Tuesday, 25 July 2017

Bhairav mantra nitya jaap

सर्व मनोकामना पूरक भैरव देव जी का नित्य जाप करने के लिए शाबर मंत्र जन हितार्थ प्रस्तुत है।

ॐ सत् नमो आदेश गुरु को आदेश
गुरूजी चंडी चंडी तो प्रचंडी
अला-वला फिरे नवखंडी
तीर बांधू तलवार बांधू बीस कोस पर बांधू वीर
चक्र ऊपर चक्र चले भैरव वली के आगे धरे
छल चले वल चले तब जानबा काल भैरव तेरा रूप कौन भैरव
आदि भैरव युगादी भैरव त्रिकाल भैरव कामरु देश रोला मचाबे
हिन्दू का जाया मुसलमान का मुर्दा फाड़ फाड़ बगाया
जिस माता का दूध पिया सो माता कि रक्षा करना
अबधूत खप्पर मैं खाये
मशान मैं लेटे
काल भैरव तेरी पूजा कोण मेटे
रजा मेटे राज-पाठ से जाये
योगी मेटे योग ध्यान से जाये
परजा मेटे दूध पूत से जाये
लेना भैरव लोंग सुपारी
कड़वा प्याला भेंट तुम्हारी
हाथ काती मोंडे मड़ा जहा सुमिरु ताहा हाज़िर खड़ा
श्री नाथ जी गुरूजी आदेश आदेश। ।

किसी भी विशेष नक्षत्र दिन पर्व आदि को इस मंत्र को जाग्रत कर लें उसके बाद नित्य भैरव जी के सामने इस मंत्र कि एक माला का जाप करे। या यथाशक्ति जाप करे।

Monday, 24 July 2017

Shivshankar sadhana

*श्रावण महिना चालू होत आहे,शिवाचे साधनेला सर्वानी तयार रहा,,,,,*
       
      *॥उपासना महिमा॥*

सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र :- ll ओम नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशी नुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे या विषयी थोडेसे ! संपूर्ण वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा !

महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्चा पूर्ण करतात असा अनुभव आहे. या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोष सुद्धा या दानामुळे दूर होतात.

अभिषेक कसा करावा ?

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा तसेच बिल्व पत्र , बेल फळ किंवा धोत्र्याचे फुल वाहावे.

राशी नुसार गरिबांना द्यायची दाणे खालील प्रमाणे !

मेष- मध , गूळ , उसाचा रस व लाल फुल !

वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल !

मिथुन- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र !

कर्क- कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल !

सिंह- मध , गूळ , शुद्ध तूप व लाल पुष्प !

कन्या- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले !

तुळ - दूध, दही, रंगीत फुले !

वृश्चिक- मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल !

धनु- शुद्ध तूप , मध , बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ !

मकर- मोहरीचे तेल , तिळाचे तेल , कच्चे दुध, जांभळे, निळे फुल !

कुंभ- कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल , निळे फुल !

मीन- उसाचा रस , मध , बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ !

विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:२८ ते २५:१८  या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

ll श्री स्वामी समर्थ ll

Sunday, 23 July 2017

मानेचे विकार

♦ *मानेच्या मणक्‍याचा स्पॉंडिलायसीस*♦

संधी म्हणजे दोन अवयवयांना सांधणारे अवयव. पण यात वात झाला किंवा चुकीच्या पद्धतीने हलचाल झाली की त्या अवयवाची पुरती बोंब लागते. कधीकधी हे आयुष्यभराचे दुखणे होते. त्यात स्पॉंडिलायसीस झाले की संपलेच सगळे. उठता बसता मानेवर, पाठीवर कुत्र्याचा पट्टा बांधल्यासारखा पट्टा बांधावा लागतो. पण हा आजार नेमका कसा होतो आणि त्यावर उपचार काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया.

घर्षणाने जीर्णशीर्ण झालेला वयोमानाने उद्‌भवणारा मानेचा आजार म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडिलायसीस. सर्वप्रथम हा आजार सुरू होताना दोन
मणक्‍यांच्या मध्ये असणारी गादी (डिस्क)मधील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरू होते. त्यामुळे त्यातील असणारे कार्टीलेज मणक्‍याच्या बाहेर निघून
मज्जारज्जूवर दबाव टाकायला सुरुवात करते. अगोदरच मज्जारज्जू हा मणक्‍यातील एका छोट्या कॅनेलमधून कंबरेपर्यंत खाली गेलेला असतो. त्यावर मणक्‍यातून ही गादी सरकल्यामुळे मान दुखणे व त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना होणे, हातांमध्ये मुंग्या येणे व सुन्नपणा येणे अशी
लक्षणे दिसून येतात.
गादी सरकण्याची (स्लीप डिस्क) कारणे
*अचानक मानेला झटका लागणे.
* स्थूलपणा
* मणक्‍याला झालेला अपघात
* मानेला असलेला ताण
* वयोमानानुसार मणक्‍यांची झीज
*अचानक वजन उचलण्यामुळे व

*मणक्‍यातील सरकलेली गादी
आजारातील लक्षणे ः

कंबरेचे स्नायू खूप जास्त खेचलेले असतात.नजिकच्या भूतकाळात रोग्याने खूप वजन उचललेले असते.अति खोकल्यानेही हा आजार उद्‌भवू शकतो.अचानक मान वाकडी करणे अथवा मानेला झटका बसणे.

वेदना ः

*साधारणतः मानेमध्ये किंवा कंबरेमध्ये.

*मानेचे दुखणे डोक्‍याकडे, दोन्ही काखांकडे व हातापर्यंत सरकत जाते.

*अशा प्रकारचे दुखणे असह्य असते.

*वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली खोकणे, शिंकणे, चालणे किंवा समोर

*झुकणे यामुळे या प्रकारचे दुखणे वाढू शकते.

*आराम केल्याने वेदना कमी होतात.

*हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येतात किंवा सुन्नपणा येतो.

तपासण्या ः
मानेची क्ष-किरण तपासणी
सिटी स्कॅन
एम.आर.आय. स्कॅन. ही अतिशय महत्वाची तपासणी असून आपल्याला गादी किती सरकली आहे याची कल्पना येते. त्याचप्रमाणे मानेपासून
हातांमध्ये येणाऱ्या दबावाचे किती प्रमाण आहे हे या तपासणीत नमूद होते.

उपचार ः
साधारणतः 8 ते 12 आठवडे पूर्ण आराम करावा लागतो.
शक्‍यतो हाडासारखा कडक भाग झोपण्यास घ्यावा.
अतिशय तीव्र स्वरुपाच्या
आजारामध्ये डोक्‍याला ट्रॅक्‍शन लावून फिजियोथेरपी करता येते.

मानेचा सांधा जोडणे ः
ही मानेच्या मणक्‍यातील शस्त्रक्रिया असून मणक्‍यातील सरकलेली गादी काढून टाकण्यात येते. ही शस्त्रक्रिया साधारणतः समोरून मानेकडे केली जाते. या शस्त्रक्रिये
मध्ये बरेचदा दुर्बिणीचा वापरही केला जातो. दबाव निघाल्यानंतर दोन मणक्‍यांच्यामध्ये हाडांचा तुकडा किंवा कृत्रिम केज बसवली जाते व वरच्या आणि खालच्या मणक्‍यांना प्लेट आणि स्व्रूाच्या सहाय्याने बांधले जाते. यालाच सर्व्हावल फ्युजनही म्हणतात. पण ही शस्त्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. आजच्या घडीला या आजारासाठी सर्वात नवीन उपचार पद्धती आहे. यामध्ये दोन मणक्‍यांच्या मध्ये सरकलेल्या गादीच्या जागी कृत्रिम सांध्याचे
प्रत्यारोपण केले जाते. अशा प्रकारचा सांधा दोन मणक्‍यांच्यामध्ये टाकल्यामुळे
मानेच्या सर्व प्रकारच्या हालचाली योग्य प्रकारे होत राहतात. त्यामुळे
मणके एक दुसऱ्यांना बांधण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे मणक्‍याच्या मध्ये हाडाचे तुकडे किंवा प्लेट व स्व्रूा वापरायची गरज लागत नाही. पण ही
उपचार पद्धती अशा प्रकारे अशाच व्यक्‍तींना वापरण्यात येते. ज्यांना खूप जास्त शारीरिक हालचाल करण्याची गरज भासते.

मानेच्या सर्व प्रकारचे हालचाली व्यवस्थित राहतात.आजूबाजूच्या मणक्‍यांशी कमी घर्षण होते.बोन ग्राफिटींगची गरज लागत नाही.ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मानेची हालचाल सुरू होते.आपले सामान्य आयुष्य लवकरात लवकर सुरू करता येते.
तेव्हा मानेच्या या आजारामध्ये सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ही उाची सर्वात अभिमत उपचार पद्धती असण्यास हरकत नाही.                             🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

प्रातः स्मरण 2

🌹 *प्रात:स्मरण* 🌹

*श्रीगणेशाय नम: ।*
*श्रीसरस्वत्यै नम: ।*
*श्रीसोमेश्र्वराय नम: ।* *श्रीविश्वेश्वराय नम: ।*
*श्री कुलदेवताभ्यो नम: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*कराग्रे वसते लक्ष्मी : करमध्ये सरस्वती ।*
*करमूले तु गोविंद : प्रभाते करदर्शनम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*या कुन्देन्दुतुषार हारधवला या शुभ्रवस्त्रावृत ।*
*या वीणावरद्ण्डमण्डितकरा या श्र्वेतपद्मासना ।*
*या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता ।*
*सा मां पातु सरस्वती भगवती नि: शेषजाड्यापहा ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।*
*विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।*
*निर्विघ्नं करु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥*
*गणनाथ सरस्वती रविशुक्रबृहस्पतीन् ।*
*पश्र्चैतान्संस्मरेन्नित्यं वेदवाणीप्रवृत्तये ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।*
*विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाड्गम् ।*
*लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं ।*
*वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मूकं करोति वाचालं पंगुम् लंघयते गिरीम् ।*
*यक्तृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।*
*गुरु: साक्षातपरब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*ब्रह्मानंन्दे परमसुखंदे केवलं ज्ञानमूर्तिम् ।*
*द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।*
*एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षिभूतं ।*
*भावतीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।*
*पुण्यश्लोको विदेहश्र्च पुण्यश्लोको जनार्दन : ॥*
*कर्कोटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ।*
*ऋतुपर्णस्य राजर्षे: कीर्तनं कलिनाशनम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।*
*शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ॥१॥*
*एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।*
*सायंकाले पठेन्नित्यं प्रात: काले विशेषत: ।*
*तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ॥२॥*

*( क्रमशः )*

*अशोककाका कुलकर्णी*

प्रातः स्मरण 1

🌹 *प्रातः स्मरण* 🌹

  *अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण: ।कृपा परशुरामश्च सत्पैते चिरंजीविन: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*जगन्मातर्नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ।दयावति नमस्तुभ्यं विश्र्वेश्र्वरि नमोऽस्तु ते ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*बलिर्बिभीषणो भीष्म: प्रल्हादो नारदो ध्रुव: ।षडैते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*अहल्या द्रोपदी सीता तारा मन्दोदरी तथा ।पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय: ।यषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दन: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*सदा सर्वदा योग तुझा घडावा ।तुझे कारणी देह माझा पडावा ।उपेक्षु नको गुणवंता अनंता ।रघुनायका मागणॆ हेचि आता ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*ब्रह्मा मुरारिस त्रिपुरांतकारी , भानु: शशी भूमिसुतो बुधश्र्चगुरुश्र्च शुक्र: शनिराहुकेतव: , कुर्वंतु सर्वि मम सुप्रभातम् ॥सनत्कुमार: सनक: सनंदन: सनातनोप्यासुरिपिंगलौ च ।सप्तस्वर: सप्तरसातलानि । कुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम्॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं ।उज्जयिन्यां महाकालमोकारममलेश्र्वरम् ॥परल्यां वैजनाथं च डाकिन्या भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥वाराण्स्यां तु विश्र्वेंशं त्र्यंबकं गौतमीतटे ।हिमालये तु केदारं घुसृणेशं शिवालये ॥एतानि ज्योतिर्लिंगानि सांय प्रात: पठेन्नर: ।सत्पजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*पृथ्वी संगधा, ससस्तथाप:स्पर्शी च वायु: ज्वलनं च तेज: ।नभ: सशब्दं महता सहैवकुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*इत्थं प्रभाते परमं पवित्रं पठेत् , स्मरेव्दा श्रुणुयाच्च तव्दत् ।दु:स्वप्ननाशस्त्विह सुप्रभातम् भवेच्च नित्यं भवरत्प्रसादन् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*सर्वेऽत्र सुखिन: सत्नु सर्वे सत्नु निरामया:सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदु:खमाप्नुयात् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ॥वातात्मजं वानरयूथमुख्यम् । श्री रामदूतं शरणं प्रपद्ये॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद तो या राघवाचा ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*कैलासरणा शिव चंद्रामौळी ।फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी ।करुण्यसिंधु भवदु:खहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गोरक्ष जालंदर चर्पटाश्चअडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या: ।चौरंगी रेवाणक भर्त्री संज्ञाभूम्यां बभूवुर्नवनाथ सिद्धा: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ।मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*जयाच्या शिरी केशरी रंग शोभे ।दुजा पांढरा पाहता चित्त लोभे ।हिरवा तिजा देई शांती मनाला ।सदा ठेवू चित्ती तिरंगा ध्वजाला ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गोविंदा गोपाळा कृष्णा विष्णू मुकुंद घननीळा ।धृतकौस्तुभवनमाळा पीतांबरधारि देवकी बाळा ॥श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा ।गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा ॥श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते।वैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते त्राहि माम् ॥कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*कूजन्तम् रामरामेति मधुरम् मधुराक्षरम् ।आरुह्य कविताशाखां । वन्दे वाल्मिकीकोकिलम् ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।माथा शेंदूर पाझरे वरी बरे , दुर्वांकुरांचे तुरे ॥माझे चित्त विरे , मनोरथ पुरे , देखोनि चिंता हरे ।गोसाविसुत वासुदेव कवि रे, त्या मोरयाला स्मरे ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मोरया मोरया मी बाळ तान्हे ।तुझीच सेवा करु काय जाणे ॥अपराध माझे कोट्यानु कोटी ।मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*हरीच्या करी एक रंगीत काठी ।हरी उभा राहिला भीवरे वाळवंटी ।तुरा खोविला तुळशी मंजिरीचा ।असा विठ्ठल देखिला पंढरीचा ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गुरुर्ब्रह्मा: गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्र्वर: ।गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*शिव भवानि रुद्राणि, शर्वाणि सर्व मंगलाअपर्णा , पार्वती ,दुर्गा मृडानि चंडिकाबिका ॥*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।*
*देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥*

*अशोककाका कुलकर्णी*