Wednesday, 31 May 2017
Financial Management
Monday, 29 May 2017
पहिली माझी ओवी
50 नंतरचा काळ आनंदाने घालविण्यासाठी 12 नियम
वयाने व मनाने ५० गाठलेल्या सर्वांसाठी 😀😀
50 नंतरचाकाळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..
🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽
खरच खुप छान आहे. आणि हि पोस्ट म्हत्वाची वाटली. लिहणार्याला मि मनापासून धन्यवाद 🙏🏽 देतो.
मला आवडली म्हणून मि इतरांशी शेर करतो.
भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा
भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपिले सर्वांगा चिताभस्म
गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर
शिव तो शंकर, सत्य तोचि
शंख शिंग नाद, गर्जे शिवगण
पायी भक्तजन ओळंगिती
भोळा सदाशिव पावतो भक्तासी
उद्धरी दीनासी नीलकंठ
हरहर शंकर सांब सदाशिव
सांब सदाशिव त्रिपुरारी
हरहर शंकर सांब सदाशिव
हरहर शंकर सांब सदाशिव. !!
Saturday, 27 May 2017
शिवप्रातः स्मरण स्तोत्र
नमस्कार सुप्रभात जय मल्हार श्री गुरुदेव दत्त !
शिवप्रातःस्मरणस्तोत्रम्
प्रातः स्मरामि भवभीतिहरं सुरेशं
गङ्गाधरं वृषभवाहनमम्बिकेशम् |
खट्वाङ्गशूलवरदाभयहस्तमीशं
संसाररोगहरमौषधमद्वितीयम् || १ ||
प्रातर्नमामि गिरिशं गिरिजार्धदेहं
सर्गस्थितिप्रलयकारणमादिदेवम् |
विश्वेश्वरं विजितविश्वमनोभिरामं
संसाररोगहरमौषधमद्वितीयम् || २ ||
प्रातर्भजामि शिवमेकमनन्तमाद्यं
वेदान्तवेद्यमनघं पुरुषं महान्तम् |
नामादिभेदरहितं षड्भावशून्यं
संसाररोगहरमौषधमद्वितीयम् || ३ ||
ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसा भूषितांकम l
श्वेताश्वम् खडःग हस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थे l
युक्तांघ्रि दैत्यमुन्ध्री डमरु vविलसितं नैशचूर्णाभिरामम l
नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगण परिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् ll
मल्लारिं जगदानाथं त्रिपूरारिं जगत्गुरूम्
मणिघ्नं म्हालसाकांतं वंदेहं कुलदैवतम्
आदिरुद्र महादेव मल्लारिं परमेश्वरम्
विश्वरुप विरुपाक्षं वन्देहं भक्तवत्सलम्
प्रियाणानंद गंगा महालसाभ्यां सहिताय
श्री मार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लरये नमः |
स्कंदनाभि समुद्रभूते | श्रीमैरालप्रियकरि |
गौरीप्रिय ताडिदगौरी | लक्ष्मी सुते नमस्तुते |
ॐ अश्वरुधाय विद्महे | म्हालासाकांताय धीमही |
तन्नो मल्हारी प्रचोदयात ||
ॐ शिवशक्ति विद्महे | मार्तण्डभैरवाय धीमही |
तन्नो मल्हारी प्रचोदयात ||
|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
कुलदैवत श्रीखंडोबा मल्हारी म्हाळसाकांता मार्तण्ड भैरवा कड़ेपठारचा राजा सदानंदाचा येळकोट मायबाप धनी महाराज मालक स्वामी !
Swami samarth bhajan
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री गुरुदेव दत्त !!
माझा स्वामी....
अक्कलकोटला जायचे तिथे मला राह्याचे.......,
स्वामी - स्वामी-स्वामी गायचे..हो ~~~
स्वामी माझी माय मी त्याची लेक ,
माय-लेक मला व्हायचे हो.....~~~
स्वामी माझा शाम मी त्याची मीरा ,
मीरा-श्याम मला व्हायचे हो ...~~~
स्वामी माझा राम मी त्याची शबरी ,
उष्टी राम-शबरी व्हायचे हो...~~
स्वामी माझा दिगंबर मी त्याचे श्वान, रूप श्वान दिगंबर व्हायचे हो...~~
स्वामी माझा नीळ मी त्याचा कंठ ,
नीळ-कंठ मला व्हायचे हो...~~~
स्वामी माझी दत्त माऊली मी त्याची अनुसया ,
दत्त-अनुसया व्हायचे हो...~~~
स्वामी - स्वामी -स्वामी गायचे हो ~~~
नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ
#ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🙏🚩
🚩नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ ।
नाम त्यांचे घेता मनी होय हर्ष ॥ धृ ॥
घटका जाती पळे जाती वेळ जातो व्यर्थ ।
मुखाने हो म्हणा तुम्ही स्वामी समर्थ ॥ १ ॥
राम नाम घेता वाल्या झाला सार्थ ।
'स्वामी' नामे भरा तुम्ही जीवनात अर्थ ॥ २ ॥
नाम किती सोपे अक्षरे ती दोन ।
जाणूनिया घ्या रे तुम्ही त्याचे सामर्थ्य ॥ ३ ॥
स्वामी लिला असती अगम्य अतर्क्य ।
चाखा तुम्ही तयातील सुक्ष्म मधूअर्क ॥ ४ ॥
गुरुपदी लीन होणे हाचि एक धर्म ।
सदगुरुची सेवा हेचि निष्काम कर्म ॥ ५ ॥
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩✡💐
#ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🚩💐
Thursday, 25 May 2017
लसणाचे औषधी उपयोग
Sunday, 21 May 2017
श्री स्वामी कृपा स्तोत्र
श्री स्वामी कृपा स्तोत्र
|| ॐ श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ ||
|| ॐ श्री गणेशाय नम: || ॐ श्री सरस्व़त्यै नम: || ॐ श्री सर्वशक्तिमूर्तये नम: || ॐ परात्पर जगत्गुरु नमो | आता नमू मयुरवाहिनी | जी शब्दविश्वाची स्वामिनी | वंदन करुया तियेसी ||1|| जो सकल विश्वाचा आधार | निर्गुण आणि निराकार | तो ब्रम्हा-विष्णु-महेश्वर | सद्भावें वंदू त्रैमूर्ती ||2|| त्रैमूर्तिचा महिमा अपार | गुरुचरित्री वर्णिला साचार | स्तुति करता अपरंपार | वेद चारी शिणले ||3|| कर्दलवनी झाले गुप्त | साक्ष ठेवून गाणग क्षेत्र | निर्गुण पादुका पवित्र | भक्तांसाठी ठेवियल्या ||4|| पंढरीचा पांडुरंग | ज्यासी आवडे संतसंग | तारिले तुक्याचे अभंग | त्यासी प्रणिपात अंतरी ||5|| करु या साष्टांग दंडवत | त्रैमूर्ती श्रीगुरुदत्त | अक्कलकोटी यति समर्थ | सद्भावे नमू अंतरी ||6|| आता श्री स्वामीरायांचे अख्यान | भाविकतेने करा श्रवण | सर्वसुखाचे निधान | लाभेल स्तविता सर्वांसी ||7|| भक्तीचा करुनी सोहळा | दाखवी अगम्य लीला | ऐसी ख्याती त्रैलोक्याला | मी पामर काय वर्णू ||8|| नृसिंहसरस्वती गुरुस्वामी | गुप्त जाहले कर्दलवनी | येतां पुनश्च धर्मा ग्लानी | अक्कलकोटी अवतरले ||9|| कर्दलवनी गुप्त जाहला | अबू पहाडी प्रगटला | अवधूत मानवरुपे आला | अक्कलकोटी माझारी ||10|| श्री गुरुस्वामी यति पाहिला | मूर्तिमंत तेजाचा पुतळा | कंठी रुळती रुद्राक्षमाळा | पद्मासनी स्थित असे ||11|| शांत गंभीर दिसे रुप | हेमसंकाश तनु अनुरुप | नेत्रकमलांची कृपाझेप | भक्तावरी सर्वदा ||12|| भाली शोभे कस्तुरी तिलक | साजिरे दिसे नासिक | ओष्ठ हनुवटी सुंदर मुख | चंद्रापरी दिसतसे ||13|| समुत्कंठ पाहू चला | आजानुबाहू शिव भोळा | कंठा भूषवी त्रिदलमाला | नृसिंहभान गुरुस्वामी ||14|| निम्ननाभी दिठी सुंदर | धूर्जटी कौपीन कटीवर | दत्त नरहरी यतिवर | धीपुरी प्रगटलासे ||15|| अखिल विश्वी विश्वंभरु | भक्तजन सुरतरू | या हो सकल पादपद्म धरु | देहबुध्दी करु दुर ||16|| मम हृदयीं ठसो मूर्ति | शंख चक्रांकित गदा हाती | कामधेनुसह चतुर्वेद मूर्ती | सदैव राहो अंतरी ||17|| अबूगिरीवरुनी हृद्कमली | वेगे येई गुरुमाऊली | रत्नखचित सिंहासनी बैसली | भक्तकाज करावया ||18|| आतां करितों तुझी पूजा | रमावरा अधोक्षजा | सप्रेमें क्षाळितो पदरजा | अर्ध्य देई स्वकरी ||19|| मधुर सुवासिक शीतळ | गंगोदक जळनिर्मळ | पंचामृत स्नान सचैल | निजहस्ते घालितो ||20|| स्नान करुनी, करा आचमन | भरजरी पितांबर नेसून | शालजोडी पांघरुन | सुखे घेई स्वामीया ||21|| चंद्रोपम उपवीत घालुनी | रत्नाभरणे, कौस्तुभमणी | कस्तुरी टिळा लेवुनी | चंदन उटी लावावी ||22|| निराकार, निर्गुण गोपाळा | कंठा भूषवी तुलसीमाळा | बिल्व-शमी दुर्वांकुराला | सहस्त्रनामें अर्पितो ||23|| अष्टगंध, बुक्का सुगंध | सौरभे होती दिशा धुंद | अर्पितो दीप स्वानंद | मानुनी घेई गुरुराया ||24|| रत्नखचित चौरंगावरी | सुवर्णताटी पक्वाने सारी | दहि-दूध लोणचे कोशिंबिरी | पंचखाद्य नैवेद्य सेवा जी ||25|| कर्पूरोदके धुवोनि हस्त | घालितो करी पंचामृत | प्राणापान, व्यान, उदान समस्त | तूचि अससी स्वामिया ||26|| गुरुमूर्ती तू षड्रस | मीहि त्यांस ऐक्य सहज | दिव्य सच्चित रुप निज | वेदपूर्ण भरले असे ||27|| वदनसुवासा तांबूल | त्रयोदशगुणी निर्मळ | मुखशुध्दिस नारळ | घ्यावा आता गुरुराया ||28|| भक्तवत्सला स्वामिराजा | अंगिकारावी माझी पूजा | नमस्कारोनी अधोक्षजा | श्रीमुख बघतो न्याहाळुनी ||29|| तव आरती ओवाळिता | नासती अनंत ब्रम्हहत्या | वेद बोलतो वाणी सत्या | त्रिवार ऐसे सत्यचि ||30|| सनकादिक मुनी सुरवर | करिता स्वामींचा जयकार | मंत्रपुष्पांचा संभार | जडजीवासी उध्दरी ||31|| वेदघोष अति सुस्वर | प्रदक्षिणा घाली वारंवार | प्रेमे साष्टांग नमस्कार | अनंतासी दंडवत ||32|| अनंतकोटी ब्रम्हांडनायका | अनादि स्वरुपा गुरुराया | लागलो आता तव पाया | भक्तकृपाळा उध्दरी ||33|| छत्रचामरे वारीन | गंधर्वगान समर्पिन | सुस्वर वाद्ये वाजवून | तुष्ट करितो तुजलागी ||34|| सुदिव्य, सुखशय्या मृदुल | ठेवी सुखासनी पदकमल | चरण, अहर्निश चुरीन | सेवा मानून घ्यावी जी ||35|| सत्शिष्य भजनी रंगती | भजनानंदी विसावती | संतसंगी जडो प्रीती | हेचि मागणे स्वामीया ||36|| शेष, व्यास, सरस्वती | गुणवर्णन करीती महामती | भक्तस्तवन ऐकुनी श्रीपती | प्रसन्न व्हावे सत्वरी ||37|| विश्वंभर तू सौख्यराशी | भक्तकौतुक पुरविशी | योगक्षेम चालविसी | ऐसी ख्याती त्रिभुवनी ||38|| निजनिर्माल्य प्रसाद देसी | उच्छिष्ट आंस सर्वांसी | पूर्वपुण्ये येती फळासी | सेवा गुज ऐसे हे ||39|| सृष्टि-उत्पत्ति-स्थिती-संहारा | अवतार तुझाचि गुरुवरा | ब्रम्हा-विष्णु-महेश्वरा | स्वामीरुपी शोभसी ||40|| रवि-चंद्रासी तेजाळले | ते तेजही तुजकडोनी आले | निज-भक्त कार्य सगळे | तव प्रसादे लाभते ||41|| इह परत्र सौख्य देसी | कल्पतरुसम शोभसी | जैसा भाव धरावा मानसी | तैसा त्यासी अनुभव ||42|| शिव-विष्णु-शक्ति-गणपति | स्वामीरुपे सारे शोभती | निगमागमही स्तविती | सत्यज्ञानानंद तू ||43|| त्रिविधताप हे निवारिसी | दीनजना उध्दरिसी | क्षमा करावी दासासी | मागणे हेचि जीवनी ||44|| जीवात्मज्योति उजळुनी | तव प्रकाशे प्रकाशुनी | पाहते नित्यचि स्तवनी | स्वामीराजा ||45|| ऐशी अतर्क्य स्वामीलीला | वणिर्ता वेदही शिणला | तेथे मज पामराला | कैसी शक्ती ||46|| काया वाचा मानसी | इंद्रियाधीकृत कर्मासी | अर्पितो परात्परा तुजसी | सारी सेवा ||47|| रामकृष्ण तू सर्वसाक्षी | पृथ्वीवर अवतार घेसी | हरावया भूभारासी | पंढरी वास केला ||48|| पंढरीस श्रीविठ्ठल | गिरीवर विष्णु सोज्वळ | करवीरी लक्ष्मी प्रेमळ | विश्वेश्वर काशीवासी ||49|| कलियुगी नृसिंह-सरस्वती | अत्रिनंदन गाणग क्षेत्री | गुरु माणिक प्रभूही तूचि | अक्कलकोटी गुरुराया ||50|| जे भक्त तुजला भजती | अहर्निश राहे त्यांचे पाठी | भक्त संरक्षणासाठी | अक्कलकोटी वास केला ||51|| स्तविता ही स्वामी माऊली | पापे अनंत जन्माची जळाली | वाढविसी प्रेमसाऊली | वात्सल्य नांदे सर्वदा ||52|| असत्वृत्ति जावो विलया | सद्वृत्ती पावो जया | सकलजनासी देवराया | सौख्य लाभो जगी या ||53|| गोवर्धन गिरी धरिसी | अग्निही तू प्राशिसी | पार्थगुरु सारथी होसी | महिभार हरावया ||54|| अविनाशी अवतार दत्त | जगती आहे विख्यात | अघटित लीला दावित | गाणगापुरी बैसला ||55|| गुरुतत्व गूढ सार | जाणताती भक्त थोर | तोचि प्रज्ञापुरी यतिवर | भक्तकाजी रंगला ||56|| हे स्तोत्र करिता पठण | त्यासी न बाधे चिंता दारुण | भवभय दु:खाचे निरसन | स्वामीकृपे होईल ||57|| अनन्यभावे करा स्मरण | साक्षात्कारे घ्यावे दर्शन | हेचि सद्गुरु वचन | असत्य न होई सर्वथा ||58|| ठेवुनिया श्रध्दा भाव | मनी आळवावा गुरुदेव | भक्तासाठी घेई धाव | रक्षणासी सिध्द सदा ||59|| वटवृक्षतळी जाण | श्रीसद्गुरु प्रतिमा ठेवून | यथासांग करावे पूजन | षोडशोपचारे आदरे ||60|| मग करावे स्तोत्र पठण | नित्यश: एक आवर्तन | अखंड करिता तीन मास पूर्ण | साक्षात् सद्गुरु भेटेल ||61|| श्री स्वामी समर्थ नाम | अनंत कोटींचा कल्पद्रुम | सकल संतांचा विश्राम | नामस्मरणीं नांदतो ||62|| स्वामीकृपा होता क्षणी | मुक्याते फुटेल वाणी | पंगु जाईल उल्लंघुनी | उत्तुंग गिरीही लीलया ||63|| ऐसा महिमा अगाध | एकमुखी वर्णिती वेद | श्री स्वामी स्तोत्र केले सिध्द | आला धावून झडकरी ||64|| स्वामी प्रेमळ माउली | जैसे वत्साते गाऊली | तुझी स्तुति स्त्रोते गायिली | तव प्रेमळ कृपेने ||65|| तूचि श्री व्यंकटेश | तुचि महारुद्र महेश | अनंतकोटी जगदीश | श्री स्वामी समर्था सर्व तूचि ||66|| उत्पति, स्थिती आणि लय | तूचि सकलांचा आशय | गुरूदेवा तुचि मम आश्रय | उपासका सांभाळी ||67|| तव करितां नामस्मरण | लाभे चित्ता समाधान | तव चरणाशी वंदन | देवाधिदेवा समर्था ||68|| जे नर करतील आवर्तन | मनकामना त्यांची होईल पूर्ण | सद्भक्तिचे अधिष्ठान | नित्य ठेवूनी अंतरी ||69|| हा ग्रंथ ज्याचे घरी | तेथे अन्नपूर्णा वास करी | सुख संपत्ति संसारी | लाभेल भाविकां निश्चिती ||70|| करितां ग्रंथाचे पठण | दुःख दारिद्रय जाईल पळून | भक्त सेवेसाठी येईल धावून | दयावंत स्वामीराज ||71|| येथे ठेवूनिया विश्वास | करावे ग्रंथ पारायणास | दृष्टांत देवोनि त्वरेस | सांभाळीन तयालागी ||72|| हे सद्गुरूंचे सत्यवचन | श्रोते ऐका ध्यान देऊन | पुरवील मोक्षसाधन | एकचि माझा स्वामीराज ||73|| विश्वामित्र गोत्र कुलोत्पन्न | देशपांडे उपनामाभिधान | नाम माझे असे वामन | सद्गुरुचरणी लीन सदा ||74|| प्रतिभानुज हे संबोधन | घेतले श्रीगुरूने लिहवून | झाली सेवा सफल पूर्ण | पूर्व सुकृतानुसार ||75|| स्तुतिस्तोत्राचा गुंफिला हार | भक्तिमंजिरी त्यावर | घातली वैजयंती सुंदर | कंठी श्रीगुरुरायाचे ||76|| श्रीस्वामीराज स्तोत्र ग्रंथ | जाहला असे समाप्त | मज पामरे वदविले गुरुनाथे | त्यांचे चरणी दंडवत ||77|| श्री स्वामी समर्थ दत्त | मंत्र हा मनी घोषित | झाले चित्त अवघे तृप्त | पुनश्च चरणी दंडवत ||78|| देह अवघे अक्कलकोट | आत्मस्वरुपी श्री स्वामीसमर्थ | त्यांचे ठायी दंडवत | वारंवार घालीतसे ||79|| इति श्रीस्वामीराज सगुण | भक्तांचे वैभव पूर्ण | प्रतिभानुज करीतसे वर्णन | साष्टांग प्रणिपात करोनी ||80||
|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||
|| इति श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्णम् ||
Saturday, 20 May 2017
स्वामी समर्थ मानस पूजा
🙏🙏🕉🔔🕉🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ मानस पूजा ।।
|| श्रीगणेशाय नम: ||
नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवू या मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||
दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृत स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुताऱ्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळे ना जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता
अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||
सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||
चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिंची योगमुर्ति ||
करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||
पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||
हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||
मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अंतरी स्वामी देव || २२ ||
श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ll ll स्वामी ॐ ll
नाही जन्म नाही नाम । नाही कुणी मातापिता । प्रगटला अद्भुतसा ।ब्रह्मांडाचा हाच पिता ॥ १ ॥
नाही कुणी गुरुवर । स्वये हाच सूत्रधार । नवनाथी आदिनाथ । अनाथांचा जगन्नाथ ॥ २॥
नरदेही नरसिंह । प्रगटला तरु पोटी ।नास्तिकाच्या कश्यपूला । आस्तिकाची देण्या गती ॥ ३ ॥
कधी चाले पाण्यावरी । कधी धावे अधांतरी । यमा वाटे ज्याची भीती । योगीश्वर हाच यती ॥ ४ ॥
कधी जाई हिमाचली । कधी गिरी अरवली । कधी नर्मदेच्या काठी । कधी वसे भीमा तटी ॥ ५ ॥
कालीमाता बोले संगे । बोले कन्याकुमारी ही । अन्नपूर्णा ज्याचे हाती । दत्तगुरू एक मुखी ॥ ६॥
भारताच्या कानोकानी । गेला स्वये चिंतामणी । सुखी व्हावे सारे जन । तेथे धावे जनार्दन ॥ ७॥
प्रज्ञापुरी स्थिर झाला । मध्यान्हीच्या रविप्रत । रामानुज करी भावे । स्वामी - पदा दंडवत ॥ ८॥
*ऐशा स्वामी समर्थांना । सदा असो दंडवत ।।*
🕉🕉🙏🔔🙏🕉🕉