Thursday, 30 November 2017

देवी स्तवन

॥ श्री देवी सातेरी माऊली प्रसन्न ॥
॥ श्री देव रवळनाथ प्रसन्न ॥

॥ श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी प्रसन्न ॥
॥ ॐ श्री कुलस्वामिनी नमोस्तुभ्यम् ॥

या देवी सर्वभूतेषू मातृ रूपेण संस्थिता
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः॥

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥

नमस्तेस्तु महामाये श्रीपिठे सुरपुजीते
शन्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोस्तुते ॥
नमस्ते गरुढारुढे कोलासुर भयन्करि
सर्वपाप हरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥

॥ कापुर आरती ॥

कापुराची वात ओवाळू तुजला ||
देहभाव अहंकार सहज जाळीला ||धृ||

दया क्षमा शांति उजळल्या ज्योति ||
स्वयंप्रकाशात तुझी देखियली मुर्ती  ||१||

मी तु पण काजळ काजळी गेली ||
देवी माते तुझ्या पायी अर्पियली ||२||

आनंदाने भावे कर्पुर आरत केली ||
पंचतत्व भाव तुझ्या पायी ओवाळीली ||३||

छायाचित्र - श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले. जिल्हा सिंधुदुर्ग

कुटुंबातील व्यक्तीलाच घर/ जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ राज्य शासनाचा निर्णय

🔵 कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय...🔵

🔴 रक्ताच्या नातेवाईकाला घर अथवा फ्लॅट विकायचा असेल किंवा हस्तांतर करायचा असेल तर त्यावर संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण व लोकप्रिय निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता फक्त 500 रूपयां च्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मालमत्ता हस्तांतरित करता येईल. सध्या नातेवाईकांना घर, फ्लॅट हस्तांतर करताना मालमत्तेच्या सरकारी किंमतीवर 5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.

🔴 नव्या नियमानुसार, वडिलांकडून मुलगा, मुलीच्या नावावर तसेच मुलांकडून आई - वडिलांच्या नावावर, भाऊ - भाऊ व भाऊ बहिणीच्या नावावरील स्थावर मालमत्ता केवळ 500 रूपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हस्तांतर करता येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयामुळे रक्ताच्या नातेवाईकाला मिळकत हस्तांतरित करणे अधिक सुकर होणार आहे.

🔴 राज्य शासनाने स्थावर मालमत्तेच्या मालकी हस्तांतरण व विक्री बाबतच्या नियमांत बदल केले आहेत. त्यात रक्ताच्या नात्यातील मिळकतीवरील हस्तांतरण करताना संपूर्ण स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आली आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कोणत्याही व्यवहाराबाबत व अदलाबदलीसाठी 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरण होईल.

🔴 सरकारी किंमती नुसार एखाद्या घराची, फ्लॅटची 20 लाख रूपये किंमत असेल तर 1 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मुंबईत तर 1 कोटींचा फ्लॅट खरेदी केला तर संबंधितांना 5 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळेच कुटुंबातील व रक्तातील व्यक्तीच्या नावावर घर करायचे झाल्यास नागरिकांना फायदा होणार आहे.

🔴 नोंद - खरदीखत करते वेळी खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोघांची ओळख दर्शवनारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि दोघांचा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे.

🙏 कृपया ही माहिती सर्व जन - सामान्य लोकांपर्यंत पोहचवा. 🙏

Sunday, 26 November 2017

ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येते, उपाय

ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा

ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

मुंबई : ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

1. ऑफिसमध्ये झोप येत असल्यास च्युईंगम चघळा. यामुळे झोप दूर होईल. तुम्हाला च्युईंग गम आवडत नसेल तर स्नॅक्स अथवा शेंगदाणे खा. 

2. सतत एकच काम करुन फार कंटाऴा येतो. त्यामुळे वेगळं काहीतरी ट्राय करा. अथवा कामाची पद्धत बदला. यामुळे ते काम कंटाळवाणे होणार नाही.

3. जेवणानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी बसू नका. काही वेळ चाला.

4. झोप येत असल्यास चहा अथवा कॉफीचे सेवन करा. कॉफी आणि चहामध्ये असलेल्या तत्वामुळे मेंदू नेहमी सतर्क राहतो. त्यामुळे कम्प्युटरसमोर बसून झोप येत असेल तर उठा ब्रेक एरियामध्ये जाऊन छानशी कॉफी प्या. 

5. दुपारच्या जेवणात भरपूर खाल्ल्यास नक्कीच झोप येते. त्यामुळे हल्के पदार्थ खा. जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर ती बदला. कारण गोड खाल्ल्याने झोप येते. 

Wednesday, 22 November 2017

नवरा बायको ते आई बाप

*नवरा बायको ते आई आणि बाप..*

स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यन्त ती नवर्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी !

जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते,
त्यांच्या भावना समजून घेते,
त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते,
जे पाहीजे ते मुलांना खायला देते,
नवर्याच्या चोरून मुलांना पैसे पुरविते ,
साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

बर्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत.
त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात,
तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात.
काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात.
मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात.

आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये .
की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होतं.

मुलं विस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिक आहे पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात.
ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात.
मग मुलावर बापाचा वचक राहत नाही .
*मुलांना आई चांगली वाटते,*
*व बाप वैरी वाटायला लागतो.*

वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो .
मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली,नीतीवान ,शीलवान ,बलवान बनावे .
चांगल्या लोकांमधे उठावे बसावे ,
सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा ,
अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या ,
यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो,
मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक  हेतू असतो,
मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही.

पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही .
*बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत*
अशा परीस्थीतीत माणूस खिन्न होतो ,
त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही .
ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाऴा,तुझे वडिल तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात.ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं  करतात.
ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना ?"
उलट ,अनेक आई म्हणतात (मुलांच्या समोरच ) 
" बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला , घरात आले की सुरु होता, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्याचे मित्र बनायला पाहीजे तुम्ही, पण नाही ...लेकरांत जिवच नाही ना तुमचा !
कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्याच्याशी ....
अशाप्रकारे ,आई नवर्याचा मुलांसमोर पाणउतारा करते .
आणि
मीच तुला समजून घेते,
मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्वकाही करते, असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.

*साहजिकच सतत हँमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात.*

तीच मुलं लग्नानंतर पत्निप्रेमात तल्लीन झाल्यावर, आईला विचारतही नाहीत.

*म्हणून वेळेचं भान ठेवा.*

*मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा.*

*कायम लक्षात ठेवा...*
*लहानपणी बापाचा हात धरला,*

*तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही*

*बाप हाच बापमाणुस असतो..*
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼

बावन श्लोकी गुरुचरित्र

*बावन्नश्लोकी गुरुचरित्र*

श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः ।
अथ ध्यानम्
दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।
पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥
कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा ।
गजानना गिरिजाकुमरा ।
जयजयाजी लंबोदरा ।
शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥

त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा ।
कृष्णातिरी वास करुनी ओजा ।
सद्भक्त तेथे करिती आनंदा ।
त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥

जयजयाजी सिद्धमुनी ।
तूं तारक भवार्णावांतुनी ।
संदेह होता माझे मनी ।
आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥

ऐशी शिष्याची विनंती ।
ऐकुनि सिद्ध काय बोलती ।
साधु साधु तुझी भक्ति ।
प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥

भक्तजनरक्षणार्थ ।
अवतरला श्रीगुरुनाथ ।
सागरपुत्रांकारणें भगीरथें ।
गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥

तीर्थे असली अपार परी ।
समस्त सांडुनि प्रीति करी ।
कैसा पावला श्रीदत्ताची ।
श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥

ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति ।
तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ।
वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती ।
कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥

गोकर्णक्षेत्री श्रीपादयती ।
राहिले तीन वर्षे गुप्ती ।
तेथूनी गुरु गीरीपुरा येती ।
लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥

श्रीपाद कुरवपुरी असतां ।
पुढें वर्तली कैसी कथा ।
विस्तारुनी सांग आतां ।
कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी ।
श्रीगुरु महिमा काय पुससी ।
अनंतरुपे परियेसी ।
विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा ।
अवतार झाला श्रीपादहर्षा ।
पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा ।
कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥

श्रीगुरु म्हणती जननीसी ।
आम्हा ऐसा निरोप देसी ।
अनित्य शरीर तूं जाणसी ।
काय भरवंसा जिविताचा ॥ १२ ॥

श्रीगुरुचरित्र कथामृत ।
सेवितां वांच्छा अधिक होत ।
शमन करणार समर्थ ।
तूचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥

ऐकुनि शिष्याचे वचन ।
संतोष करी सिद्ध आपण ।
श्रीगुरु चरित्र कामधेनू जाण ।
सांगता झाला विस्तारे ॥ १४ ॥

ऐक शिष्या शिरोमणी ।
धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।
लीन झाली परियेसी ॥ १५ ॥

विनवी शिष्य नामांकित ।
सिद्ध योगियातें पुसत ।
सांगा स्वामी वृत्तांत ।
श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥

ऐक शिष्या नामकरणी ।
श्रीगुरुभक्त शिखामणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।
लीन झाली निर्धारे ॥ १७ ॥

ध्यान लागले श्रीगुरुचरणी ।
तृप्ति नोव्हें अंतःकरणी ।
कथामृत संजिवनी ।
आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥

अज्ञान तिमिर रजनीत ।
निजलो होतो मदोन्मत्त ।
श्रीगुरुचरित्र वचनामृत ।
प्राशन केले दातारा ॥ १९ ॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी ।
श्रीगुरु आले गाणगापुरासी ।
गौप्यरुपें अमरपुरासी ।
औदुंबरी असती जाण ॥ २० ॥

सिद्ध म्हणे नामधारका ।
ब्रह्मचारी कारणिका ।
उपदेशी ज्ञान विवेका ।
तये प्रेत जननीसी ॥ २१ ॥

तुझा चरणसंपर्क होता ।
झाले ज्ञान मज आतां ।
परमार्थी मन ऐकता ।
झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥

लोटांगणे श्रीगुरुसी ।
जाऊनि राजा भक्तिसी ।
नमस्कारी विनयेसी ।
एकभावें करुनियां ॥ २३ ॥

शिष्यवचन परिसुनी ।
सांगता झाला सिद्धमुनी ।
ऐक भक्ता नामकरणी ।
श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा ।
श्रीगुरुची अगम्य लीला ।
सांगता न सरे बहुकाळा ।
साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
नको भ्रमुरे युक्तिसी ।
वेदांत न कळे ब्रह्मयासी ।
अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥

चतुर्वेद विस्तारेसी ।
श्रीगुरु सांगती विप्रासी ।
पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्ताराची दातारा ॥ २७ ॥

नामधारक म्हणे सिद्धासी ।
पुढील कथा सांगा आम्हांसी ।
उल्हास होतो मानसी ।
श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥

पुढे कथा कवणेपरी ।
झाली असे गुरुचरित्री ।
निरुपावे विस्तारी ।
सिद्धमुनी कृपासिंधु ॥ २९ ॥

श्रीगुरुचरित्र सुधारस ।
तुम्ही पाजिला आम्हांस ।
परी तृप्त नव्हे गा मानस ।
तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥

सिद्ध म्हणे नामधारका ।
पुढें अपूर्व झाले ऐका ।
योगेश्र्वर कारणिका ।
सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥

पतिव्रतेची रीती ।
सांगे देवासी बृहस्पती ।
सहगमनाची फलश्रुती ।
येणेपरी निरुपिली ॥ ३२ ॥

श्रीगुरु आले मठासी ।
पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि आम्हांसी ।
निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी ।
ऐका पाराशरऋषी ।
तया काश्मीररायासी ।
रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥

पुढें कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि सांगा वहिली ।
मति माझी असे वेधिली ।
श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥

गांणगापुरी असतां श्रीगुरु ।
महिमा झाला अपरंपारु ।
सांगता नये विस्तारु ।
तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥

ऐसा श्रीगुरु दातारु ।
भक्तजना कल्पतरु ।
सांगता झाला आचारु ।
कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥

आर्त झालो मी तृषेचा ।
घोट भरवीं गा अमृताचा ।
चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा ।
माझे मन निववी वेगी ॥ ३८ ॥

सिद्ध म्हणे नामधारका ।
अपूर्व झाले ऐका ।
साठ वर्षे वांझ देखा ।
पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥

सिद्ध म्हणे नामधारका ।
अपूर्व वर्तले आणिक ऐका ।
वृक्ष झाला काष्ट सुका ।
विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥

जयजयाजी सिद्धमुनी ।
तू तारक या भवार्णवांतुनी ।
नानाधर्म विस्तारुनि ।
श्रीगुरुचरित्र निरुपिले ॥ ४१ ॥

मागें कथानक निरुपिले ।
सायंदेव शिष्य भले ।
श्रीगुरुंनी त्यांसी निरुपिलें ।
कलत्र पुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी ।
या अनंत व्रतासी ।
सांगेन ऐका तुम्हांसी ।
पूर्वी बहुती आराधिले ॥ ४३ ॥

श्रीगुरु माझा मलिकार्जुन ।
पर्वत म्हणजे श्रीगुरु भुवन ।
आपण नये आतां येथून ।
सोडून चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥

तू भेटलासी मज तारक ।
दैन्य गेले सकळहि दुःख ।
सर्वाभीष्ट लाधले सुख ।
श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु ।
ख्याती झाली अपारु ।
लोक येती थोरथोरु ।
भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥

सांगेन ऐका कथा विचित्र ।
जेणें होय पतित पवित्र ।
ऐसे हें गुरुचरित्र ।
तत्परतेसी परियेसी ॥ ४७ ॥

श्रीगुरु नित्य संगमासी ।
जात होते अनुष्ठानासी ।
मार्गांत शूद्र परियेसी ।
शेती आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥

त्रिमूर्तीचा अवतार ।
वेषधारी झाला नर ।
राहिले प्रीती गाणगापुर ।
कवण क्षेत्र म्हणूनिया ॥ ४९ ॥

तेणे मागितला वर ।
राज्यपद धुरंधर ।
प्रसन्न झाला त्यासी गुरुवर ।
दिधला वर परियेसा ॥ ५० ॥

राजभेटी घेउनी ।
श्रीपाद आले गाणगाभुवनी ।
योजना करिती आपुले मनीं ।
गौप्य रहावे म्हणूनिया ॥ ५१ ॥

म्हणे सरस्वती गंगाधर ।
श्रोतया करी नमस्कार ।
कथा ऐका मनोहर ।
सकळाभीष्ट लाधेल ॥ ५२ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्र्लोकात्मकं
गुरुचरित्र संपूर्णम् ॥

Tuesday, 21 November 2017

नाभी आणि सौंदर्य

नाभी आणि सौंदर्य
                                     कमी खर्चात घरगुती प्राचीन उपचार.विश्वास नाही बसणार,पण एक वेळ पंधरा दिवस करूनच पहा.मग खात्री होईल,विश्वास बसेल.
गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट  तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते. त्यासाठीच हा प्रयत्न.

1)सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे.
त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल.    

2)सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये  (homeopathy remedies)बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होईल.

3) मुलगी असो की मुलं.
तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.

4). चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून,काहीथेंब बेंबीतबेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल.चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.

5)    एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका,काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल.                                        

6)त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून,काही थेंब  बेंबीजवळ लावायचे.त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल.                माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो.                      

ही माहिती खूप उपयुक्त आहे.यातील कोणाला कोणता फायदा होईल हे सांगता येणार नाही .वात, पित्त, कफ या त्रिदोष प्रकृती वर या गोष्टी अवलंबून आहेत.तरीही नाभी उपचार पद्धती ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे.अवश्य करून पाहा.या बाबी किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका.अनुभव घ्या.खात्री झाल्यावर दुसऱ्याला सांगण्याचे कष्ट घ्या. 

संकलन----------------------हरिश्चंद्र बबनराव साळुंके . 💐नाभी चिकित्सक,💐 निसर्गोपचार तज्ञ . 💐💐   मु केम ता        करमाळा ,सोलापूर., whatsap7588046892 ,9011569059             

  हा मेसेज सर्वाना पाठवा.यामुळे एखाद्याचे जीवनात आनंद येईल.एखाद्याचा चेहरा खुलेल. एखाद्याचे चेहऱ्याचे तेज वाढेल.एखाद्या मायमाऊलीला चालता येईल.या सर्वांचे आशीर्वाद तुम्हा आम्हाला मिळतील.     तेव्हा हा मेसेज सर्वाना पाठवा.ही विनंती.👍

देवा जन्म आता तुझ्या पायावर

देवा जन्म आता तुझ्या पायावर
जगण्या आधार नाम तुझे ।।१
सांभाळी  कृपाळा जरी  भटकलो
तमी सापडलो मोहरात्री ।।२
करावी सोबत आणावे शोधत
घालावे पोटात अपराध ।।३
पाही बेडकाची उडी चिखलात
परी सांभाळत तया  तुच ।।४
अन  हत्येवीन जया  नाही  जीणे
घडे  सांभाळणे तया  तुवा ।।५
व्याघ्रादी  केसरी श्वान भूल्लुकासी
हरीण हत्तीसी प्रतिपाळी  ।।६
म्हणून मजला वाटतसे आशा
जरी  घोर निशा सभोवती  ।।७
माझिया चुकांचे करावे क्षालन 
पतित पावन दिगंबरा ।।८
-----विक्रांत प्रभाकर तिकोणे
!! ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम: !!

Sunday, 19 November 2017

दररोज सेक्स करण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

दररोज सेक्स करण्याचे हे आहेत १० आरोग्यदायी फायदे !

दररोज सेक्स करण्याचे हे आहेत १० आरोग्यदायी फायदे. दररोज सेक्स करण्याचे हे १० फायदे आहेत व या ५ आजारा पासून दुर रहा. वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे. जीवनात अनेक चढ उतार येत असतात. काहीवेळा कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर सेक्स हा चांगाला उपाय ठरू शकतो. जरा हे विचित्र वाटते. मात्र, यामागे शास्त्रीय कारणे आहेत. आपले आरोग्य आणि आनंदी जीवनात सेक्सचा मोठ्या हातभार असतो, असे अनेकदा समोर आले आहे.

त्यातही रोज सेक्स केल्याचेही मोठ्या प्रमाणावर फायदे आहे.
१) आपल्याला आलेले नैराश्य दूर होते. सेक्सच्यावेळी आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. त्यामुळे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.

२) सेक्सच्यावेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो. त्यामुळे पेशींमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.

३) तसेच मिठी मारणे किंवा सेक्स केल्याने बीपी कमी होऊ शकतो, असा अभ्यासाअंती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप वरचेवर येत असेल तर सेक्स हा त्यावरील चांगला उपाय आहे.
४) आठवड्यातून तीन वेळा सेक्स केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.
५) प्रणयातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो. दैनंदिन आयुष्यातील उत्साह वाढतो. कामात लक्ष वाढते. शिवाय दोघांमधील नाते आणखी मजबूत होते. दोघांना मानसिक आधार मिळतो. ताणतणाव सहज दूर पळतो. आरोग्य चांगले राहते. प्रणयाचे यापेक्षा अनेक फायदे आहेत. दररोज प्रणय केला तर आजार आपल्याला शिवणार नाहीत. डॉक्टर आपल्यापासून कायम दूर राहिल.

६) दररोज प्रणय केल्याने असे हार्मोन्स रिलिज होतात ज्यामूळे पेनपासून सुटका होते. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक दुखण्यापासून अगदी शंभर टक्के सुटका होते, असे नाही. पण दुखण्यात घट झाली असल्याचे निश्चितच लक्षात येईल. त्यामुळे वारंवार पेनकिलरच्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.

७) आधी महिलांसाठी जिम सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. पुरुषही व्यायाम करण्याचा आळस करायचे. तेव्हा बेडवरच प्रणयाच्या माध्यमातून व्यायाम करणे आरोग्यवर्धक आहे. या प्रकारच्या व्यायामाने शरीराच्या शीरा मोकळ्या होतात. हार्टबिट्स चांगले राहतात. जर तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ प्रणय करीत आहात तर 85 कॅलरीज बर्न करीत आहात, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
८) दररोज प्रणय केल्याने testosterone आणि estrogen चांगले राहते. या हार्मोन्समध्ये घट झाली तर शरीराशी संबंधित अनेक आजार जडू शकतात. महिलांना उतरत्या वयात त्यांचा मोठा त्रास होतो. प्रणय केल्याने या हार्मोन्सची संख्या संतुलित राहते. शिवाय पुरुषांचे आर्युमान वाढते.

९) प्रणय केल्याने दात पांढरे राहतात, हे सिद्ध झाले आहे. सिमेनची जागा कॅल्शिअम, झिंक आणि इतर मिनरल घेतात. त्याच्या फायदा दातांना होतो.

१०) हनिमून झाल्यावर घरी परतलेल्या कपल्सच्या केसांना वेगळीच झळाळी मिळालेली दिसून येते. त्याचे कारण तुमच्या हनिमुनमध्ये दडले असते. कारण प्रणयाचे अनेक सेशन्स झाल्याने त्याचा लाभ केसांना झाला असतो. त्यामुळे तुम्ही केसांची महागडी ट्रिटमेंट घेत असाल तर जरा थांबा…हा पर्याय चांगला आहे.

११) प्रणयात अनेक गुण दडलेले असतात. त्याचा स्किनलाही फायदा होतो. स्किन मऊ, मुलायम आणि चमकदार होते. त्यामुळे स्किन ट्रिटमेंट किंवा ब्युटीप्रॉडक्ट वापरण्याची गरज भासत नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही नाहिशा होतात. त्यामुळे पार्टनरला खुष ठेवा आणि आरोग्य चांगले राखा…