडील बंधूचि बहुवंद्य झाला ॥
अद्भूत प्रेमें बहुपूज्य भावा । दावी तया, मी नमिं, ज्ञानदेवा ॥३१॥

श्रीआदिनाथें कीं, मच्छिंद्रनाथा । मच्छिंद्र्नाथेंचि गोरक्षनाथा ॥
गोरक्षनाथें गहिनीचनाथा, गहिनीहिनाथें निवृत्तिनाथा ॥३२॥

एकैक सोडूनि परंपरेनें । महेश विष्णूची अवतार सगुणें ॥
परस्परांसी उपदेश केला । परब्रह्म तत्त्वासिच बोधीयेला ॥३३॥

म्हणुनी निवृत्ती गुरु शंभू झाला । ज्ञानेश विष्णूसि सद्बोध केला ।
ऐशी गुरुशिष्य जोडीच कोठें । नमो ज्ञानदेवा, तव भाग्य मोठें ॥३४॥

अशा गौरवाचें रमणीय स्तोत्र । जयाचेंही गाई बहुपुण्य वक्त्र ॥
तो साधुसंतामधिं हो पवित्र । द्या केशवा या बहु ’दिव्यमंत्र’ ॥३५॥

Thursday, 24 November 2016

चिकन पुलाव

तैयारी का समय : १.३०-२ घंटा खाना पकाने के समय : ३१-४० मिनट सर्विंग्स : ४ खाना पकाने का स्तर : मध्यम सामग्री चिकन पुलाव बासमती चावल भिगोया हुआ१ १/२(डेड़ कप हड्डी रहित चिकन 1 ½ इन्च के टुकड़ों में कटा हुआ६०० ग्राम दही १/२(आधा) कप अदरक की पेस्ट २ बड़े चम्मच लहसुन की पेस्ट २ बड़े चम्मच नमक स्वादानुसार ऑइल ४ बड़े चम्मच जीरा १ छोटा चम्मच लौंग दालचीनी २ इंच टुकड़ा छोटी इलाइची तेज पत्ता २ प्याज़ सलाइस किया हुआ२ स्वास्थ्यवर्द्धक टमाटर कटा हुआ३ स्वास्थ्यवर्द्धक लाल मिर्च पावडर १ छोटा चम्मच चिकन स्टॉक ३ कप विधि स्टेप 1 चिकन को दही, अदरक पेस्ट, लहसून पेस्ट और नमक के मिश्रण में मिलाकर 1 घंटे के लिए रेफ्रिजरेटर में मैरिनेट होने रख दें। स्टेप 2 एक प्रेशर कुकर में तेल गरम करके जीरा डाल कर 10 सेकन्ड्स तक भूनें। अब लौंग, दालचीनी, छोटी इलाईची और तेज पत्ते डाल कर 10 सेकन्ड तक भूनें। अब प्याज़ डाल कर सुनहरा होने तक भूनें। स्टेप 3 फिर टमाटर डाल कर मिलाएँ और तेज़ आँच पर 3 मिनिट तक भूनें। लाल मिर्च पावडर डाल कर मिला लें। अब चिकन को मेरिनेड के साथ डाल कर 2-3 मिनिट तक भूनें। स्टेप 4 फिर चिकन स्टौक डाल कर उबालने दें। अब चावल डालकर उबालें। फिर कुकर का ढक्कन लगा कर मध्यम आँच पर 2 सीटी तक पकाएँ। स्टेप 5 जब प्रेशर पूरी तरह उतर जाए तब ढक्कन खोल कर हल्के हाथ से हिलाएँ। अपने पसन्द के रायता और कचूंबर के साथ परोसें। Most Visited Recipes शाही पनीर स्पाइसी भिन्डी आन्ध्रा स्टाईल पनीर फ्रैंकी बादाम पिस्ता कुल्फी गाजर हल्वा Liked this recipes, Rate us : You Might Also Like Watch this guy win Rs. 1,00,000 in a salon RummyCircle Ice Cream Donuts..Yes Please! dekkho Asia’s Best Female Chef, Margarita Forés, arrives in Hong Kong for a 2-day pop-up LifestyleAsia 5 vegetarian-friendly Thanksgiving recipes Mother Nature Network Amazing Voiceprint Tech Being Used by Citi in Asia [Video] Citi Blog World's Easiest Apple Pie Recipe Mother Nature Network Michelin Guide Hong Kong Macau 2017: The winners have been announced LifestyleAsia 7 resolutions to help you cook more this year Mother Nature Network Recommended by विशेष अवसर व्यंजनों किड्स रेसिपी व्रत रेसिपी हेल्थी रेसिपी मौसम और त्योहार 10 must have kababs 8 पर्फेक्ट एगज़ैम फूड मदर्स डे सर्दियों की सम्पत्ति चाईनीज़ फूड व्यंजन – जो हैं ज़रा हट के! गुड़ी पडवा अंतरराष्ट्रीय नारी दिवस होली महाशिवरात्रि हालिके रेसिपी चिकन ब्रॉस्टॅड चीज़ी ब्रॉकॉली बॉल्स ब्राउन बट्टर शुगर कुकीज़ ऐश एल सराया (मिड्डल इस्टर्न डॅसर्ट) सिमिट More Stories मिनी टेम्पर्ड इड्लीस रेसिपी मास्टर शेफ संजीव कपूर. पनीर फ्रैंकी रेसिपी मास्टर शेफ संजीव कपूर. Recommended by टॉप सामग्री पनीर चिकन आलू पालक Chef Sanjeev Kapoor is the most celebrated face of Indian cuisine. He is Chef extraordinaire, runs a successful TV Channel FoodFood, hosted Khana Khazana cookery show on television for more than 17 years, author of 150+ best selling cookbooks, restaurateur and winner of several culinary awards. He is living his dream of making Indian cuisine the number one in the world and empowering women through power of cooking to become self sufficient. His recipe portal www.sanjeevkapoor.com is a complete cookery manual with a compendium of more than 10,000 tried & tested recipes, videos, articles, tips & trivia and a wealth of information on the art and craft of cooking in both English and Hindi. हमसें सम्पर्क करें कॉपीराय्ट पॉलिसी प्राय्वॅसी पॉलिसी वॅबसाय्ट पर विज्ञापन Powered by Reflection   

Wednesday, 23 November 2016

श्री मंगल चंडिका स्तोत्र

🚩श्री मंगलचंडिकास्तोत्रम् 🙏🏻🚩

🚩ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II

🚩पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II

मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II

देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II

श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II

बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II

ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II

संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II

देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II

शंकर उवाच रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II

हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II

मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II

पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II

मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II

सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II

स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II

देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II

🙏🏻II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II 🙏

ब्रह्मांडनायक 🏻🚩

Tuesday, 22 November 2016

अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र

हे स्तोत्र कवी मिलिंद माधव यांनी रचले आहे ......
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना |
विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती |
ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची
|| २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें |
अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण |
तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला |
जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या
|| १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण |
अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८
||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे |
आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां ||
१९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी |
भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा ||
२३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार |
कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५
||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद |
झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७
||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी
| म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना
|| ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार |
अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी |
सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती ||
३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं |
मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा |
ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी |
तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना ||
४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी |
आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला
|| ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं
| ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी |
मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||
वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||
स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||
जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||
पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ |
स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें ||
५० ||
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्या प्रहरी |
स्वामी गेले निजधामा || ५१ ||
बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल |
निजानंदी झाले निमग्न || ५२ ||
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||
ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार |
निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||
गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||
चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला
| अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें ||
५७ ||
अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||
याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले |
म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||
नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी |
स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||
जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था |
सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||
अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||
व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून |
तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३
||
सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी |
ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी,
मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख |
अंती सदगति लाभावी || ६५ ||
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे ||
६६ ||
तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य |
म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना ||
६७ ||
मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||
वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा
| वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९
||
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी |
शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत |
इच्छा सफल होईल || ७१ ||
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||
या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु
|| ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )
|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||
--